अहमदनगर Live24 टी म, 22 सप्टेंबर 2021 :- राज्यात कोरोनाबाधितांची संख्या घटत असली तरी मात्र नगर जिल्ह्यात कोरोना आकडेवारी वाढतच आहे. यामुळे प्रशासनाच्या चिंतेत देखील दिवसेंदिवस भर पडत आहे.

दरम्यान जिल्ह्याती पारनेर तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढतो आहे. तालुक्यातील वाढती करोना बाधितांची संख्या पाहाता तालुक्यातील १२ गावे बंद करण्याचे आदेश प्रशासनाने काढले आहेत.

तीन ऑक्टोबरपर्यंत ही १२ गावे बंद ठेवण्यात येणार आहे. मंगळवारी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी पारनेर तालुक्यातील पारनेर ग्रामीण रुग्णालयासह टाकळी ढोकेश्वर ग्रामीण रुग्णालय व कान्हुर पठार प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन आरोग्य यंत्रणेची पाहणी केली.

ही १२ गावे बंद ठेवण्याचा प्रशासनाचा आदेश :- भाळवणी, ढवळपुरी, वडनेर बुद्रुक, निघोज, कान्हुर पठार, दैठणे गुंजाळ, वडगाव सावताळ, जामगाव, रांधे, पठारवाडी, कर्जुले हर्या, वासुंदे या प्रमुख गावांसह सर्व गावातील आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे.