निवडणुकीनंतर समज-गैरसमज झाले, पण आता ते सगळे संपले – खासदार सुजय विखे

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,28 ऑक्टोबर 2020 :- नगर जिल्ह्यात रस्त्यांची वाट लागली आहे. जिल्ह्यात दोन मंत्री आहेत. एक प्रत्यक्षात मंत्री आहेत, तर दुसरे मंत्र्यासारखेच आहेत. दोघांच्याही मतदारसंघातून मोठे महामार्ग नगर शहराकडे येतात, पण आजवर त्या रस्त्यांसाठी त्यांनी किती निधी आणला ते सांगावे.

सगळीकडे खड्डेच खड्डे आहेत, अशी टीका खासदार सुजय विखे यांनी केली आहे खासदार विखे म्हणाले, सध्याचे मुख्यमंत्री सत्तेत नव्हते, त्यावेळी एकरी ५० हजार भरपाई द्या अशी मागणी करत होते, पण आता सत्तेवर आल्यानंतर शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसून मोकळे झाले. केंद्राकडे ३८ हजार कोटी येणे आहे असे सांगत आहेत.

मी ते ३८ हजार कोटी आणतो, तुम्ही ते सगळे शेतकऱ्यांना देणार का, तेवढे जाहीर करा. आज सत्ताधारी जी काही भूमिपूजने करत आहेत, त्यांची मंजुरी भाजप सरकारच्या काळातील आहे. विधानसभा निवडणुकीनंतर समज-गैरसमज झाले, पण आता ते सगळे संपले आहे. कर्डिले यांनी मला मुलगा समजून सगळे काही समजून घेतले आहे.

यापुढे आम्ही एकत्र राहणार असून पुढे काय काय होते त्याचे परिणाम दिसून येतील. साकळाई योजनेच्या सर्व्हेसाठी आम्ही अडीच कोटी दिले होते, पण ते सुद्धा अजून देण्यात आलेले नाहीत. लवकरच साकळाईसाठी लढा उभारू, असे विखे म्हणाले. कारखानदारांची बँक अशी ओळख असणाऱ्या सहकारी बँक आता शेतकऱ्यांची बँक अशी ओळख झाली आहे.

कोणत्याही शेतकऱ्याची अडवणूक करू नका. खेळते भांडवल कर्ज प्रकरणात कोणीही वंचित रहाणार नाही याबाबत काळजी घेण्याच्या सूचना कर्डिले यांनी यावेळी केल्या.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment