Soybean Bajarbhav : गेल्या पाच दिवसात सोयाबीनच्या दरात थोडीशी घसरण पाहायला मिळत आहे. सोयातेल सोयापेंड आणि पामतेलाच्या किमती दबावात असल्याने सोयाबीनचे दर नरमले असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयातेल सोयापेंड आणि पामतेलाच्या किमती दबावात असल्याने देशांतर्गत सोयाबीनच्या दरात 200 ते 300 रुपयांची घसरण झाली आहे.
खाद्यतेलाच्या किमती कमी झाल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या किमती लक्षणीय कमी झाल्यात. दरम्यान चीनमधून सोयाबीनची मागणी वाढली असल्याने सोयाबीन दराला आधार मिळत असून सोयाबीनच्या किमती अपेक्षित अशा कमी झाल्या नाहीत.
असे असले तरी पामतेलाच्या किमतीत चढ-उतार पाहायला मिळत आहे. यामुळे याचा दबाव सोयाबीनवर पाहायला मिळत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन तेल, सोया पेंड आणि पाम तेलाच्या किमतीत होत असलेली घसरण पाहता देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या किमती दबावत आहेत. गेल्या पाच दिवसांपासून देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या किमतीत चढ-उतार पाहायला मिळत आहे.
आज गेल्या आठवड्याशी तुलना केली असता सोयाबीनच्या किमतीत 200 ते 300 रुपयांची घसरण झाली आहे. आज महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला 5300 ते 5500 रुपये प्रति क्विंटल पर्यंतचे बाजार भाव मिळाले आहेत. दरम्यान असे असले तरी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी थोडीशी दिलासादायक बातमी समोर येत आहे. जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार सोयाबीनच्या किमती जरी गेल्या पाच दिवसात घसरत असल्या तरी देखील सोयाबीनच्या किमती जास्त घसरणार नाहीत.
जाणकार लोकांच्या मते या हंगामात सोयाबीनला पाच हजार रुपये प्रति क्विंटल ते सहा हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा सरासरी बाजारभाव मिळणार आहे. अशा परिस्थितीत सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांनी बाजारपेठेचा आढावा घेत आणि पाच हजार रुपये प्रति क्विंटल ते 6000 रुपये प्रति क्विंटल एवढा सरासरी बाजार भाव ध्यानात ठेवून सोयाबीनची विक्री करत राहणे त्यांच्यासाठी फायदेशीर राहणार आहे.
निश्चितच गेल्या पाच दिवसात सोयाबीनच्या किमतीत तीनशे रुपयांपर्यंतची घसरण झाली असली तरी शेतकऱ्यांनी चिंता न करता पाच हजार रुपये ते 6000 रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळेल याबाबत शाश्वत राहण्याची आवश्यकता आहे. शेतकऱ्यांनी पॅनिक न होता सोयाबीन विक्री करत रहावे असा सल्ला जाणकार देत आहेत.