शिर्डी : शिर्डी शहरातील श्रीसाई निवारण आश्रम परिसरात हैदराबाद येथील एका अल्पवयीन मुलीला शिर्डी येथे तिच्या नातेवाईकाने आणले होते. यावेळी मुलीचा नातेवाईक असलेला पीजूस कांतीलाल चक्रवर्ती, रा. खरिदाबाद, हैदराबाद याने या मुलीवर अत्याचार केला.
याबाबत जर कोणाला काही सांगितले तर खून करील, अशी धमकी त्याने दिली. कालपिीडित मुलीने शिर्डी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून पीजूस कांतीलाल चक्रवर्ती याच्याविरोधात भा. दं. वि. ३७६, बालकाचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा कलम ८, १२ पोस्कोप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चक्रवर्ती याला अटक करण्यात आली असून, घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी भेट दिली असून, पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक मिथून घुगे हे करीत आहेत.
- Ahilyanagar Kotwal Jobs 2025: अहिल्यानगर जिल्ह्यात ‘कोतवाल’ पदाच्या 158 जागांसाठी भरती सुरू; लगेच अर्ज करा
- कोणत्याही महिन्याच्या ‘या’ तारखांना जन्मलेल्या मुली लग्नाचा विषय निघाला की लगेचच पळ काढतात ! स्वभाव कसा असतो?
- सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर ; आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर महागाई भत्ता समवेत ‘हे’ 3 भत्ते वाढणार !
- श्रावण महिन्यात तुळशीला मंजिरी येण्याचा अर्थ काय?, यामागील शुभ संकेत समजून घ्या!
- पुणे – अहिल्यानगर प्रवास फक्त 90 मिनिटात ! महाराष्ट्रात तयार होणार 11,000 कोटी रुपयांचा नवा रेल्वे मार्ग, कसा असणार रूट?