थकबाकीदारांकडून वसुली करण्याचे आवाहन

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टी म, 22 सप्टेंबर 2021 :- नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथील विविध कार्यकारी सेवा सह. सोसायटीची वार्षिक सर्वसाधरण सभा संस्थेचे चेअरमन संतोष फलके यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

यावेळी व्हा.चेअरमन शिवाजी फलके, सोसायटीचे सदस्य तथा ग्रामपंचायत सदस्य पै.नाना डोंगरे, साहेबराव बोडखे, अण्णा जाधव, भारत फलके, अरुण काळे, मच्छिंद्र जाधव, अनिल फलके, द्रोपदाबाई कापसे, सुनिल कापसे, आशाबाई ठाणगे, लहू गायकवाड आदी संचालक उपस्थित होते.

संस्थेचे सचिव विजय सोनवणे यांनी इतिवृत्ताचे वाचन करुन शासकीय विविध योजनांची माहिती दिली व कर्ज भरणार्‍या सभासदांचे आभार मानले.

सहाय्यक मनोहर गायकवाड यांनी उपस्थितांचे स्वागत केले. तसेच संचालक पै. नाना डोंगरे यांची सरपंच परिषदेच्या नगर तालुका सचिवपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा ठराव घेऊन त्यांचा सोसायटीच्या वतीने सत्कार करण्यात आला. या सभेत थकबाकी संदर्भात चर्चा करुन वसुली करण्याचे आवाहन करण्यात आले.

सभासदांच्या अडी-अडचणी संदर्भात चर्चा करुन शेतकर्‍यांना जास्तीत जास्त कर्ज देण्याचा संकल्प करण्यात आला. तसेच बैठकिस बाबा जाधव, संजय फलके, कादरभाई शेख, अशोक कापसे, बाळू जाधव, मयुर काळे, बळवंत खळदकर, भागचंद जाधव आदी सोसायटीचे सभासद उपस्थित होते.