Pod Taxi Technology:- सध्या तंत्रज्ञानाचा वापर खूप मोठ्या प्रमाणावर होऊ लागला असून आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आता अनेक महत्वपूर्ण बदल प्रत्येक क्षेत्रात घडून येत आहेत. मग ते वाहतूक आणि दळणवळण क्षेत्र असो की कृषी क्षेत्र अशा जीवनाच्या प्रत्येक महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आल्याने अनेक अवघड गोष्टी सोप्या पद्धतीने पूर्ण करता येणे शक्य झाले आहे.
त्यामुळे आता बऱ्याच कामांमध्ये आपला वेळ आणि पैसा देखील वाचण्यास मदत झालेली आहे. जर आपण वाहतूक क्षेत्राच्या दृष्टिकोनातून बघितले तर आता अनेक प्रकारचे तंत्रज्ञान वापरण्यात येत असून आपण विचार देखील करू शकत नाही अशा प्रकारचे प्रकल्पांची उभारणी या तंत्रज्ञानाच्या मदतीने केली जात आहे. त्यामुळे वाहतूक क्षेत्रात देखील खूप विलक्षण असा बदल पाहायला मिळत आहे.
या तंत्रज्ञानाला पकडून जर आपण सध्या मुंबईकरांच्या सेवेला एमएमआरडीए अर्थात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स मध्ये पॉड टॅक्सी सेवा सुरू करण्याला मान्यता देण्यात आलेली आहे व हा काही जो प्रकल्प आहे त्याची संपूर्ण रिस्पॉन्सिबिलिटी ही साई ग्रीन मोबिलिटी कंपनीकडे आहे.
त्यामुळे प्रवाशांना बीकेसी मध्ये अगदी आरामदायक प्रवास करता येणार आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की नेमकी हे पॉड टॅक्सी प्रकरण काय आहे? तर याबद्दलची माहिती आपण या लेखात घेऊ.
पॉड टॅक्सी म्हणजे नेमके काय?
पॉड टॅक्सी एक स्वयंचलित इलेक्ट्रिक म्हणजेच विद्युत कार असून तिला चालवण्यासाठी ड्रायव्हरची आवश्यकता नसते.म्हणजेच ही टॅक्सी ड्रायव्हरविना चालते व ती एक छोटी कार असते. प्रवाशांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी अतिशय वेगाने नेण्याची क्षमता या टॅक्सीमध्ये असते.
वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स मध्ये सुरू होणाऱ्या या स्वयंचलित पॉड टॅक्सीमुळे प्रत्येक दिवसाला चार ते सहा लाख प्रवाशांना खूप मोठा फायदा होणार आहे. याकरिता वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स मध्ये 8.80 किलोमीटर लांबीचा टॅक्सी मार्ग असणार असून यामध्ये तब्बल 38 स्थानके असणार आहेत.
या स्वयंचलित अशा पॉड टॅक्सी मध्ये सहा जण बसू शकतात व या पॉड टॅक्सीचा स्पीड 40 किलोमीटर प्रति तास इतका असतो. म्हणजे या टॅक्सीची सेवा ही स्वयंचलित असेल. या मार्गावर प्रवाशांना पॉड टॅक्सीची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. कारण दर पंधरा ते वीस सेकंदांनी एखादी पॉड टॅक्सी या ठिकाणी येत राहील.
यामुळे वांद्रे आणि कुर्ला स्टेशन सारख्या प्रमुख वाहतूक केंद्रांपर्यंत प्रवासी वाहतूक अतिशय सोपी होणार आहेत. या टॅक्सीमध्ये एकावेळी आठ प्रवासी देखील प्रवास करू शकता व तेरा प्रवासी उभे राहून प्रवास करू शकतात.
एका ठिकाणहुन दुसऱ्या ठिकाणी अतिशय स्पीडने नेण्याची क्षमता या टॅक्सी मध्ये असते. ही एक स्वयंचलित कार असून आकाराने छोटी असते.
ड्रायव्हरविना कशी चालते पॉड टॅक्सी?
या टॅक्सी मध्ये ड्रायव्हरची आवश्यकता नसते.ही टॅक्सी एका ठिकाणहुन ऑपरेट केली जाते व सुरक्षेच्या कारणाकरिता तीन वेगवेगळ्या स्तरांमध्ये विभागलेले आहे. यामध्ये पहिल्या स्तरावर पॉड टॅक्सीला जेथे पोहोचायचे आहे आणि तेथे थांबायचे आहे याबद्दलची माहिती असते.
त्याच मार्गावर जाणाऱ्या दोन पॉड्स दरम्यान योग्य अंतर असल्याची खात्री केली जाते. तसेच दुसऱ्या स्तरांमध्ये बसलेल्या प्रवाशांना आवश्यक असल्यास केंद्रीय नियंत्रण प्रणालीच्या माध्यमातून सूचना देखील दिल्या जाऊ शकतात.
ही एक ऑटोमॅटिक स्वयंचलित वाहन संरक्षण प्रणाली असून एखाद्या ठिकाणी धोका दिसून आल्यास नियंत्रण कक्षाला संदेश पाठवणारे सेन्सर देखील त्यात असतील व सर्व पॉड्स ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणी त्यांना थांबवता येतील.
तसेच तिसऱ्या स्तरांमध्ये प्रत्येक पॉड टॅक्सीला मार्गस्थ करण्यापूर्वी प्रोसिड सिग्नलची आवश्यकता असेल व हे सिग्नल प्रत्येक पॉडला स्वतंत्रपणे दिले जाईल.
जगात सर्वप्रथम पॉड टॅक्सी सेवा कुठे सुरू झाली?
जागतिक पातळीवर बघितले तर ही सेवा पहिल्यांदा लंडनमध्ये सुरू झाली असून साधारणपणे 2010 पासून हिथ्रो विमानतळावर ती कार्यरत आहे. लंडनमध्ये 22 तास या टॅक्सीच्या माध्यमातून सेवा दिली जाते.