श्रीरामपूरच्या नगराध्यक्ष अनुराधा आदिक यांनी केली ही मोठी घोषणा !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 31 जानेवारी 2021 :- श्रीरामपूर शहरातील सर्व प्रभागांमध्ये ‘घर तेथे डांबरी रस्ता’ बनवला जाणार असून नजीकच्या काळात शहरातील सर्व रस्ते दुरूस्त करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे नगराध्यक्ष अनुराधा आदिक यांनी सांगितले.

मेनरोडसह इतर रस्त्यांची दुरुस्ती सुरू करण्यात आली आहे. आदिक म्हणाल्या, कोरोनामुळे वर्षभर कामे होऊ शकली नाही. आता कामांना प्रारंभ झाला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठ्या प्रमाणात निधी दिला आहे. मेनरोडचे काम अंतिम टप्यात आहे.

शिवाजी रोड, संगमनेर रोडचे कामही सुरू करत आहोत. सर्वच प्रभागांतील विकासकामांना प्रारंभ झाला आहे. शहर सुंदर बनवण्यासाठी सर्वांचा सहभाग महत्त्वाचा ठरणार आहे. यावेळी ज्येष्ठ नगरसेवक बाळासाहेब गागंड, भाऊसाहेब डोळस, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख डॉ. महेश क्षीरसागर, नगरसेवक राजेद्र पवार, जितेंद्र छाजेड, प्रकाश ढोकणे,

रवी पाटील, रईस जहागिरदार, अल्तमश पटेल, हंसराज आदिक, रवी खिलारी, चंद्रकात संगम, निखील सानप, नयन गांधी, नानाभाऊ गांगड, मधुकर देशमुख, नंदलाल गंगवाल, ऋुषिकेश नवले, ज्ञानेश्वर पटारे, यांच्यासह महिला उपस्थित होत्या.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe