सांगली जिल्ह्यातील शेतकरी 50 एकर भाजीपाला शेतीतून वर्षाला घेतो 8 कोटी रुपयांचे उत्पन्न! भन्नाट आहे नियोजन

आज जर आपण शेतीकडे बघितले तर अगोदर असलेला उदरनिर्वाह पूर्ती शेती आणि शेतीच्या परंपरागत पद्धती आणि पारंपारिक पिके काळाच्या ओघात चुटकीसरशी मागे फेकले गेले असून आज शेतकरी तंत्रज्ञानाच्या जोरावर विविध फळबागांची लागवड आणि भाजीपाला पिकांचे उत्पादन घेऊन कमीत कमी क्षेत्रामध्ये लाखो रुपयांचे उत्पादन घेत आहेत.

Ajay Patil
Published:
chilli crop

Farmer Success Story:- कशाला नोकरी? आपली शेतीच भारी! हे म्हणण्याची वेळ आता आलेली आहे व याला कारणीभूत ठरले शेतीमध्ये विकसित झालेले नवनवे तंत्रज्ञान आणि या तंत्रज्ञानाचा वापर शेतीमध्ये करण्याचा शेतकऱ्यांचा दृष्टिकोन हा होय.

आज जर आपण शेतीकडे बघितले तर अगोदर असलेला उदरनिर्वाह पूर्ती शेती आणि शेतीच्या परंपरागत पद्धती आणि पारंपारिक पिके काळाच्या ओघात चुटकीसरशी मागे फेकले गेले असून आज शेतकरी तंत्रज्ञानाच्या जोरावर विविध फळबागांची लागवड आणि भाजीपाला पिकांचे उत्पादन घेऊन कमीत कमी क्षेत्रामध्ये लाखो रुपयांचे उत्पादन घेत आहेत.

इतकेच नाही तर आजकालची तरुणाई शेतीकडे आता मोठ्या प्रमाणावर वळताना दिसून येत आहे व या तरुणाईच्या माध्यमातून अनेक अशक्य अशा गोष्टी शेतीमध्ये शक्य केल्या जात आहेत. जवळपास आता येणाऱ्या काही वर्षांमध्ये भारतीय शेती ही हायटेक पद्धतीचे होईल असे एक सकारात्मक चित्र आपल्याला दिसून येते.

शेतीमधून कोटी रुपयांचे उत्पन्न घेणारे देखील शेतकरी भारतामध्ये आहेत हे आपल्याला माहिती आहे. अगदी याच प्रमाणे व्यवस्थित नियोजन आणि तंत्रज्ञानाचा वापर करून

जत तालुक्यातील रामपूर या गावचे प्रयोगशील शेतकरी शशिकांत शिवाजीराव काळगी तब्बल 40 ते 50 एकर शेतीमध्ये भाजीपाला पिकांचे उत्पादन घेऊन वर्षाला आठ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवतात. एवढ्या मोठ्या क्षेत्राचे नियोजन जर बघितले तर नक्कीच ते इतर शेतकऱ्यांना प्रेरणादायी आणि कौतुकास्पद म्हणावे असेच आहे.

शशिकांत काळगे भाजीपाला पिकातून वर्षाला घेतात आठ कोटींचे उत्पन्न
याबाबत सविस्तर वृत्त असे की,जत तालुक्यात असलेल्या रामपूर या गावचे प्रगतिशील आणि महाराष्ट्र शासनाचा पंजाबराव देशमुख कृषिभूषण पुरस्कार प्राप्त शेतकरी शशिकांत शिवाजीराव काळगी यांच्याकडे 80 एकरपेक्षा जास्त बागायत जमीन आहे.

त्यातून जवळपास 50 एकर शेतीमध्ये ते टोमॅटो,आले आणि सिमला मिरचीचे उत्पादन घेतात. यासोबतच मिरची तसेच हळद व द्राक्ष लागवड देखील त्यांनी केली असून या पिकांचे देखील भरघोस उत्पादन मिळवून चांगले आर्थिक उत्पन्न मिळवतात.

शशिकांत काळगी यांचे जर आपण सिमला मिरचीचे व्यवस्थापन बघितले तर नक्कीच कौतुकास्पद असे आहे. चाळीस एकर क्षेत्रामध्ये ते सिमला मिरचीची लागवड करतात. सिमला मिरचीच्या लागवडीसाठी आवश्यक असणारी रोपे ते भोसे येथील नर्सरीतून प्रतिरोप 2 रुपये या दराने खरेदी करतात.

सिमला मिरचीची लागवड केल्यानंतर साधारणपणे पाच महिन्यानंतर ती काढणीला येते व त्यानंतर उत्तम असे विक्री व्यवस्थापन करून त्या मिरचीची विक्री केली जाते. साधारणपणे 62 ते 65 रुपये प्रति किलोचा दर मिळवण्यामध्ये ते यशस्वी होतात. जवळपास सात महिन्याच्या कालावधीत काळगी हे सिमला मिरचीचे तब्बल पंधराशे टन इतके उत्पादन घेतात. म्हणजेच एका एकरला 50 टन मिरचीचे उत्पादन ते मिळवतात.

या सगळ्या क्षेत्राचे नियोजन करण्यासाठी 70 महिला त्यांच्याकडे कामाला आहेतच व एक मॅनेजर देखील त्यांनी ठेवला आहे. सिमला मिरचीचे व्यवस्थापन करताना चांगली दर्जेदार मिरची वेगळी केली जाते व ती पॅकिंग बॉक्समध्ये भरली जाते व व हे बॉक्स विक्रीसाठी राजस्थान तसेच मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि गोवा इत्यादी राज्यांमध्ये पाठवतात.

बऱ्याचदा ते वीस एकर मध्ये सिमला मिरचीची लागवड करतात व बाकीची 20 एकर जमिनीमध्ये वर्षभर कोणतेही पीक घेत नाहीत व वर्षभर पुन्हा ती जमीन उन्हात तापू देतात. एक वर्षानंतर त्या वीस एकरमध्ये टोमॅटो, आले तसेच सिमला मिरची अशी विविध भाजीपाला पिकांची लागवड करतात.

म्हणजे साधारणपणे जर वर्षातील बारा महिने बघितले तर त्यातील नऊ महिने त्यांचे या सर्व पिकांचे नियोजन सुरू असते. परिसरातील स्थानिक व्यापारी व बाहेरील राज्यातील व्यापारी यांची मागणी ते पूर्ण करतात. या सगळ्या भाजीपाला पिकांच्या माध्यमातून वर्षाला त्यांना आठ कोटींचे उत्पन्न मिळत आहे.

या सगळ्या मोठ्या व्यवसायाच्या नियोजनामध्ये शेती क्षेत्रामध्ये शिक्षण घेतलेल्या त्यांचा मोठा मुलगा व इंजिनिअर असलेला लहान मुलगा योगेश यांची मोठी मदत होते. जत तालुका जर आपण बघितला तर कायम दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो व अशा तालुक्यात इतक्या उत्तम पद्धतीने शेती करणारे शशिकांत काळगी हे इतर शेतकऱ्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe