RTO Rule: कार किंवा बाईकचा रंग बदलायचा आहे का? नियमात राहून बदला रंग,नाहीतर भरावा लागेल दंड

रंग बदलल्यामुळे जुनी कार देखील नवी कोरी दिसायला लागते. त्यामुळे बऱ्याचदा जुन्या झालेल्या कारचा किंवा बाईकचा रंग बदलला जातो. परंतु रंग बदलण्याआधी मात्र यासंबंधी भारतात काही नियम आहेत याचा विसर कित्येक जणांना पडतो व त्यामुळे बऱ्याचदा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो.

Ajay Patil
Published:
rto rule

RTO Rule:- बऱ्याचदा आपण आपल्या जवळ असलेली कार किंवा बाईक जुनी झाली की त्यामध्ये बऱ्याच सुधारणा करतो. या सुधारणा करताना आपण अनेक छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये बदल करत असतो व सगळ्यात मोठा बदल करतो तो म्हणजे कार किंवा बाईकचा रंग बदलला जातो.

जेणेकरून रंग बदलल्यामुळे जुनी कार देखील नवी कोरी दिसायला लागते. त्यामुळे बऱ्याचदा जुन्या झालेल्या कारचा किंवा बाईकचा रंग बदलला जातो. परंतु रंग बदलण्याआधी मात्र यासंबंधी भारतात काही नियम आहेत याचा विसर कित्येक जणांना पडतो व त्यामुळे बऱ्याचदा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो.

तुम्ही तुमच्या कारचा रंग बदलणे हा तुमचा व्यक्तिगत प्रश्न असून कायदेशीर रित्या ते चुकीचे नाही. परंतु रंग बदलण्याआधी तुम्हाला काही कायदेशीर प्रक्रियांचे पालन करणे गरजेचे असते.

 कार किंवा बाईकचा रंग बदलण्याआधी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी?

जर तुम्हाला तुमच्या कारचा किंवा बाईकचा रंग बदलायचा असेल तर त्याकरिता काही कायदेशीर प्रक्रियांचे पालन करणे खूप गरजेचे असते. कारण वाहनाचे जे काही रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट म्हणजेच आरसी बुक असते त्यामध्ये तुमच्या वाहनाचा रंग कोणता आहे हे नमूद केलेले असते.

त्यामुळे तुम्हाला जर तुमच्याकडील कार किंवा बाईकचा रंग बदलायचा असेल तर वाहन कायद्याच्या कलम 52 अंतर्गत वाहनाचा रंग बदलण्याची प्रक्रिया तुम्हाला पूर्ण करावी लागते. यामध्ये तुम्हाला जर गाडीचा रंग बदलायचा असेल तर त्याबाबत आरटीओला कळवणे खूप गरजेचे आहे.

रंग बदलण्याचा संपूर्ण तपशील तुम्हाला आरसी बुक मध्ये देणे गरजेचे आहे. याकरिता तुम्हाला तुमचे आरसी बुक कलर शेड सॅम्पल सह आरटीओकडे न्यावे लागेल.

ज्या आरटीओकडे तुमचे वाहन रजिस्टर आहे अशा ठिकाणी तुम्हाला याबाबत प्रक्रियेसाठी जावे लागेल. जेव्हा तुम्ही कारचा रंग बदलणार असाल तेव्हा रंग बदलणे अगोदर त्यासंबंधीची माहिती आरटीओ कळवणे आवश्यक असते व त्यानंतर तुम्हाला आरटीओमध्ये आवश्यक ते शुल्क भरावे लागू शकते.

रंग बदलण्यासाठीची प्रक्रियाकरिता आरटीओमध्ये अशाप्रकारे भरावा लागतो फॉर्म

1- एनएएमव्ही फॉर्म सगळ्यात अगोदर तुम्हाला या प्रक्रिये करिता एनएएमव्ही फॉर्म डाऊनलोड करून किंवा आरटीओवरून घेऊन तो भरावा लागेल. त्यानंतर आवश्यक कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर तुम्ही तुमच्या संबंधित आरटीओ कार्यालयात जावे व फॉर्म जमा करावा व याकरिता लागणारे आवश्यक शुल्क देखील भरावे.ही प्रक्रिया झाल्यानंतर तुम्हाला आरटीओची परवानगीची वाट पाहणे गरजेचे आहे.

कारचा रंग बदलल्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा आरटीओमध्ये जावे लागते व यावेळी आपल्या वाहनाचे आरसी बुक देखील सोबत घेऊन जावे. कारण आरसी बुकमध्ये आवश्यक ते बदल केले जातात.

सगळ्यात महत्वाचे म्हणजे तुम्ही तुमच्या कारचा रंग बदलला आहे याविषयीची माहिती तुमच्या विमा कंपनीला द्यायला अजिबात विसरू नका. जर तुम्ही कारच्या बदललेल्या रंगाची माहिती विमा कंपनीला द्यायला विसरलात किंवा दिली नाही तर तुमच्यावर दंड देखील आकारला जाऊ शकतो.

 आरटीओला कळवता गाडीचा रंग बदलला तर….

समजा तुम्ही आरटीओला न कळवताच कारचा किंवा बाईकचा रंग चेंज केला आणि पोलीस तपासणीमध्ये जर तुम्ही सापडला तर मात्र तुम्हाला मोठा दंड होऊ शकतो किंवा कधीकधी गाडी देखील जप्त केली जाण्याची शक्यता असते.

त्यामुळे आरटीओला रंग बदलण्या अगोदर कळवणे गरजेचे आहे व असे केल्यामुळे आरटीओ ऑफिसचे कर्मचारी तुमच्या आरसी बुक मध्ये तुमच्या गाडीच्या रंगात होणाऱ्या बदलाची नोंद करतात व त्यानंतर मला नवीन आरसी बुक दिले जाते. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचे म्हटले तर या सगळ्या प्रक्रियेमुळे तुमच्या गाडीचा बदललेल्या रंगाला एक प्रकारे कायदेशीर ओळख आणि मान्यता मिळते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe