आपल्याला माहित आहे की आता जर शिक्षक व्हायचे असेल तर त्याकरिता राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात येणारी शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी परीक्षा देणे व ती उत्तीर्ण असणे खूप गरजेचे आहे. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरच राज्यात पवित्र पोर्टल अर्थात संकेतस्थळाच्या माध्यमातून शिक्षकांची भरती प्रक्रिया राबविण्यात येते.
त्यामुळे शिक्षक भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी परीक्षेची तयारी करणे खूप गरजेचे असते व असे अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी डीएड आणि बीएड केल्यानंतर टीईटी ची तयारी करत असतात.

अशा या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी असून राज्य परीक्षा परिषदेचे उपायुक्त संजय राठोड यांनी शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी परीक्षेची माहिती प्रसिद्धी पत्रकार द्वारे दिली आहे.
शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी घेतली जाणार 10 नोव्हेंबरला
याबाबत सविस्तर वृत्त असे की, पहिली ते आठवीच्या वर्गांना शिक्षक होण्यासाठी आवश्यक असलेली शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी तारीख जाहीर करण्यात आलेली असून ही परीक्षा आता दहा नोव्हेंबर रोजी घेतली जाणार आहे. त्यामुळे या परीक्षेची तयारी करणाऱ्या इच्छुक व पात्र असलेल्या उमेदवारांना जर यासाठी अर्ज करायचा असेल तर ते नऊ ते 30 सप्टेंबर या दरम्यान करू शकणार आहेत.
याबाबतची माहिती प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून राज्य परीक्षा परिषदेचे उपायुक्त संजय राठोड यांनी दिली आहे. यामध्ये पहिल्या टप्प्याची भरती आता शेवटच्या टप्प्यात असून दुसऱ्या टप्प्यात काही हजार पदे भरले जाण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांकडे जे मूळ प्रमाणपत्र आहेत त्या प्रमाणपत्रांच्या पडताळणीच्या अधीन राहून उमेदवारांना या परीक्षेला आता तात्पुरता प्रवेश दिला जाणार आहे व या परीक्षेचा निकाल घोषित केला जाईल.
निकाल लागल्यानंतर शैक्षणिक व व्यावसायिक कागदपत्रांची व्हेरिफिकेशन प्रमाणपत्र वितरणावेळी करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रमाणपत्र पडताळणी जेव्हा केली जाईल तेव्हा उमेदवाराकडे पूर्ण कागदपत्रे असणे गरजेचे आहे. जर उमेदवाराकडे अपूर्ण कागदपत्रे असतील किंवा उमेदवार प्रमाणपत्र सादर करण्यास असमर्थ ठरले तर परीक्षेचे उमेदवारी रद्द करण्यात येणार आहे.
या उमेदवारांनी वस्तुनिष्ठ माहिती भरणे गरजेचे नाहीतर..
2018 आणि 2019 मध्ये जी काही टीईटी परीक्षा घेण्यात आलेली होती व त्या परीक्षा मध्ये जे उमेदवार गैरप्रकारात समाविष्ट होते अशा उमेदवारांची यादी परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे व प्रत्येक उमेदवाराने आपले नाव या यादीत आहे किंवा नाही याबाबतची तपासणी करणे गरजेचे आहे व ही तपासणी करून वस्तुनिष्ठ माहितीच अर्जात भरणे गरजेचे आहे.
समजा एखाद्या विद्यार्थ्याने चुकीची माहिती भरली व असे निदर्शनास आले तर अशा उमेदवाराचे कोणत्याही स्तरावर संपादणूक रद्द करण्याचा अधिकार राज्य परीक्षा परिषदेकडे राहील. 2018 ते 2019 च्या गैरप्रकार केलेल्या उमेदवारांच्या यादीत नाव असून देखील जर खोटी माहिती भरून परीक्षा दिली तर कायदेशीर कारवाई करण्यात येण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे.
अशा प्रकारचे आहे टीईटी परीक्षेचे वेळापत्रक
1- अर्ज भरण्याचा कालावधी– ज्या उमेदवारांना टीईटी परीक्षा द्यायची आहे त्यांना 9 ते 30 सप्टेंबर या कालावधीत अर्ज भरणे गरजेचे आहे.
2- हॉल तिकीट मिळण्याचा कालावधी– या परीक्षेचे प्रवेशपत्र अर्थात हॉल तिकीट 28 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबरच्या दरम्यान मिळणार आहे.
3- परीक्षेची तारीख– टीईटी परीक्षा ही 10 नोव्हेंबर रोजी घेण्यात येणार आहे.
परीक्षेचा वेळ
1- पहिला पेपर– 10 नोव्हेंबर रोजी या परीक्षेचे पेपर होतील व यातील पहिला पेपर सकाळी साडेदहा ते एक वाजेच्या दरम्यान होणार आहे.
2- दुसरा पेपर– परीक्षेचा दुसरा पेपर त्याच दिवशी दुपारी दोन ते साडेचार वाजेच्या कालावधीत घेतला जाणार आहे.