Papaya Cultivation: ऊस शेतीला ठोकला रामराम आणि धरली पपई शेतीची कास! 3 एकर पपई लागवडीतून मिळवले तब्बल 14 लाखाचे उत्पन्न

आष्टी येथील प्रगतिशील शेतकरी म्हणून ओळखले जाणारे सुनील माने यांची शेती पाहिली तर यांनी तीन एकर पपई लागवडीतून तब्बल 14 लाखांचे उत्पन्न मिळवत इतर शेतकऱ्यांपुढे एक प्रेरणादायी असे उदाहरण प्रस्थापित केले आहे.

Published on -

Papaya Cultivation:- शेतीच्या पद्धती आणि पीक लागवडीमध्ये झालेले बदल यामुळे शेतीमध्ये खूप आमुलाग्र अशी क्रांती घडून आली असून अगदी कमीत कमी खर्चामध्ये देखील शेतकऱ्यांना आता लाखोमध्ये उत्पन्न मिळवणे शक्य झाले. कारण तंत्रज्ञानाचा वापर हा शेतीसाठी खूप महत्त्वाचा ठरत आहे.

शेतकऱ्यांनी आता पारंपारिक पिकांऐवजी विविध फळबाग शेतीकडे मोठ्या प्रमाणावर काम सुरू केले असून विविध प्रकारच्या फळबागांच्या लागवडीतून शेतकरी आता लाखो रुपये मिळवताना आपल्याला दिसून येत आहे.

यासोबतच विविध प्रकारच्या भाजीपाला पिकातून देखील कमी वेळेत, कमी खर्चात आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने भरघोस उत्पादन घेऊन चांगले उत्पन्न मिळवत असल्याचे आपल्याला दिसून येत आहे. अगदी याच पद्धतीने जर आपण आष्टी येथील प्रगतिशील शेतकरी म्हणून ओळखले जाणारे सुनील माने यांची शेती पाहिली तर यांनी तीन एकर पपई लागवडीतून तब्बल 14 लाखांचे उत्पन्न मिळवत इतर शेतकऱ्यांपुढे एक प्रेरणादायी असे उदाहरण प्रस्थापित केले आहे.

 सुनील मानेंनी तीन एकर पपईतून मिळवले 14 लाखांचे उत्पन्न

याबाबत सविस्तर वृत्त असे की, आष्टी तालुक्यातील प्रगतिशील शेतकरी सुनील आनंदराव माने हे अगोदर ऊस शेती मोठ्या प्रमाणावर करत होते. परंतु ऊस शेती मधून लागणारा कालावधी तसेच खर्च आणि मिळणारे उत्पन्न यांचा ताळमेळ हवा तसा न मिळाल्याने त्यांनी शेती आणि शेतीमधील पिकांमध्ये बदल करण्याचे ठरवले व ऊस शेती करणे बंद करून फळ आणि भाजीपाला उत्पादनाकडे मोर्चा वळवला.

त्याचाच भाग म्हणून त्यांनी सध्या तीन एकर क्षेत्रामध्ये पपईची लागवड केली असून या माध्यमातून 14 लाखांचे उत्पन्न मिळवले व इतर शेतकऱ्यांपुढे आदर्श निर्माण केला आहे. त्यांचे एकत्र कुटुंब असून कुटुंब शेतामध्ये त्यांना मदत करते. माने यांच्या शेतीचे एक वैशिष्ट्य म्हणजे ते शेतीमध्ये एक पीक घेण्याऐवजी बहुपीक पद्धतीचा अवलंब करतात.

 अशा पद्धतीने केली पपई लागवडीसाठी तयारी

पपई लागवड करण्याचे निश्चित केल्यानंतर त्यांनी तीन एकर शेतीची उभी आडवी चांगली नांगरट करून घेतली व एकरी दहा ट्रॉली शेणखत टाकले व त्यानंतर तीन एकर क्षेत्रावर पपईची लागवड केली.

पपई लागवडीकरिता 2700 पपईची रोपे परांडा धाराशिव या ठिकाणाहून खरेदी केली. त्यानंतर पाच बाय नऊ फुटावर रोपांची लागवड करून ठिबकने पाणी व्यवस्थापनाची सोय केली. याच ठिबक सिंचनाच्या माध्यमातून आवश्यक असलेली विरघळणारी विद्राव्य खते देखील झाडांना दिली.

रोगांचे व्यवस्थापन करताना वेळोवेळी बुरशीनाशके तसेच कीटकनाशकांची फवारणी केली. योग्य व्यवस्थापन ठेवल्यामुळे साधारणपणे 7 फेब्रुवारी 2024 पासून फळे येण्यास सुरुवात झाली व सध्या आठ ते दहा दिवसांनी पपई तोडणी सुरू असून पपई विक्रीसाठी मुंबई आणि कोलकत्ता यासह आष्टी व परिसरामध्ये त्यांनी विक्री केली व स्वतः देखील ते विक्री करतात.

तसेच बाकीची पपई त्यांनी इस्लामपूर, शिराळा, पलूस इत्यादी ठिकाणी असलेल्या कारखान्यांना चेरी तयार करण्यासाठी पुरवली. साधारणपणे सप्टेंबर महिन्यापर्यंत तीन एकरमधून त्यांना 52 ते 53 टन पपईचे उत्पादन मिळाले व त्यातून 14 लाख रुपये उत्पन्न त्यांच्या हाती उत्पन्न मिळाले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News