file photo

अहमदनगर Live24 टी म, 22 सप्टेंबर 2021 :- कोपरगाव तालुक्यातील पोहेगांव परीसरात सुरु असलेल्या अवैध धंद्यांबाबत आता ग्रामस्थ देखील आक्रमक झाले आहे.

या परिसरातील अवैध धंदे तात्काळ बंद न झाल्यास पोहेगाव दुरक्षेत्र येथे सोमवार दि.२७ सप्टेंबर २०२१ रोजी सकाळी १० वाजेपासून ग्रामस्थांना बरोबर घेत सरपंच अमोल औताडे यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.

याबाबत शिर्डी पोलीस स्टेशनला लेखी निवेदन देण्यात आले असून निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यातील पोहेगाव परिसरातील अवैध धंदे बंद करणे बाबत व पोलीस दुरक्षेत्र नियमितपणे सुरु करणेबाबत कार्यवाही न झाल्यास उपोषण करणार असे शिर्डी पोलीस स्टेशनला कळवले होते.

याबाबत शिर्डी पोलिस स्टेशनचे तत्कालीन पोलीस निरीक्षक देवरे यांनी वरील मागण्यांबाबत लेखी पत्र देऊन अश्वासित केले होते. मात्र अद्यापही कार्यवाही झाली नाही.

परिणामी आजही सदरचे पोलीस दुरक्षेत्र बंद अवस्थेत असुन पोहेगाव व परिसरातील अवैध धंदे व बेकायदेशीर होणारी दारू विक्री जोमाने सुरूच आहे.

वरील मागण्यांचा तातडीने विचार केला नाही तर पोहेगाव दुरक्षेत्र येथे आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा सरपंच औताडे यांनी दिला आहे.