पैशांचे व्यवहार करा,परंतु जरा सांभाळून! उगीचच याल इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या रडारवर; जाणून घ्या संपूर्ण माहिती

भारतीय आयकर विभाग म्हणजेच इन्कम टॅक्स डिपार्टमेंट एक महत्त्वाचे खाते असून देशाचा आर्थिक डोलारा सांभाळण्याचे महत्त्वपूर्ण काम हे खाते करते असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या खात्याचे सामान्य नागरिकांपासून तर थेट मोठ्या मोठ्या उद्योगांवर पैशांच्या व्यवहारात लक्ष असते.

Ajay Patil
Published:
income tax rule

Income Tax Rule:- भारतीय आयकर विभाग म्हणजेच इन्कम टॅक्स डिपार्टमेंट एक महत्त्वाचे खाते असून देशाचा आर्थिक डोलारा सांभाळण्याचे महत्त्वपूर्ण काम हे खाते करते असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या खात्याचे सामान्य नागरिकांपासून तर थेट मोठ्या मोठ्या उद्योगांवर पैशांच्या व्यवहारात लक्ष असते.

या खात्याचे काही नियम किंवा कायदे असून त्यानुसारच आर्थिक व्यवहार करणे गरजेचे असते. नियमाच्या बाहेर किंवा कायद्याच्या बाहेर केलेले व्यवहार हे आयकर विभागाच्या रडारवर येऊ शकतात व नाहक तुम्हाला नोटीस किंवा इतर प्रक्रियेला तोंड द्यावे लागू शकते. सध्याचे युग पाहिले तर हे डिजिटल व्यवहारांचे युग आहे

परंतु डिजिटल व्यवहार करताना देखील तुम्ही काही नियम बाळगणे खूप गरजेचे आहे व असे नियम खूप महत्त्वाचे आहेत. त्यामुळे असे काही व्यवहार आहेत जे तुम्ही केले तर तुम्हाला आयकर विभागाची नोटीस देखील येऊ शकते व नाहक मानसिक त्रासाला सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे असे कोणते व्यवहार आहेत की जे करताना तुम्ही सावधगिरी बाळगणे खूप गरजेचे आहे किंवा तसे व्यवहार टाळणे तुमच्या हिताचे ठरते त्याबद्दलचीच माहिती या लेखात थोडक्यात बघू.

अशा प्रकारचे व्यवहार करा परंतु जरा सांभाळून

1- क्रेडिट कार्डद्वारे मोठ्या रकमेची रोख परतफेड- समजा तुम्ही क्रेडिट कार्डच्या माध्यमातून एखाद्या मोठ्या रकमेची रोख परतफेड केली तर तुमच्याकडून जे काही व्यवहार केले जातील त्यावर आयकर विभाग लक्ष ठेवून असतो.

तुम्ही क्रेडिट कार्डवर वार्षिक दोन लाखांपेक्षा जास्त खर्च केल्यास आयकर विभाग तुमच्यावर लक्ष ठेवतो व मोठे व्यवहार विभागाचे लक्ष वेधू शकतात.

2- प्रॉपर्टीत 30 लाख रुपयापेक्षा जास्त गुंतवणूक- समजा तुम्ही एखादी प्रॉपर्टी खरेदी केली व त्याची किंमत तीस लाख रुपये आहे किंवा त्यापेक्षा जास्त आहे तर अशा व्यवहाराची माहिती आपोआप आयकर विभागाला प्राप्त होत असते. त्यामुळे या गोष्टीत देखील नियमात राहून खरेदी विक्रीचा व्यवहार करणे फायद्याचे ठरते.

3- बँक खात्यात रोख रक्कम जमा करणे – बँकेत प्रत्येकाचे खाते असते व त्यामध्ये आपण बचत म्हणून काही पैसे ठेवत असतो. बँक खात्यामध्ये जर मोठ्या प्रमाणात रोख रक्कम जमा केली तर तुम्ही प्राप्तिकर विभागाच्या नजरेत येऊ शकतात. दहा लाख रुपयापेक्षा जास्तीची रक्कम जमा केली तर तुम्हाला आयकर विभागाची नोटीस देखील मिळू शकते.

4- रोख स्वरूपात होणारे व्यावसायिक व्यवहार- जे काही व्यावसायिक व्यवहार रोख स्वरूपात होत असतात त्याच्यावर देखील प्राप्तिकर विभागाची नजर असते. तुम्ही जर 50 हजार रुपये पेक्षा जास्त किमतीचे व्यावसायिक व्यवहार केले तर त्याची माहिती प्राप्तिकर विभाग तुमच्याकडून मागू शकतो.

5- म्युच्युअल फंड आणि शेअर्समधील गुंतवणूक- समजा तुम्ही दहा लाख रुपयापेक्षा जास्त किमतीचे म्युच्युअल फंड किंवा शेअर्स खरेदी केले. परंतु त्याचा उल्लेख किंवा आयटीआर मध्ये ते घोषित केले नाही तर तुमच्यावर कारवाई केली जाऊ शकते.

अशा प्रकारच्या गुंतवणुकीचा व्यवहार जर रोख स्वरूपात किंवा ट्रान्सफर किंवा चेकच्या माध्यमातून होत असेल तर त्याची माहिती देणे अनिवार्य आहे.

6- दुसऱ्या देशात फिरायला जाण्यावर होणारा खर्च- जेव्हा आपण दुसऱ्या देशात फिरायला जातो तेव्हा त्या देशाचे चलन आपल्याला खरेदी करावे लागते. अशाप्रकारे परकीय चलन खरेदी करताना जे काही व्यवहार होतात त्यावर देखील लक्ष ठेवले जात असते.

अशा प्रकारच्या व्यवहारांमध्ये रकमेची मर्यादा दहा लाख रुपयापर्यंत निश्चित करण्यात आली असून तुम्ही एका वर्षामध्ये परदेश प्रवासावर दोन लाखापेक्षा जास्त खर्च केला तर त्याची माहिती आयकर विभागाकडे सोपवली जाते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe