अहमदनगर Live24 टीम, , 05 फेब्रुवारी 2022 :- शेतात सुरू असलेले पॉलीहाऊसचे काम का करू देत नाही, असे विचारल्याचा राग येऊन अकोळनेर येथील अश्विनी सचिन भोर या महिलेस शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी नगर तालुका पोलिस ठाण्यात महीलेच्या फिर्यादीवरून २ जणांवर अदखलपत्र गुन्हा दाखल करण्यात आला.
अकोळनेर येथील फिर्यादी महिला अश्विनी सचिन भोर यांच्या शेतात पॉलिहाऊसचे काम सुरू असताना १८ जानेवारी रोजी विकास रखमाजी भोर आणि राजेंद्र रखमाजी भोर यांनी कामगारांना तुम्ही येथे काम करावयाचे नाही,
असे सांगितल्याने फिर्यादी महिलेने आरोपी यांना पॉलीहाऊसचे काम का करू देत नाही, असे विचारले. याचा राग आल्याने दोन्ही आरोपींनी फिर्यादी महिलेस शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली.
याप्रकरणी अश्विनी सचिन भोर यांच्या फिर्यादीवरून विकास रखमाजी भोर आणि राजेंद्र रखमाजी भोर यांच्या विरोधात नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.