एलआयसीचा ‘हा’ प्लान आहे खूपच भारी! मिळते 2 लाखापर्यंत विमा कव्हर; जाणून घ्या कुणाला मिळतो या प्लॅनचा फायदा?

भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात एलआयसीने एक नवीन योजना लॉन्च केली असून या योजनेचे नाव ग्रुप मायक्रो टर्म इन्शुरन्स प्लान असे आहे.हा एक सिंगल प्रीमियम प्लान असून एक शुद्ध जोखीम, गट, नॉन लिंक्ड आणि नॉन पार्टिसिपिंग पॉलिसी आहे.

Ajay Patil
Published:
lic plan

LIC Plan: भारतीय आयुर्विमा महामंडळ ही एक अग्रगण्य अशी विमा क्षेत्रातील कंपनी असून या माध्यमातून अनेक प्रकारचे आकर्षक असे प्लान किंवा योजना लॉन्च केल्या जातात. गुंतवणुकीच्या दृष्टीतून देखील अनेक गुंतवणूकदार भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात एलआयसीच्या अनेक योजनांना प्राधान्य देताना आपल्याला दिसून येतात.

या योजनांचे महत्त्व म्हणजे यामध्ये केलेल्या गुंतवणुकीवर परतावा चांगला मिळू शकतो परंतु विमा कवर देखील उपलब्ध होत असल्याने हा एक मोठा फायदा गुंतवणूकदारांना होत असतो.

अगदी याच प्रमाणे भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात एलआयसीने एक नवीन योजना लॉन्च केली असून या योजनेचे नाव ग्रुप मायक्रो टर्म इन्शुरन्स प्लान असे आहे.हा एक सिंगल प्रीमियम प्लान असून एक शुद्ध जोखीम, गट, नॉन लिंक्ड आणि नॉन पार्टिसिपिंग पॉलिसी आहे.

ही योजना प्रामुख्याने सहकारी संस्था तसेच स्वयंसहायता गट, सूक्ष्म वित्त आणि गैरसरकारी संस्था यांसारख्या वित्त संस्थांसाठी आहे. या प्लानच्या साह्याने संबंधित संस्थाचे सदस्य आणि लाभार्थी यांना देखील कव्हर मिळतो.

 कुणाला मिळतो एलआयसीच्या या योजनेचा फायदा?

सूक्ष्म वित्त, सहकारी संस्था तसेच स्वयंसहायता गट आणि गैरसरकारी संस्था अर्थात एनजीओ यासारख्या वित्तीय संस्थांसाठी ही योजना असून याव्यतिरिक्त असंघटित गट, कंपनी आणि कर्मचारी गट इत्यादींना देखील एलआयसीच्या या योजनेचा फायदा मिळणार आहे.

समजा पॉलिसीधारकाचा अपघाती मृत्यू झाला तर कुटुंबाला आर्थिक मदत मिळेल. इतकेच नाहीतर पॉलिसी धारकावर जर कोणत्याही प्रकारचे कर्ज असेल तर ते या पॉलिसी मधून परत केले जाऊ शकते.

 काय आहेत एलआयसीच्या या योजनेचे फायदे?

1- एलआयसीचा या योजनेचा फायदा हा पन्नास किंवा त्यापेक्षा जास्त सदस्य असलेल्या गटांना मिळतो.

2- विमा रकमेचे पाच हजारापासून ते दोन लाख रुपयांपर्यंतचे जोखीम संरक्षण असते व ते प्रत्येक सदस्यांसाठी असते.

3- ही एक सिंगल प्रीमियम योजना आहे. सिंगल प्रीमियम म्हणजे ही योजना घेतल्यावर एकदाच प्रीमियम भरावा लागतो.

4- ही योजना जर तुम्ही निवडली तर यामध्ये तुम्हाला लवचिकता मिळू शकते. म्हणजेच या योजनेचा प्लॅन तुम्ही एक महिन्यापासून ते दहा वर्षापर्यंतच्या कालावधीसाठी निवडू शकता.

5- एखाद्या संस्थेमध्ये जर पती-पत्नी दोघेही काम करत असतील तर ते दोघेही संयुक्तपणे याचा लाभ घेऊ शकतात.

6- सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या योजनेचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर कोणत्याही प्रकारच्या वैद्यकीय चाचणीची आवश्यकता भासत नाही.

 मॅच्युरिटीचा बेनिफिट मिळत नाही

एलआयसीच्या या प्लॅनमध्ये मात्र मॅच्युरिटी लाभ मिळत नाही. सोप्या भाषेत सांगायचे म्हणजे पॉलिसीधारकाचा अपघातात मृत्यू झाला तरच कुटुंबातील सदस्यांना पॉलिसीची रक्कम मिळेल. अशा परिस्थितीमध्ये पॉलिसीची विमा रक्कम नॉमिनीला दिली जाईल. तसेच अपघाताव्यतिरिक्त इतर कारणांनी मृत्यू झाल्यास कमी रक्कम दिली जाते.

 या परिस्थितीमध्ये लाभ मिळत नाही

1- एखाद्या संस्थेतून किंवा गटातून जर एखाद्या व्यक्तीला बाहेर काढले किंवा संबंधित व्यक्तीने गट सोडला तर त्याची पॉलिसी आपोआप रद्द केली जाते.

2- या पॉलिसीसाठी असलेली विहित वयोमर्यादा ओलांडली तरी पॉलिसी रद्द केली जाते.

3- पॉलिसी सरेंडर केल्यानंतर फायदा मिळत नाही.

4- पॉलिसीची मुदत संपल्यावर यापासून मिळणारा लाभ मिळत नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe