महिलेस मारहाण करून जिवे मारण्याची‎ धमकी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, , 05 फेब्रुवारी 2022 :- शेतात सुरू असलेले पॉलीहाऊसचे‎ काम का करू देत नाही, असे विचारल्याचा राग‎ येऊन अकोळनेर येथील अश्विनी सचिन भोर या‎ महिलेस शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी‎ दिल्याप्रकरणी नगर तालुका पोलिस ठाण्यात‎ महीलेच्या फिर्यादीवरून २ जणांवर अदखलपत्र‎ गुन्हा दाखल करण्यात आला.

अकोळनेर येथील‎ फिर्यादी महिला अश्विनी सचिन भोर यांच्या शेतात‎ पॉलिहाऊसचे काम सुरू असताना १८ जानेवारी‎ रोजी विकास रखमाजी भोर आणि राजेंद्र रखमाजी‎ भोर यांनी कामगारांना तुम्ही येथे काम करावयाचे‎ नाही,

असे सांगितल्याने फिर्यादी महिलेने आरोपी‎ यांना पॉलीहाऊसचे काम का करू देत नाही, असे‎ विचारले. याचा राग आल्याने दोन्ही आरोपींनी‎ फिर्यादी महिलेस शिवीगाळ करत जिवे मारण्याची‎ धमकी दिली.

याप्रकरणी अश्विनी सचिन भोर‎ यांच्या फिर्यादीवरून विकास रखमाजी भोर आणि‎ राजेंद्र रखमाजी भोर यांच्या विरोधात नगर तालुका‎ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.‎