उपवासाची भगर खाल्ल्याने १०० जणांना विषबाधा

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,19 ऑक्टोबर 2020 :- उपवासाची भगर खाल्ल्याने सुमारे शंभर गावकऱ्यांना विषबाधा झाली. राहुरी तालुक्यातील म्हैसगाव येथे शनिवारी रात्री हा प्रकार घडला. त्रास जाणवू लागल्यानंतर उपचार घेण्यासाठी चांगलीच धावपळ उडाली.

नवरात्रामुळे उपवासाच्या पदार्थांची खरेदी वाढली आहे. म्हैसगाव पंचक्रोशीतील गावकऱ्यांनी स्थानिक दुकानदाराकडून भगर खरेदी केली होती.

शनिवारी रात्री भगर खाल्ल्यानंतर अनेकांना उलट्या व जुलाबाचा त्रास होऊ लागला. रविवारी सकाळपर्यत विषबाधा झालेल्या गावकऱ्यांची संख्या १०० पर्यंत जाऊन पोहोचली होती.

या घटनेमुळे गावकऱ्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले. तथापि, रविवारी दुपारी दोनपर्यंत आरोग्य, तसेच महसूल प्रशासनातील जबाबदार अधिकारी घटनास्थळी फिरकले नाहीत.

म्हैसगाव येथील दुकानदारांनी राहुरी फॅक्टरी येथील होलसेल किराणा व्यापाऱ्याकडून भगर खरेदी केली होती, अशी माहिती मिळाली.

कालबाह्य झालेले किराणा सामान व खाद्यपदार्थांची विक्री करून लोकांच्या जीविताला धोका निर्माण केला जात असताना अन्न व औषध प्रशासनाचे होणारे दुर्लक्ष संशयास्पद ठरले आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment