Brain Health Tips: तुमच्या ‘या’ सवयी ठरतील मेंदूच्या आरोग्यासाठी घातक! नका करू दुर्लक्ष नाहीतर होईल पश्चाताप

आपल्या काही सवयी या मेंदूला देखील हानी पोहोचवू शकतात. त्यामुळे अशा सवयींकडे दुर्लक्ष करणे घातक ठरू शकते. अल्झायमर हा एक  न्यूरोडीजनरेटिव्ह रोग असून मेंदूच्या पेशीवर याचा विपरीत परिणाम होतो. यामुळे व्यक्तीची हळूहळू स्मरणशक्ती कमी व्हायला लागते

Ajay Patil
Published:
brain health

Brain Health Tips:- शरीराच्या आरोग्यावर आपल्या दैनंदिन सवयींचा देखील खूप मोठा परिणाम होत असतो. ज्याप्रमाणे आहाराचा परिणाम हा शरीराच्या आरोग्यावर होत असतो अगदी त्याचप्रमाणे आपल्या छोट्या-मोठ्या दैनंदिन असलेल्या सवयी देखील आरोग्यावर चांगला किंवा वाईट परिणाम करत असतात.

आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये कायमच कामाची दगदग तसेच ताण तणाव, पुरेशी झोप न मिळणे त्यासोबतच संतुलित आहाराकडे दुर्लक्ष  इत्यादी मुळे आरोग्याच्या अनेक समस्या आपल्याला आता उद्धवतांना दिसून येत आहेत.

अगदी याच प्रमाणे आपल्या काही सवयी या मेंदूला देखील हानी पोहोचवू शकतात. त्यामुळे अशा सवयींकडे दुर्लक्ष करणे घातक ठरू शकते. अल्झायमर हा एक  न्यूरोडीजनरेटिव्ह रोग असून मेंदूच्या पेशीवर याचा विपरीत परिणाम होतो.

यामुळे व्यक्तीची हळूहळू स्मरणशक्ती कमी व्हायला लागते आणि त्यासोबतच विचार करण्याची क्षमता आणि वर्तन देखील बिघडते. रोजच्या काही सवयी अलझायमरचा धोका वाढवू शकतात.

 या सवयी ठरतील मेंदूला हानिकारक

1- पुरेशी झोप मिळणेझोप न लागणे मेंदूसाठी खूप हानिकारक असून झोपेच्या दरम्यान मेंदूची साफसफाईची प्रक्रिया होत असते. त्यामुळे मेंदूमध्ये नकोशी असलेले पदार्थ म्हणजेच एक प्रकारे विष काढून टाकले जाते. परंतु नियमितपणे जर कमी झोप घेतली तर मेंदूमध्ये विषारी पदार्थ जमा व्हायला लागतात व अल्झायमरचा धोका वाढतो.

2- जास्त साखर आणि प्रक्रिया केलेले अन्न वापरणे साखर युक्त आणि प्रक्रिया केलेल्या पदार्थ देखील मेंदूला नुकसान पोहोचू शकतात. अशा प्रकारचे अन्नपदार्थ जर जास्त प्रमाणात सेवन केले तर मेंदूचे पेशीमधील  संपर्क कमकुवत होऊ शकतो व त्यामुळे स्मरणशक्ती आणि मेंदूचे कार्य बिघडू शकते.

3- मानसिक व्यायामाचा अभाव मेंदू सक्रिय न ठेवणे तसेच अभ्यासापासून दूर राहणे किंवा मानसिक आव्हाने यामुळे देखील अल्झायमर होऊ शकतो. नवनवीन आव्हाने आणि क्रियाकल्पांमध्ये मन सतत व्यस्त ठेवणे मानसिक आरोग्यासाठी खूप फायद्याचे ठरते.

4- शारीरिक हालचाल कमी करणे शारीरिक व्यायाम हा केवळ शरीरासाठीच नाही तर मनासाठी देखील खूप महत्त्वाचा असतो व व्यायामामुळे मेंदूतील रक्त परिसंचारण वाढते व ज्यामुळे निरोनल क्रियाकलाप सुधारतो आणि अल्झायमरचा धोका कमी होतो.

5- सामाजिक संपर्क कमी असणे किंवा नसणे दीर्घकाळ सामाजिक संपर्कापासून दूर राहिल्याने देखील अलझायमरचा धोका उद्भवू शकतो. एकाकीपणामुळे मेंदूची क्रिया कमी होते व त्याचा मानसिक आरोग्यावर खूप नकारात्मक परिणाम होतो.

त्यामुळे या सवयी टाळून मेंदूला सक्रिय आणि निरोगी ठेवण्यासाठी योग्य पावले उचलणे खूप गरजेचे आहे व स्वतःचे अल्झायमर सारख्या गंभीर आजारांपासून संरक्षण करणे महत्त्वाचे ठरते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe