SBI Scheme: 400 दिवसाच्या गुंतवणुकीत लाखो कमवण्याची संधी! एसबीआयची ‘ही’ योजना आहे खूपच फायद्याची

देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने देखील नागरिकांचे भविष्य आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी अनेक बचत योजना राबविल्या असून यातीलच एक योजना  म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियाची अमृत कलश योजना ही होय.

Published on -

SBI Scheme: प्रत्येक व्यक्तीच्या आर्थिक दृष्टिकोनातून भविष्य जर सुरक्षित करायची असेल तर त्याकरिता तुम्हाला पैशांची बचत करणे खूप गरजेचे आहे व या बचतीची गुंतवणूक योग्य ठिकाणी करणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. तुम्ही जर सुरक्षित आणि उत्तम परतावा देणाऱ्या पर्यायांमध्ये गुंतवणूक केली तर आर्थिक समृद्धीच्या दृष्टिकोनातून तुम्ही स्वावलंबी बनता आणि भविष्यात पैशांसाठी तुम्हाला कोणावर अवलंबून राहण्याची गरज भासत नाही.

या दृष्टिकोनातून अनेक बँकांच्या माध्यमातून विशेष अशा गुंतवणूक योजना तसेच मुदत योजना राबवल्या जातात. कारण बरेच गुंतवणूकदार बँक आणि पोस्ट ऑफिसच्या मुदत ठेव योजनांना गुंतवणुकीसाठी प्राधान्य देतात. कारण यामध्ये गुंतवणुकीचे सुरक्षितता असते आणि परतावा देखील चांगला मिळतो.

अगदी याच प्रमाणे देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने देखील नागरिकांचे भविष्य आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी अनेक बचत योजना राबविल्या असून यातीलच एक योजना  म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियाची अमृत कलश योजना ही होय.

ही योजना 400 दिवसांसाठी असून या योजनेत गुंतवणूक करण्याचा कालावधी आता संपणार आहे. जर तुम्हाला या योजनेत गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही 30 सप्टेंबर 2024 पर्यंत करू शकतात.

 कसे आहे अमृत कलश एफडी योजनेचे स्वरूप?

या योजनेत तुम्हाला चारशे दिवसांकरिता गुंतवणूक करावी लागणार असून ग्राहकांना या योजनेत केलेल्या गुंतवणुकीवर 7.10% व्याजदर मिळणार असून जेष्ठ नागरिकांना तो 7.60% मिळणार आहे. जर आपण या योजनेचे व्याजदर बघितले तर ते नियमित व्याजदरापेक्षा 30 बेसिस पॉईंटने जास्त आहेत.

या योजनेमध्ये कोणतेही भारतीय आणि NRI नागरिक अर्ज करू शकतात. या योजनेमध्ये डिपॉझिट आणि रिन्यू अशा दोन्ही योजनांचा समावेश असून या योजनेमध्ये ग्राहकांना मासिक, तिमाही आणि सहा महिन्यांच्या आधारे व्याज दिले जाते.

टर्म डिपॉझिट वर मॅच्युरिटीच्यावेळी व्याजदर दिले जाते. या योजनेत दोन कोटी पेक्षा कमी गुंतवणुकीवर टर्म डिपॉझिट लागू होते. मॅच्युरिटी नंतर ग्राहकांसाठी टीडीएस कापला गेल्यानंतर हे पैसे ग्राहकांच्या खात्यात जमा होतात.

 कर सवलतीत मिळतो लाभ

या योजनेत आयकर कायद्यानुसार टीडीएस कापला जातो व टीडीएसमध्ये सूट हवी असेल तर तुम्हाला फॉर्म 15G/15H जमा करावा लागतो व या योजनेत तुम्ही लोन देखील घेऊ शकतात.

 या योजनेसाठी कुठे करता येईल अर्ज?

तुम्हाला देखील एसबीआय अमृत कलश योजनेमध्ये गुंतवणुकीसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाच्या योनो ॲप किंवा इंटरनेट बँकिंगद्वारे ऑनलाईन बुकिंग करू शकता व या योजनेत गुंतवणूक करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2024 आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe