गुरुमाऊली उच्चाधिकार समितीच्या जिल्हाध्यक्षपदी विठ्ठल फुंदे

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टी म, 22 सप्टेंबर 2021 :- महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ व अहमदनगर जिल्हा गुरुमाऊली मंडळ प्रणित उच्चाधिकार समितीच्या जिल्हाध्यक्षपदी पाथर्डीचे तरुण तडफदार आणि संघटक नेते विठ्ठलराव फुंदे यांची निवड करण्यात आली.

कार्यकारी अध्यक्ष म्हणून कर्जतचे अनिल टकले यांची तर कार्याध्यक्ष म्हणून राहात्याचे मारुती गायकवाड व सरचिटणीस म्हणून श्रीरामपूरचे बाबाजी सगाजी डुकरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष दत्ता पाटील कुलट यांच्या अध्यक्षतेखाली आणि नाशिक विभागीय सरचिटणीस सत्यवान मेहेर यांच्या निरीक्षणाखाली झालेल्या सभेत ही निवड करण्यात आली.

जिल्हा संघाचे अध्यक्ष बापूसाहेब तांबे, कार्यकारी अध्यक्ष गोकुळ कळमकर, गुरुमाऊली मंडळाचे जिल्हाध्यक्ष राजकुमार साळवे, शिक्षक बँकेचे चेअरमन सलीमखान पठाण, व्हा चेअरमन बाबा खरात , माजी चेअरमन संतोष दुसुंगे , साहेबराव अनाप, राजूभाई राहणे,महिला आघाडीच्या राज्य प्रतिनिधी विद्युल्लता आढाव, जिल्हाध्यक्षा अंजली मुळे आदींच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही निवड जाहीर करण्यात आली.

अहमदनगर जिल्हा गुरुमाऊली मंडळ प्रणित उच्चाधिकार समितीची कार्यकारिणी पुढील प्रमाणे : जिल्हाध्यक्ष – विठ्ठल फुंदे (पाथर्डी), कार्यकारी अध्यक्ष – अनिल टकले (कर्जत), कार्याध्यक्ष – मारुती गायकवाड (राहाता), सरचिटणीस – बाबाजी डुकरे (श्रीरामपूर), कोषाध्यक्ष – रामकृष्ण मेहेत्रे (पारनेर), कार्यालयीन चिटणीस – विकास बगाडे (जामखेड), जालिदंर बढे (संगमनेर), उपाध्यक्ष – निवृत्ती गोरे (शेवगाव),

अनिल नलगे (श्रीगोंदा), सदस्य – बाळासाहेब बिन्नर (अकोले), अण्णासाहेब मेढे (राहुरी), बाळासाहेब डाके (नेवासा), मनोहर शिंदे (कोपरगाव), भाऊसाहेब वाकचौरे (अकोले), अंतोन पवार (नगर), विस्तारित कार्यकारिणीमध्ये उर्वरित नावे नंतर जाहीर केली जाणार आहेत. याप्रसंगी नूतन अध्यक्ष विठ्ठल फुंदे म्हणाले, जिल्ह्यात संघ आणि बापू तांबे यांच्या नेतृत्वाखालील गुरुमाऊली मंडळ भक्कम करण्यासाठी

तसेच शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी जिल्हाध्यक्ष म्हणून आपण काम करू. या कामी जिल्ह्यातील सर्व शिक्षक बंधू-भगिनींनी सहकार्य करावे. बापूसाहेब तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा संघ भक्कमरित्या कार्यरत आहे. जिल्ह्यातील चौदा तालुक्यामध्ये शाखा असणारी आणि जिल्हा संघाची स्वतंत्र कार्यकारिणी असणारी अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ ही एकमेव संघटना आहे.

इतर संघटनांना आपल्या अनेक तालुक्यांमध्ये कार्यकारिणी साठी माणसं सुद्धा मिळत नाही तरी त्या मोठ्या वल्गना करतात ही हास्यास्पद बाब आहे असे ही ते म्हणाले. शिक्षक बँकेच्या विद्यमान संचालक मंडळाने केलेल्या आदर्श कारभारामुळे आगामी निवडणुकीत बापूसाहेब तांबे

यांच्या नेतृत्वाखालील गुरुमाऊली मंडळ पुन्हा एकदा स्वबळावर सत्तेत येईल असे उच्चाधिकार समितीचे कार्यकारी अध्यक्ष अनिल टकले यांनी सांगितले. नूतन कार्यकारिणीचे जिल्हाभरातून सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.