Car Loan Tips: सणासुदीत लोन घेऊन कार घ्यायचे आहे का? अगोदर ‘हा’ फार्मूला समजून घ्या व नंतर कार घ्या! होईल फायदा

सणासुदीच्या कालावधीमध्ये लोन घेऊन कार घ्यायची असेल तर त्या अगोदर तुम्हाला 20-4-10 चा नियम किंवा फार्मूला माहीत असणे खूप गरजेचे आहे.हा फार्मूला जर तुम्ही समजून घेतला तर तुम्हाला किती किमती पर्यंत कार घ्यावी किंवा त्यासाठी किती कर्ज घ्यावे इत्यादीची संपूर्ण आयडीया येते.

Ajay Patil
Updated:
car loan

Car Loan Tips:- स्वतःची चारचाकी घरा समोर उभी राहणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते व त्यामुळे आयुष्यामध्ये व्यक्ती चारचाकी घेण्यासाठी म्हणजेच कार घेण्यासाठी प्रयत्न करत असतो. तसेच आता कार घेणे बऱ्याच प्रकारे सोपे झाले आहे. अनेक बँकांच्या माध्यमातून सहजतेने तुम्ही कार लोन घेऊन कार खरेदी करू शकतात व तुमचं स्वप्न पूर्ण करू शकता.

परंतु कर्ज घेतले म्हणजे त्याची परतफेड आपल्याला करणे गरजेचे असते व ती आपली जबाबदारी देखील असते. परंतु कर्ज घेणे अगोदर काही गोष्टी समजून घेणे खूप गरजेचे असते. भविष्य काळामध्ये आपल्याला आर्थिक दृष्टिकोनातून त्रास होऊ नये हे खूप महत्त्वाचे असल्याकारणाने सारासार विचार करूनच कार लोन घेणे फायद्याचे ठरते.

तुम्हाला देखील या सणासुदीच्या कालावधीमध्ये लोन घेऊन कार घ्यायची असेल तर त्या अगोदर तुम्हाला 20-4-10 चा नियम किंवा फार्मूला माहीत असणे खूप गरजेचे आहे.हा फार्मूला जर तुम्ही समजून घेतला तर तुम्हाला किती किमती पर्यंत कार घ्यावी किंवा त्यासाठी किती कर्ज घ्यावे इत्यादीची संपूर्ण आयडीया येते.

 कार लोन घेण्याअगोदर महत्त्वाचा आहे 24-4-10 चा नियम

1- डाऊन पेमेंटच्या संदर्भात जर आपण हा नियम बघितला तर यानुसार कार खरेदी करताना तुम्हाला डाऊन पेमेंट करणे गरजेचे असते. या नियमानुसार बघितले तर या नियमातील वीस हा अंक दर्शवतो की तुम्ही कार खरेदी करताना कमीत कमी 20 टक्के किंवा त्यापेक्षा अधिकची रक्कम डाऊन पेमेंट साठी करणे गरजेचे आहे. तुमच्याकडे कार किमतीच्या 20 टक्के रक्कम डाऊन पेमेंट साठी असेल तर या फार्मल्यानुसार तुमच्यासाठी ते फायद्याचे ठरते.

2- कारलोन परतफेडीचा कालावधी संदर्भात जर आपण हा नियम बघितला तर यातील चार हा अंक दर्शवतो की तुम्ही कार लोन घेताना ते चार वर्षे किंवा त्यापेक्षा कमी कालावधीसाठी घेणे गरजेचे आहे.

म्हणजेच कर्ज घेण्याचा कालावधी किंवा कर्ज परतफेडीचा कालावधी कमाल चार वर्ष असावा. सोप्या भाषेत सांगायचे म्हटले म्हणजे तुम्ही चार वर्षाच्या आत घेतलेले लोन परतफेड करू शकाल तितक्याच रकमेची कार घ्यावी.

3- कार लोनच्या ईएमआय संदर्भात या नियमानुसार जर बघितले तर यातील दहा अंक दर्शवतो की तुमचा कार लोनचा ईएमआय हा तुमच्या मासिक पगाराच्या दहा टक्क्यांपेक्षा कमी असावा. ईएमआय शिवाय यामध्ये इतर वाहतूक खर्च म्हणजेच इंधन आणि मेंटेनन्स खर्च देखील समाविष्ट आहे.

हा सगळा खर्च तुमच्या पगाराच्या दहा टक्क्यांपेक्षा कमी असावा. अशाप्रकारे या तिन्ही गोष्टी जर तुमच्या जुळत असतील तरच तुम्ही कार लोन घ्यावे किंवा कार लोन घेऊन कार खरेदी करणे तुमच्यासाठी फायद्याचे राहील.

 कार खरेदी करण्याअगोदर याही गोष्टी फायद्याच्या ठरतील

1- तुम्हाला जर कार खरेदी करायची असेल तर अपग्रॅडेड मॉडेल खरेदी करण्याऐवजी तुम्ही बेस मॉडेल खरेदी करू शकतात. त्यामध्ये प्रमुख कारण म्हणजे बेस मॉडेल तुम्हाला अपग्रेडेड मॉडेल पेक्षा स्वस्तात पडेल.

2- तसेच तुम्ही जर मागील वर्षातील उरलेल्या नवीन कार पैकी एखादे मॉडेल घेतले तर ते तुम्हाला स्वस्तात मिळू शकते.

3- समजा तुमच्याकडे जर अगोदरच कार असेल तर काही दिवस तीच कार वापरणे तुमच्यासाठी सोयीस्कर आणि फायद्याचे ठरते. कारण बचतीसाठी जुनी कार असताना नवीन कार घेणे फायद्याचे ठरत नाही.

4- तसेच तुमचा बजेटच कमी असेल तर नवीन कार खरेदी करण्यापेक्षा तुम्ही जुनी कार खरेदी करू शकता.

5- सगळ्यात महत्वाचे म्हणजे तुम्हाला जर कार लोन घेऊन कार खरेदी करायची असेल तर जास्तीत जास्त डाऊन पेमेंट करण्याचा प्रयत्न करा.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe