टाळे ठोको आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हा

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 05 फेब्रुवारी 2021:- वीजपुरवठा खंडित करण्याचा निर्णय त्वरीत मागे घ्यावा, या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने शुक्रवार दि. ५ फेब्रुवारी २०२१ रोजी वीज कंपनीच्या विरोधात पुकारलेल्या ‘टाळे ठोको’ आंदोलनात

सर्व वीज ग्राहक आणि शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन भाजपाचे ज्येष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे.

राज्यातील ७२ लाख वीज जोडण्यांचा वीजपुरवठा खंडित करण्याच्या जुलमी निर्णयाला विरोध करण्यासाठी आंदोलन होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात आमदार विखे म्हणाले, कोरोना काळात जनतेला वीज बिल माफीचे आश्वासन देणारे सरकार आता सक्तीने वीज बिल वसूली करून जनतेला नाहक त्रास देत आहे.

थकीत बिल भरले नाही तर वीज पुरवठा खंडीत करण्याची धमकी देणारे हे सरकार किती असंवेदनशील आहे हे यावरून दिसून येते. मात्र, आम्ही या आघाडी सरकारला मनमानी कारभार करू देणार नाही.

भाजपाचे सर्व कार्यकर्ते वीज ग्राहक शेतकरी रस्त्यावर उतरून शांततेत आंदोलन करतील. गावपातळीवर असलेल्या वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाना टाळे ठोकून,

वीज पुरवठा खंडीत करण्यास येणाऱ्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांना अटकावही करतील असा इशारा आ.विखे पाटील यांनी दिला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment