अहमदनगर Live24 टीम, 11 जानेवारी 2021 :- राहता शहरातील नागरिकांना सकाळी सकाळी वाहतूक कोंडीच्या समस्यांला सामोरे जावे लागले, शहरात हे सगळे घडत असताना पोलीस प्रशासन मात्र आपल्या ठाण्यात निवांत होते.
नागरिकांच्या या समस्येबाबत त्यांचा निष्काळजीपणा पुन्हा एकदा जनतेच्या समोर आला आहे. दरम्यान काल रविवारी सकाळी नऊच्या सुमारास शहरातील मध्यवर्ती ठिकाणी शिवाजी चौकात एक मालवाहू ट्रक डिझेल संपल्यामुळे रस्त्यातच बंद पडला.
त्यामुळे नगर-मनमाड रोडवर शिर्डी व नगरच्या बाजूने मोठमोठ्या लांबच लांब रांगा लागल्याने शहरात वाहतूक ठप्प झाली होती. रविवारचा दिवस असल्याने शिर्डी येथे साई दर्शनासाठी येणार्या भाविकांना तसेच मोठ्या अवजड वाहनांची वाहतूक याच मार्गे सुरू असल्याने सुमारे दोन तास अडकून पडावे लागले होते.
यावेळी शहरातील नागरिक वीरभद्र महाराज यांच्या दर्शनासाठी जात असताना बंद पडलेल्या मालवाहतूक ट्रकची चौकशी करून समय सूचकता दाखवून व नागरिकांच्या मदतीने तो ट्रक रस्त्याच्या एका बाजूला ढकलून वाहतूक सुरळीत करण्यात आली. सदर मालवाहतूक ट्रक हा पूर्ण क्षमतेने मालाने भरलेला होता.
इतर वाहन चालक व बघ्यांनी कुठलीही हालचाल केली नव्हती. तसेच पोलिसही फिरकले नसल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक ठप्प झाली होती. वाहतूक पूर्ववत सुरू झाल्यामुळे उपस्थित नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, all rights reserved