धक्कादायक आरोप…राजू शेट्टी यांनी साखर कारखान्याबरोबर सेटलमेंट केली

अहमदनगर Live24 टी म, 22 सप्टेंबर 2021 :- गेल्या काही दिवसांपूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी ऊसाला मिळणाऱ्या एफआरपीसाठी मोठं आंदोलन उभं केलं होतं. मात्र आता राजू शेट्टी यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप करण्यात आले आहे. यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. थकित रक्कम मुदतीपेक्षा जादावेळ थकल्यास त्याला 15 टक्के जादा व्याजदर देण्याची तरतूद आहे. … Read more

मनोहर मामाकडून कोणाची फसवणूक झाली असेल तर…

अहमदनगर Live24 टी म, 22 सप्टेंबर 2021 :- संत श्री बाळूमामांचा अवतार असल्याचे भासवत फसवणूक करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसले प्रकरणात “आणखी कोणाची फसवणूक झाली असल्यास त्यांनी न घाबरता पुढे यावे व तक्रार द्यावी आलेल्या तक्रारीची चौकशी करून पुढील कारवाई केली जाईल,” असे आवाहन पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी केले आहे. पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी मंगळवारी … Read more

गुरुमाऊली उच्चाधिकार समितीच्या जिल्हाध्यक्षपदी विठ्ठल फुंदे

अहमदनगर Live24 टी म, 22 सप्टेंबर 2021 :- महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ व अहमदनगर जिल्हा गुरुमाऊली मंडळ प्रणित उच्चाधिकार समितीच्या जिल्हाध्यक्षपदी पाथर्डीचे तरुण तडफदार आणि संघटक नेते विठ्ठलराव फुंदे यांची निवड करण्यात आली. कार्यकारी अध्यक्ष म्हणून कर्जतचे अनिल टकले यांची तर कार्याध्यक्ष म्हणून राहात्याचे मारुती गायकवाड व सरचिटणीस म्हणून श्रीरामपूरचे बाबाजी सगाजी डुकरे यांची सर्वानुमते … Read more

थकबाकीदारांकडून वसुली करण्याचे आवाहन

अहमदनगर Live24 टी म, 22 सप्टेंबर 2021 :- नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथील विविध कार्यकारी सेवा सह. सोसायटीची वार्षिक सर्वसाधरण सभा संस्थेचे चेअरमन संतोष फलके यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी व्हा.चेअरमन शिवाजी फलके, सोसायटीचे सदस्य तथा ग्रामपंचायत सदस्य पै.नाना डोंगरे, साहेबराव बोडखे, अण्णा जाधव, भारत फलके, अरुण काळे, मच्छिंद्र जाधव, अनिल फलके, द्रोपदाबाई कापसे, सुनिल कापसे, … Read more

महसूलमंत्री म्हणाले…केंद्रांनी केलेले कायदे हे शेठ लोकांकरिता

अहमदनगर Live24 टी म, 22 सप्टेंबर 2021 :- कृषी विरोधी कायद्याविरोधात देशात गेल्या अनेक महिन्यांपासून आंदोलन सुरु आहे. या कायद्याला अनेक शेतकरी संघटनांनी विरोध केला आहे. याच अनुषंगाने बोलताना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. शेतकरी हा धर्म आहे. केंद्र सरकारने केलेले कायदे हे ‘शेठ’ लोकांकरिता आहेत. त्यामुळे पंजाबच्या शेतकर्‍यांनी केंद्र सरकारच्या विरोधात … Read more

अवैध धंदे कायमस्वरूपी बंद न झाल्यास ‘हे’ सरपंच आमरण उपोषण करणार

अहमदनगर Live24 टी म, 22 सप्टेंबर 2021 :- कोपरगाव तालुक्यातील पोहेगांव परीसरात सुरु असलेल्या अवैध धंद्यांबाबत आता ग्रामस्थ देखील आक्रमक झाले आहे. या परिसरातील अवैध धंदे तात्काळ बंद न झाल्यास पोहेगाव दुरक्षेत्र येथे सोमवार दि.२७ सप्टेंबर २०२१ रोजी सकाळी १० वाजेपासून ग्रामस्थांना बरोबर घेत सरपंच अमोल औताडे यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. याबाबत शिर्डी पोलीस … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : नागरिकांना सतर्कतेचा इशारा ! ३२६९२ क्यूसेक पाण्याचा विसर्ग…

अहमदनगर Live24 टी म, 22 सप्टेंबर 2021 :- मंगळवार,दि.२२.०९.२०२१- कोपरगाव तालुक्यातून वाहणाऱ्या गोदावरी नदीस नांदूरमध्यमेश्वर येथून आज सायंकाळी उशिरा ३२६९२ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असून त्यामुळे पाणी साठ्यामध्ये अजून वाढ होण्याची शक्यता आहे. अशी माहिती कोपरगांवचे तहसीलदार श्री.विजय बोरूडे यांनी दिली आहे. नागरिकांनी तालुका प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. … Read more

शिक्षिकेचे धूमस्टाईलने मिनी गंठण लांबविले

अहमदनगर Live24 टी म, 22 सप्टेंबर 2021 :- कोपरगाव शहरात चोऱ्यांचे सत्र सुरू झाले आहे. शहरातील डॉ.सी.एम.मेहता कन्या विद्यालयात दुचाकीवर आलेल्या दोघा अज्ञात चोरट्यांनी 15 ग्रॅम वजनाचे साठ हजार रुपये किंमतीचे मिनी गंठण धूमस्टाईलने लांबविल्याची घटना बुधवारी (ता.22) सकाळी सव्वा नऊ वाजेच्या सुमारास घडली आहे. याबाबत शहर पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, शहरातील डॉ.सी.एम.मेहता कन्या … Read more

९ कोटी रुपये खर्च करून उभारलेल्या पाणी योजनेतून गावाला दूषित पाणी पुरवठा

अहमदनगर Live24 टी म, 22 सप्टेंबर 2021 :- राहुरी तालुक्यातील २० हजार लोकसंख्या असलेल्या टाकळीमियाॅ गावात शासनाने ९ कोटी २७ लाख रुपये खर्च करून करण्यात आलेली पिण्याच्या पाण्याची योजना कार्यान्वित झाली असुन हि योजना पूर्णत असफल झाली असुन संपुर्ण गावाला पिण्यासाठी दुषित पाणी होत असुन मोठ्या प्रमाणात आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्र त्यामुळे जीवन … Read more

कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता आमदारांच्या तालुक्यातील १२ गावे बंदचा आदेश

अहमदनगर Live24 टी म, 22 सप्टेंबर 2021 :- राज्यात कोरोनाबाधितांची संख्या घटत असली तरी मात्र नगर जिल्ह्यात कोरोना आकडेवारी वाढतच आहे. यामुळे प्रशासनाच्या चिंतेत देखील दिवसेंदिवस भर पडत आहे. दरम्यान जिल्ह्याती पारनेर तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढतो आहे. तालुक्यातील वाढती करोना बाधितांची संख्या पाहाता तालुक्यातील १२ गावे बंद करण्याचे आदेश प्रशासनाने काढले आहेत. तीन ऑक्टोबरपर्यंत ही … Read more

धक्कादायक ! भेसळीसाठी ‘तो’ चक्क दुधात तेल व पावडर मिसळत होता

अहमदनगर Live24 टी म, 22 सप्टेंबर 2021 :- भेसळयुक्त दुधाचा व्यापार करणाऱ्या संकलन केंद्रावर छापा टाकत दुधाचे साहित्य जप्त करण्यात आले. अकोले तालुक्यातील जांभळे येथे ही छापेमारी झाली. यामुळे दूध भेसळ प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.दुध संकलन करणाऱ्या योगेश चव्हाण यास दुधात तेल व पावडर भेसळ करुन दुध संकलन करत असतांना रंगेहात पकडले आहे. अहमदनगर … Read more

….म्हणून ‘त्या’ रिक्षाचालकांकडून दंड आकारला जाणार नाही

अहमदनगर Live24 टी म, 22 सप्टेंबर 2021 :- फिटनेस प्रमाणपत्र व इन्शुरन्स थकीत असलेल्या रिक्षांवर कारवाई करू नये, अशी मागणी रिक्षा चालक संघटनेच्या वतीने उपप्रादेशिक परिवहन अधिकारी ऊर्मिला पवार यांच्याकडे करण्यात आली होती. या मागणीला यश आले असून ज्या रिक्षाचालकांचे लॉकडाऊन काळात फिटनेस इन्शुरन्स थकलेले आहेत, त्यांना दंड आकारला जाणार नाही, असे आश्वासन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर आकडेवारी

अहमदनगर Live24 टी म, 22 सप्टेंबर 2021 :- अहमदनगर: जिल्ह्यात आज ७४७ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख २८ हजार ५८२ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.५७ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ८४८ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

Ahmednagar News : बाळ बोठे याचा जामीन अर्ज नामंजूर ! वाचा आज कोर्टात काय घडले ?

अहमदनगर Live24 टी म, 22 सप्टेंबर 2021 :- सामाजिक कार्यकर्त्या आणि यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या खून खटल्यातील मुख्य आरोपी आणि एका प्रथितयश दैनिकाच्या नगर आवृत्तीचा संपादक डॉ बाळ बोठे याचा जामीन अर्ज जिल्हा आणि सत्र न्यायाधीश कुडतरकर यांनी फेटाळला. शहरातील सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे या यशस्विनी महिला ब्रिगेड तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : आमदार संग्राम जगताप अडचणीत ! आमदार व त्यांच्या प्रचार करणाऱ्या तरुणांवर गुन्हा …..

अहमदनगर Live24 टी म, 22 सप्टेंबर 2021 :-  जाहिरनाम्यातून आयटी पार्कचे खोटे आश्‍वासन देणार्‍या शहराच्या आमदारावर व त्यांच्या प्रचार करणाऱ्या तरुणांवर गुन्हा दाखल व्हावा -संदीप भांबरकर जिल्हा न्यायालयात आमदार संग्राम जगताप व प्रचार करणाऱ्या सर्व तरुण यांच्यावर पुराव्यानिशी खासगी दावा दाखल गुरुवारी प्रथम सुनावणी व मुख्य निवडणुक आयोगाकडे हीं तक्रार दाखल. विधानसभा निवडणुकीत जाहीरनाम्यात मतदारांना खोटे … Read more

ट्रॅक्टरने नांगर फिरवून आदिवासी बांधवांनी आपला ताबा व जमीनीचा हक्क केला सिध्द

अहमदनगर Live24 टी म, 22 सप्टेंबर 2021 :- आदिवासींच्या जमीनी परत मिळण्यासाठी पिपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदच्या पुढाकाराने तर आदिवासी समाजबांधवांच्या सहभागाने मौजे खडकवाडी (ता. पारनेर) येथून आदिवासी काळीआई मुक्तीसंग्रामची सुरुवात करण्यात आली. बिगर आदिवासी असलेल्या धनदांडग्यांनी आदिवासींच्या जमीनीच्या ताब्याला हरकत घेऊन त्रास देण्यास सुरुवात केली होती. यावेळी आदिवासी बांधवांनी आंदोलनाच्या माध्यमातून ट्रॅक्टरने नांगर फिरवून आपला … Read more

जीएनजी पाईपलाईन खोदकाम करतांना कामगाराचा मृत्यू

अहमदनगर Live24 टी म, 22 सप्टेंबर 2021 :-  कोल्हार खुर्द हायवे रस्त्यावर सी.एन.जी.पाईपलाईनचे खोदकाम करता असतांना एका कामगाराचा मृत्यू झाला. या मृत्यूची चौकशी होवून संबंधित ठेकेदार व सुपरवायझर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागणीचे निवेदन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्यावतीने जिल्हा पोलिस अधिक्षक यांना देण्यात आले. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब पगारे, युवक जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटोळे, जिल्हा सचिव … Read more

नूतन शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांचे सेवानिवृत्त शिक्षक संघाच्यावतीने स्वागत

अहमदनगर Live24 टी म, 22 सप्टेंबर 2021 :- शिक्षक हा समाजाचा आरसा आहे, शिक्षण देतांना ते विद्यार्थी नव्हे तर देशाचे सक्षम नागरिक घडविण्याचे काम करत असतात. प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त झाल्यावर प्रशासकीय प्रश्न सोडविणे हे क्रमप्राप्त आहे. त्यामुळे निवृत्त शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्न प्राधान्यांनी सोडविण्याचा आपण प्रयत्न करु, असे आश्वासन नूतन माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांनी दिले. सेवानिवृत्त … Read more