Formula For Pension Calculation:- आपल्याला माहित आहे की जेव्हा एखादा नोकरदार व्यक्ती सेवेतून निवृत्त होतो तेव्हा त्याला पेन्शन मिळायला सुरुवात होते व ही पेन्शन कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या माध्यमातून दिली जात असते. यामध्ये जेव्हा व्यक्ती सेवा कालावधीमध्ये असतो तेव्हा ईपीएस सेवानिवृत्ती योजनेच्या माध्यमातून कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना या पेन्शनचे व्यवस्थापन करत असते.
ईपीएस सेवानिवृत्ती योजना ही अतिशय महत्त्वाची असून संघटित क्षेत्रामध्ये जे काही कर्मचारी काम करतात त्यांच्याकरिता मूळ पगार+ डीए रकमेच्या 12% रक्कम प्रत्येक महिन्याला ईपीएफमध्ये जमा होते व तितकीच रक्कम व्यक्तीच्या कंपनीमध्ये काम करत असतो.त्या कंपनीच्या माध्यमातून जमा केली जात असते.
परंतु यामध्ये कंपनी जे काही योगदान देते ते दोन भागांमध्ये विभागले जात असते. कंपनीच्या एकूण कर्मचाऱ्यासाठी असलेले योगदानातून 8.33% रक्कम ही कर्मचारी पेन्शन योजनेत म्हणजेच ईपीएसमध्ये जमा होते तर 3.67% रक्कम प्रत्येक महिन्याला ईपीएफमध्ये जमा होत असते. अशा पद्धतीने हे सगळे कॅल्क्युलेशन असते.
ईपीएस अंतर्गत पेन्शन सुविधेचा लाभ घेण्यासाठी काय आहेत नेमक्या अटी?
कुठल्याही कर्मचाऱ्याला जर ईपीएस अंतर्गत पेन्शन सुविधेचा लाभ घ्यायचा असेल तर कर्मचाऱ्याने कमीत कमी दहा वर्षाकरिता तरी ईपीएसमध्ये त्याचे योगदान देणे गरजेचे असते.
म्हणजे सोप्या भाषेत सांगायचे म्हटले म्हणजे कर्मचाऱ्यांनी किमान दहा वर्षे नोकरी करणे गरजेचे आहे. तसेच पेन्शनपात्र सेवा ही 35 वर्ष इतकी आहे.अशाप्रकारे ईपीएस अंतर्गत कर्मचाऱ्यांना पेन्शन सुविधेचा लाभ दिला जातो.
तुम्हाला किती पेन्शन मिळेल हे कसे कॅल्क्युलेट कराल?
निवृत्तीनंतर म्हणजेच रिटायरमेंट नंतर ईपीएफओ कडून किती पेन्शन मिळेल याचे कॅल्क्युलेशन करण्याकरिता एक फार्मूला खूप फायद्याचा ठरतो. हा फार्मूला म्हणजे…
EPS= सरासरी पगार× पेन्शनयोग्य सेवा/70 हे सूत्र त्यासाठी खूप फायद्याचे ठरते. या सूत्रामधील आपण सरासरी पगार जर म्हटले तर त्यामध्ये कर्मचाऱ्याला मिळणारे मूळ वेतन अधिक त्यासोबत मिळणारा महागाई भत्ता म्हणजेच डीए अशी गणना होते व ही गणना गेल्या बारा महिन्याच्या आधारे केली जाते.
या सूत्रातील पेन्शन योग्य सेवा म्हणजे तुम्ही किती वर्ष नोकरी केली आहे किंवा काम केले आहे असा त्याचा अर्थ होतो व कमाल पेन्शन योग्य सेवा 35 वर्षे असते. हा फार्मूला जर उदाहरणावरून समजून घ्यायचा असला तर..
समजा पेन्शन पात्र वेतन जास्तीत जास्त पंधरा हजार रुपये असल्यास पेन्शनचा जास्तीत जास्त हिस्सा 15000×8.33= 1250 रुपये प्रति महिना इतका येतो.
तसेच जास्तीत जास्त योगदान आणि सेवा वर्षाच्या आधारावर ईपीएस पेन्शन कॅल्क्युलेशन जर समजून घ्यायचे असेल तर यामध्ये समजा तुमचा सरासरी पगार 15000 आहे आणि तुम्ही 35 वर्षे काम केले अशा स्थितीत वरील फॉर्मुल्यानुसार बघितले तर EPS=15000×35/70=75000 रुपये प्रति महिना होते.
म्हणजेच 15000 सरासरी पगार आणि 35 वर्षे जर काम केले असेल तर कर्मचाऱ्याला ईपीएफओ कडून जास्तीत जास्त 7500 पर्यंत पेन्शन मिळू शकते. तसेच कर्मचारी किमान 1000 रुपयापर्यंत देखील पेन्शन घेऊ शकतो. अशाप्रकारे या सूत्राचा वापर करून तुम्ही सरासरी पगार आणि नोकरीच्या एकूण वर्षाच्या आधारे तुमची पेन्शनची रक्कम मोजू शकतात.
तुम्ही जर दहा वर्षापेक्षा कमी कालावधी करिता काम केले असेल तर…
आपण पाहिले की ईपीएस अंतर्गत पेन्शन साठी जर पात्र ठरायचे असेल तर दहा वर्षे सेवा देणे गरजेचे असते.परंतु जर दहा वर्षापेक्षा कमी कालावधी करिता योगदान दिले आणि पुढे काम करण्याची योजना नसेल तर अशा परिस्थितीत कर्मचारी ईपीएफओची रक्कम तसेच ईपीएसमध्ये जमा केलेली रक्कम म्हणजेच पेन्शन खाते कोणत्याही वेळी काढू शकतो.