सकाळी अंथरुणावरून उठताना केलेली ‘ही’ चूक देऊ शकते हार्ट अटॅकला निमंत्रण! असेल तुम्हाला अशी सवय तर पटकन करा बद्दल

आपण रात्रभर झोपलेलो असतो तेव्हा शरीर रात्रभर विश्रांती स्वरूपामध्ये असते व अचानक हालचाल एखाद्या वेळेस हृदय व  रक्ताभिसरण प्रणालीसाठी ते घातक ठरू शकते. तेव्हा आपण अचानक उठतो तेव्हा रक्तदाब वाढतो व हृदयावर अधिक ताण येऊन हृदयाला अधिक तान सहन करावा लागतो.

Ajay Patil
Published:
health tips

Health Tips:- सध्या आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक व्हिडिओ बघतो की यामध्ये कोणी जिम मध्ये असताना किंवा नाचताना किंवा ग्राउंड वर क्रिकेट वगैरे खेळताना अचानकपणे कोसळून मृत्यू झाल्याच्या घटना बघत असतो. त्यामुळे हार्ट अटॅक विषयी आता बऱ्याच जणांच्या मनामध्ये प्रचंड प्रमाणात भीती दिसून येते.

आजकालची जर आपण दैनंदिन जीवनशैली पाहिली तर ती अगदी धकाधकीची आणि तितकीच तणावपूर्ण अशी झालेली आहे. तसेच या धावपळीच्या जीवनशैलीमुळे व्यक्तीचे संतुलित आहाराकडे लक्ष नसून जंक फूड तसेच बाहेरील पदार्थ खाण्यावर मोठ्या प्रमाणावर भर दिसून येत आहे व यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवत आहे.

यामध्ये हृदयरोग म्हणजेच हार्ट अटॅक येण्याचे प्रमाण आता अगदी वीस वर्षाच्या तरुणांपासून दिसून येऊ लागल्याने नक्कीच ही एक गंभीर बाब आहे. या अनुषंगाने आपण जर बघितले तर जेव्हा आपण रात्री झोपलेलो असतो आणि सकाळी उठतो तेव्हा ते घाईघाईने उठणं कधी कधी आपल्या जीवावर देखील बेतू शकते.

जेव्हा आपण रात्रभर झोपलेलो असतो तेव्हा शरीर रात्रभर विश्रांती स्वरूपामध्ये असते व अचानक हालचाल एखाद्या वेळेस हृदय व  रक्ताभिसरण प्रणालीसाठी ते घातक ठरू शकते. तेव्हा आपण अचानक उठतो तेव्हा रक्तदाब वाढतो व हृदयावर अधिक ताण येऊन हृदयाला अधिक तान सहन करावा लागतो.

तसेच ज्या लोकांना हाय ब्लड प्रेशर ची समस्या असते त्यांच्यासाठी यामध्ये आणखी धोका निर्माण होऊ शकतो. विशेष म्हणजे या गोष्टीला डॉक्टर देखील दुजोरा देतात. त्यामुळे हळूहळू पण सुरक्षित पद्धतीने उठण्याचे सवय करावी व आरोग्याच्या समस्यांपासून दूर राहणे गरजेचे आहे.

 अचानक उठल्यामुळे काय समस्या निर्माण होऊ शकतात?

1- हृदयावर ताण येऊ शकतो जर तुम्ही अचानक उठले तर हृदयावर ताण येतो. याच्या मागील प्रमुख कारण म्हणजे संपूर्ण रात्रभर शरीर हे निवांत व आरामात असते व रक्ताभिसरण कमी गतीने सुरू असते.

अशा परिस्थितीमध्ये जर आपण अचानक पणे उठलो तेव्हा हृदयाला अधिक काम करावे लागते आणि त्यामुळे बीपी वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे सकाळी अचानकपणे न उठता थोडा वेळ काढून हळूहळू उठणे आरोग्यासाठी फायद्याचे ठरते.

2- रक्तदाब असंतुलित होऊ शकतो रात्री जेव्हा आपण झोपलेले असतो तेव्हा रक्तदाबाचा स्तर खूप कमी असतो आणि अचानक जर उठले तर बीपीमध्ये अचानकपणे वाढ होण्याची शक्यता संपवते.

अशा पद्धतीने जर अचानकपणे व घाईघाईने उठले तर शरीराला लागणारा झटका रक्ताभिसरणशी संबंधित समस्या वाढवू शकतो. त्यामुळे उठताना हलक्या हाताने उठून बसून रक्तदाब स्थिर होण्यास थोडा वेळ द्यावा.

3- चक्कर येऊ शकतात झोपलेल्या स्थितीतून अचानक उठून डायरेक्ट उभे राहिले तर रक्ताभिसरण प्रक्रिया सुरळीत होत नाही आणि याचा परिणाम म्हणून चक्कर येऊ शकतात. त्यामुळे अंथरणावरून उठताना शरीराला योग्य आधार द्यावा व एकदम उठण्याऐवजी हळूहळू बसून मगच उभे राहावे.

4- मेंदूला ऑक्सिजन मिळत नाही सकाळी अचानकपणे आणि घाईघाईने जर उठले तर मेंदूला पुरेसा ऑक्सिजन पोहोचत नाही. या उलट जर तुम्ही हळूहळू उठले तर मेंदूला आवश्यक प्रमाणामध्ये ऑक्सिजनचा पुरवठा होतो.

ज्यामुळे  चक्कर येणे किंवा डोकेदुखी यासारख्या समस्या कमी करता येऊ शकतात. त्यामुळे सोप्या भाषेत सांगायचे म्हटले म्हणजे सकाळी उठताना अचानकपणे न उठता शरीराला स्थिर करायला थोडा वेळ देणे गरजेचे आहे.

5- पचनक्रिया मध्ये बिघाड होऊ शकतो सकाळी जर लगेच उठले तर पचनक्रियेला देखील धक्का बसू शकतो. अचानकपणे उठल्यावर हालचाल केल्यास पोटातील गॅस्ट्रिक समस्या मध्ये वाढ होऊ शकते

व हळूहळू पाणी प्यायले आणि नंतरच हालचाल केली तर पचन सुधारण्यासाठी याचा फायदा होतो. त्यामुळे सकाळी उठण्याची पद्धत जर तुम्ही बदलली  तर आरोग्य सुधारते आणि दीर्घकालीन समस्या टाळता येऊ शकतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe