यंदा फुलांच्या दरात चार पटीने वाढ ‘हे’ आहे कारण !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,25 ऑक्टोबर 2020 :- शनिवारी नगरच्या बाजारात झेंडू दीडशे ते अडीचशे रुपये किलो दराने विकला गेला तर शेवंतीच्या फुलांची देखील दीडशे ते दोनशे रुपये किलो दराने विक्री झाली. विशेष म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा फुलांच्या दरात चार पटीने वाढ झाली आहे.

दसऱ्याचा सणाच्या पूर्वसंध्येला नगर शहरातील बाजार समितीत सकाळी झेंडू, शेवंती, अस्टरच्या फुलांची आवक झाली. मात्र भाव मोठ्या प्रमाणात कडाडलेले होते. गेल्या पंधरा दिवसात जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पावसामुळे शेतीच्या पिकांबरोबरच फुलांच्या शेतीचे देखील मोठे नुकसान झाले आहे.

विशेषतः फुलांचे आगार असलेल्या पारनेर व नगर तालुक्यात फुलशेती पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे जृी काही शिल्लक फुले होती ती बाजारात विक्रीसाठी शेतकऱ्यांनी आणली होती. मात्र आणलेली फुले ही अत्यंत कमी प्रमाणात होती. बाजारात आवक कमी झाल्यामुळे शनिवारी फुलांचे भाव प्रचंड वाढले होते.

नगर शहरात झेंडू दीडशे ते अडीचशे रुपये किलो दराने विकला गेला. शेवंतीची फुले दीडशे तीनशे रुपये किलो दराने विकली गेली. अस्टरची फुले अडीचशे ते तीनशे रुपये किलो दराने विकले गेले. दसऱ्याच्या सणाला विशेष महत्त्व असलेल्या आपट्याची पाने देखील बाजारात विक्रीसाठी आली होती.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment