भाड्याच्या जमिनीवर हळद लागवड करून हा शेतकरी एकरी कमवतो 4 लाख! कसे ते वाचा?

असे म्हणतात की इच्छा असेल तर मार्ग दिसतो व हे वाक्य तितके खरे देखील आहे. जोपर्यंत एखाद्या गोष्टीविषयी माणसाच्या मनामध्ये इच्छा निर्माण होत नाही तोपर्यंत व्यक्ती कुठलीही गोष्ट करत नाही. परंतु नुसती इच्छा मनामध्ये निर्माण होऊन चालत नाही तर ती इच्छा पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेले कष्ट व प्रयत्नांमधील सातत्य देखील तितकेच आवश्यक असते.

Ajay Patil
Published:
manjit sing

Farmer Success Story:- असे म्हणतात की इच्छा असेल तर मार्ग दिसतो व हे वाक्य तितके खरे देखील आहे. जोपर्यंत एखाद्या गोष्टीविषयी माणसाच्या मनामध्ये इच्छा निर्माण होत नाही तोपर्यंत व्यक्ती कुठलीही गोष्ट करत नाही. परंतु नुसती इच्छा मनामध्ये निर्माण होऊन चालत नाही तर ती इच्छा पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेले कष्ट व प्रयत्नांमधील सातत्य देखील तितकेच आवश्यक असते.

एखादी कुठलीही गोष्ट करण्यासाठीची जर इच्छा मनामध्ये तयार झाली तर ती पूर्ण करण्यासाठी जर आपली कुठल्याही पद्धतीचे काम करण्याची तयारी असेल तर यश नक्कीच मिळते व ती इच्छा देखील पूर्ण होते.

अगदी याच मुद्द्याला धरून जर आपण फरिदकोटच्या कोटकपुरा येथील वय वर्ष 59 वर्षे असलेले भूमीहीन शेतकरी मनजीत सिंग यांचे यशोगाथा बघितली तर ती नक्कीच या मुद्द्याला साजेशी देखील आहे व इतर शेतकऱ्यांना प्रेरणादायी देखील आहे.

यांनी कष्टाच्या जोरावर भाडेतत्त्वावर जमिनी घेऊन व एकरी ऐंशी हजार रुपये भाडे देऊन त्या जमिनीवर हळद लागवड केली व दरवर्षी त्यातून प्रति एकर चार लाख रुपये पर्यंत कमाई केली आहे. त्यांचीच यशोगाथा आपण या लेखात बघणार आहोत.

मनजीत सिंग यांची यशोगाथा
मनजीत सिंह हे पदवीधर असून एक कुशल असे टाइपिस्ट देखील आहेत. परंतु अगदी जेव्हा ते लहान होते तेव्हापासून त्यांना शेतीची आवड होती. त्यांचे कुटुंबाच्या व्यवसाय हा शेती व्यवसाय होता व त्यांच्याकडे अडीच एकर जमीन होती.

परंतु साधारणपणे 1980 या वर्षी मनजीत सिंह यांच्या आईला दीर्घ स्वरूपाचा आजार झाला व त्यांच्या उपचाराकरिता त्यांना जमिन विकावी लागली. अशा पद्धतीने त्यांच्याकडे जमीन विकली गेल्याने ते भूमीहीन झाले.

परंतु पुढे उदरनिर्वाहासाठी मनजीत सिंह यांनी पंजाब कृषी विद्यापीठासोबत कापूस आणि बासमती तांदूळ या पिकांसाठीच्या एकात्मिक कीड व्यवस्थापन प्रकल्पासाठी काम केले

व नंतर एका बहुराष्ट्रीय कीटकनाशक कंपनीमध्ये देखील काम करायला सुरुवात केली. या दोन्ही ठिकाणाच्या नोकरीचे स्वरूप किंवा कामाचे स्वरूप हे शेतीशी निगडित असल्याने त्यांना शेतीसंबंधी अनेक अनमोल असे अनुभव मिळाले.

तेव्हा त्यांना वाटायला लागले की आता आपण स्वतः शेती करावी. परंतु त्यांच्याकडे शेती नसल्यामुळे त्यांनी 1990 मध्ये छोट्या स्वरूपात शेती भाड्याने घ्यायला सुरुवात केली व तेव्हापासून 2010 पर्यंत ते हळद व इतर नगदी पिकांची लागवड करण्याकरिता मोठ्या प्रमाणावर शेती भाडेतत्त्वावर घेऊन आता शेती करत आहेत.

मनजीत सिंह हे भाडेतत्त्वावर घेतलेल्या बऱ्याच मोठ्या क्षेत्रावर देशी हळद आणि पंजाब कृषी विद्यापीठाने विकसित केलेली हळदीची पीएच एक या जातीची लागवड करतात व त्यासोबतच स्वतः घरी तयार केलेले बियाणे देखील वापरतात. ते नुसते हळद पिकवत नाहीत तर त्यापासून हळद पावडर बनवतात व आंतरराष्ट्रीय ऑर्डर मिळवून आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील विक्री करतात.

शेती क्षेत्रातील मोठे ज्ञान आणि मिळालेले अनुभव या जीवावर त्यांनी इतर शेतकऱ्यांना देखील खूप मोठ्या प्रमाणावर मार्गदर्शन केले असून इतर शेतकऱ्यांसाठी ते शेती सल्लागार बनले आहेत. म्हणून त्यांना खेती दा डॉक्टर असे टोपण नाव मिळाले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe