Kashmiri Apple Ber Cultivation:- शेती क्षेत्रामध्ये सध्या पारंपारिक पिकांऐवजी फळबाग लागवडीकडे मोठ्या प्रमाणावर कल असल्याचे आपल्याला दिसून येत आहे व फळबागांमध्ये अगदी स्ट्रॉबेरीपासून तर ड्रॅगन फ्रुट आणि अलीकडच्या कालावधीमध्ये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी सफरचंदाचा प्रयोग देखील यशस्वी केला आहे.
शेतीमध्ये करण्यात आलेल्या या पीक बदलला तंत्रज्ञानाची जोड देत कमीत कमी क्षेत्रामध्ये देखील जास्तीत जास्त उत्पादन मिळवत आणि बाजारपेठेचा अभ्यास करून केलेले सगळे नियोजन यामुळे लाखो रुपये उत्पन्नाच्या स्वरूपात मिळवणे शक्य झाले आहे.
या अनुषंगाने जर आपण इंदापूर तालुक्यातील शेतकरी रोहन मखरे यांची यशोगाथा बघितली तर यांनी शेतीमध्ये बदल करत काश्मिरी ॲपल बोर लागवडीची जोड देऊन एका एकरमध्ये लाखो रुपये उत्पन्न मिळवण्याची किमया साध्य केली आहे.
एक एकर क्षेत्रावर केली काश्मीर एप्पल बोरांची लागवड
याबाबत सविस्तर वृत्त असे की, पुणे जिल्ह्यात असलेल्या इंदापूर तालुका जर बघितला तर या परिसरातील शेतकरी आता आधुनिक शेती करू लागले असून मोठ्या प्रमाणावर फळबाग लागवडीकडे वळले आहेत. या परिसरामध्ये प्रामुख्याने पेरू तसेच आंबा, चिकू व डाळिंब सारखे फळांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर या ठिकाणचे शेतकरी येतात.
परंतु याही पुढे पाऊल टाकत या परिसरातीलच शेतकरी रोहन मखरे यांनी मात्र एक एकर क्षेत्रावर काश्मिरी ॲपल बोरांची लागवड केली आहे. त्या मात्र या काश्मिरी एप्पल बोरांचे त्यांना उत्पादन मिळायला लागले असून आतापर्यंत जवळपास दोन लाख रुपयांच्या बोरांची विक्री त्यांनी केली आहे.
कसं केले काश्मिरी एप्पल बोर लागवडीचे नियोजन?
जेव्हा त्यांनी काश्मिरी ॲपल बोराची लागवड करण्याचे ठरवले तेव्हा त्याकरिता त्यांनी एक एकर क्षेत्रावर लागवड करावी असे निश्चित केले व त्याकरिता नऊ बाय बारा इतक्या अंतरावर जवळपास 450 काश्मिरी एप्पल बोरांच्या रोपांची लागवड केली. ही रोपे त्यांनी कोलकाता येथून खरेदी केली व 40 रुपये प्रतिरोप या दराने त्यांना रोपे मिळाले.
त्यानंतर शेणखत, कीटकनाशक व बुरशीनाशक तसेच लागवडीपासून तर इतर कामांसाठी लागणारी मजुरी व इतर असा सर्व खर्च एकरी 50 ते 60 हजार रुपयापर्यंत आला. मागच्या वर्षी एप्पल बोरांना दर कमी मिळाला व तेव्हा त्यांना दोन ते अडीच लाख रुपये उत्पन्न हे एका एकरमध्ये मिळाले होते.
परंतु यावर्षी जरा बाजारामध्ये काश्मिरी ॲपल बोरांसाठी सकारात्मक परिस्थिती असून स्थानिक बाजारात चांगली मागणी आहेच. परंतु त्यासोबत सोलापूर तसेच हैदराबाद,पुण्यासारख्या बाजारामध्ये देखील चांगली मागणी असल्याने जर दर चांगला मिळत आहे व आतापर्यंत मखरे यांनी पाच टन बोरांची विक्री केली आहे व त्यातून त्यांना दोन लाखांपेक्षा जास्त उत्पन्न मिळाले आहे.
जर आपण एप्पल बोरांच्या बाजारपेठेतील मागणी बघितली तर ती प्रामुख्याने जानेवारी व फेब्रुवारी महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येते. परंतु बोरांची आवक मात्र या काळात खूपच कमी होते. परंतु मखरे यांनी बागेचे नियोजन असे केले आहे की अजून त्यांच्या बोरांचे उत्पादन पुढील अडीच महिन्यापर्यंत सातत्याने चालू राहील.
सध्या या काश्मीर एप्पल बोराला बाजारपेठेत 45 ते 50 रुपये प्रतिकिलोचा सरासरी दर मिळत आहे. हाच दर जर टिकून राहिला तर येणाऱ्या कालावधीत त्यांना 20 टनपेक्षा जास्त बोरांचे उत्पादन मिळेल अशी अपेक्षा असून त्या माध्यमातून आठ ते दहा लाख रुपये एकूण उत्पन्न मिळेल अशी देखील अपेक्षा त्यांना आहे.