अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : 24 तासांत विक्रमी रुग्ण वाढ !

अहमदनगर Live24 टीम, 3 एप्रिल 2021 :-   अहमदनगर जिल्ह्यात  कोरोना रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. पुण्यातही कडक निर्बंध झाले आहेत. नगरचीही त्याच दिशेने वाटचाल सुरू आहे. आज विक्रमी संख्येने कोरोनाबाधित आढळले. ही आकडेवारी याच गतीने सुरू राहिल्यास नगरमध्ये ही कडक निर्बंध लागू शकतात.  अहमदनगर जिल्ह्यात गेल्या 24 तासात तब्बल 1996 रुग्ण आढळले आहेत नगर शहरात सर्वाधिक … Read more

शिवाजी महाराजांनी रयतेच्या कल्याणासाठी स्वराज्य उभे केले -निकिता वाघचौरे

अहमदनगर Live24 टीम, 3 एप्रिल 2021 :- शहरातील भिस्तबाग चौकात परिस फाऊंडेशन या सामाजिक संस्थेच्या कार्यालयात तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी लक्ष्मी दुलम, रमाकांत सोनी व दिनेश दुलम यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी संदीप वाघचौरे, दिपक वाघचौरे, प्रिका अकोलकर, अनिता चोपडे, फाऊंडेशनच्या अध्यक्षा निकिता … Read more

नगरमधील सक्रिय रुग्णांची संख्या आठ हजारांच्या पार

अहमदनगर Live24 टीम, 3 एप्रिल 2021 :- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरु आहेत. मात्र जिल्ह्यात रुग्ण सापडत असून त्याचे नियोजन करण्यात प्रशासन व्यस्त झालेले आहे. दरम्यान नगर जिल्ह्यात दरदिवशी कोरोनाबाधितांची आकडेवारी वाढू लागल्याने नगरमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या देखील वाढली आहे. नगर -शहरासह जिल्ह्यात करोनाने फास आवळण्यास सुरुवात केली आहे. एकाच दिवसात तब्बल 1 हजार … Read more

बेजबाबदार नागरिकांकडून पोलिसांनी वसूल केला 56 लाखांचा दंड

अहमदनगर Live24 टीम, 3 एप्रिल 2021 :- करोना नियमांचे उल्लंघन करणार्‍यांकडून पोलीस प्रशासनाने मोठा दंड वसूल केला आहे. यामध्ये 19 फेब्रवारी ते 01 एप्रिल या 42 दिवसांच्या कालावधीत 26 हजार 896 केसेस करून 56 लाख 32 हजार 200 रूपयांचा दंड वसूल केला आहे. मध्यंतरी आटोक्यात आलेल्या करोना संसर्गाने फेब्रुवारीत पुन्हा डोेके वर काढले. लग्न सोहळा, धार्मिक … Read more

कोरोना चाचणीचा अहवाल लवकरात लवकर उपलब्ध देण्यासाठी आंदोलन

अहमदनगर Live24 टीम, 2 एप्रिल 2021 :-जिल्हा रुग्णालयात कोरोना चाचणीचा अहवाल येण्यासाठी सहा ते सात दिवस विलंब लागत असल्यामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांची संख्या वाढली असल्याचा आरोप करुन,कोरोना चाचणीचा अहवाल एका दिवसात मिळण्याच्या मागणीसाठी अखिल भारतीय छावा मराठा संघटनेच्या वतीने जिल्हा शल्यचिकित्सकांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन करण्यात आले. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पोखरणा यांनी लवकरच एका दिवसात … Read more

LIVE Updates : राज्यात लॉकडाऊन नाही वाचा काय म्हणाले मुख्यमंत्री…

अहमदनगर Live24 टीम, 2 एप्रिल 2021 :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज रात्री जनतेशी संवाद साधला.  कडक निर्बंध लावावे लागतील, उद्या परवा जाहीर करु, गर्दी टाळावी लागेल, ऑफिसेसना नियमावली हवी, बसना नियम, रेल्वे, बस तुडुंब आहेत. परिस्थिती हाताबाहेर गेली तर ब्राझीलसारखा शुकशुकाट दिसेल –  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रोजगारही गेला आणि जीवही गेला. तसं होऊ नये. येत्या … Read more

महापालिकेच्या तिजोरीत मार्च अखेरीस ५८ कोटी रुपये जमा

अहमदनगर Live24 टीम, 2 एप्रिल 2021 :-कोरोनामुळे करासह कर्ज वसुलीवरही परिणाम झाला. मात्र कोरोनाच्या संकट काळातही नागरिकांनी महापालिकेचा कर भरला. थकीत करावरील शास्ती माफ केल्यामुळे २०२०-२१ या आर्थिक वर्षात महापालिकेच्या तिजोरीत मार्चअखेरीस ५८ कोटी रुपये जमा झाले आहेत. महापालिकेने थकीत करावरील ७५ टक्के शास्ती माफ करण्याचा निर्णय नोव्हेंबरमध्ये जाहीर केला होता. ही सवलत १५ डिसेंबर पर्यंत … Read more

नगरकरांनो लक्ष द्या; शहराचा पाणी पुरवठा झाला विस्कळीत

अहमदनगर Live24 टीम, 2 एप्रिल 2021 :-नगर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या याेजनेतील मुख्य व जुनी जलवाहिनीला गळती सुरू झाली आहे. तसेच मुळानगर पाणीपुरवठा याेजनेला वीजपुरवठा करणाऱ्या वीजवाहिनीच्या देखभाल दुरुस्तीसाठी शनिवारी शटडाऊन घेतले जाणार आहे. त्यामुळे शनिवार, रविवार व साेमवार या तीन दिवस शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत राहणार आहे. नगर शहराचा तीन दिवस पाणीपुरवठा विस्कळीत हाेणार असल्याने नागरिकांनी पाण्याचा … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील परिस्थिती चिंताजनक एकाच दिवसात तब्बल 1800 रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 2 एप्रिल 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात आज ६४५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ८८ हजार ४७३ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९०.२४ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत १८०० ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ८३३५ इतकी … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले तब्बल इतके रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 2 एप्रिल 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्णांसह मृत्यूचा आकडा वाढल्याने चिंता वाढली आहे. नव्या रुग्णांचा आजही विस्फोट झाला असून एकूण 18०० नवीन कोरोना रुग्णांची भर पडली. त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील परिस्थिती दिवसेंदिवस खराब होत असल्याचे दिसत आहे. 24 तासांमध्ये 1 हजार 800 जणांना काेराेना संसर्गाचे निदान झाले. नगर शहरात सर्वाधिक 456 रुग्ण … Read more

डुप्लिकेट चावीने लॉक उघडले आणि रोकड केली लंपास

अहमदनगर Live24 टीम, 1 एप्रिल 2021 :- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव जसजसा वाढू लागला आहे. तसतसं जिल्ह्यात चोरीच्या घटना देखील वाढू लागल्या आहेत. नुकतेच शहरातील गाझीनगरमध्ये चोरटयांनी डुप्लिकेट चावीने लॉक उघडून घरातील 66 हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे. याबाबत मुजाहिद जावेद बागवान यांनी कोतवाली पोलिसांत तक्रार दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, … Read more

काही बेजबाबदार लोकप्रतिनिधींच्यामुळे संपूर्ण शहरावर लॉकडाऊन लादण्याची वेळ येऊ नये,

अहमदनगर Live24 टीम, 1 एप्रिल 2021 :- नगर शहरामध्ये दिवसेंदिवस वाढणारी कोरोना रुग्णांची संख्या ही शहराची चिंता वाढविणारी आहे. प्रशासनाच्या वतीने कोरोना प्रादुर्भाव आटोक्‍यात आणण्यासाठी मास्क वापरणे, सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे पालन करणे यासाठी सुरू असणारी कारवाई ही सर्वसमावेशक असावी अशी नागरिकांची भावना आहे. मात्र काही बेजबाबदार लोकप्रतिनिधींच्यामुळे संपूर्ण शहरावर लॉकडाऊन लादण्याची वेळ येऊ नये, यासाठी … Read more

निगेटिव्ह रिपोर्ट ठरणार व्यावसायिकांच्या व्यवसायाची चावी

अहमदनगर Live24 टीम, 1 एप्रिल 2021 :- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने फैलावत आहे. यामुळे नागरिकांसह प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. यातच कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी भिंगार कॅन्टोमेंट बोर्डाने एक अजबच फतवा काढला आहे. यामध्ये दुकानदार, भाजीपाला, फळ विक्रेत्यांना कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट सक्तीचा केला आहे. हा रिपोर्ट नसल्यास दुकाने सील करण्यासोबतच पाच हजार रुपयांचा दंड आकारण्याचा कठोर निर्णय … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात इतक्या नव्या रुग्णांची भर !

अहमदनगर Live24 टीम, 1 एप्रिल 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात आज ८२९ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ८७ हजार ८१९ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९१.२५ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत १३१९ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ७२०० … Read more

एकदंत गणेश मंडळाच्यावतीने शिवजयंती साजरी

अहमदनगर Live24 टीम, 1 एप्रिल 2021 :- दातरंगे मळा, एकदंत कॉलनी येथील एकदंत गणेश मंडळाच्यावतीने शिवजयंती मोठ्या उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी एकदंत कॉलनी परिसरामध्ये स्वच्छता अभियान राबवुन परिसर स्वच्छ करुन सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला. कॉलनीत सर्वत्र भगवे पताके व झेंडे लावण्यात आल्यामुळे सर्वांचे लक्ष वेधले. परिसरात आकर्षक सजावट करण्यात आली व … Read more

उड्डाण पूलास स्व.दिलीप गांधी यांचे नांव देण्यासाठी आत्मदहन आंदोलन लेखी आश्‍वासनाने मागे

अहमदनगर Live24 टीम, 1 एप्रिल 2021 :- शहरातील नियोजित उड्डाण पूलास माजी केंद्रीय मंत्री स्व. दिलीप गांधी यांचे नांव देण्याच्या मागणीसाठी नरेंद्र मोदी आर्मीचे पारनेरचे तालुकाध्यक्ष रघुनाथ आंबेडकर यांनी शिवजयंती दिनी आत्मदहनाचा इशारा दिला होता. उड्डाणपुलास सदर नाव देण्यासाठीचा प्रस्ताव भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण यांना कळविले असल्याचे लेखी पत्र दिल्याने आंबेडकर यांनी 31 मार्चचे आत्मदहन … Read more

चुक सुधारण्याच्या नादात पिल्ले परिवारावर कोरोनाचा ‘ठपका’ शहर जिल्हाध्यक्ष किरण काळेंचा निषेध !

अहमदनगर Live24 टीम, 1 एप्रिल 2021 :-  काँग्रेस पक्षाचे एकनिष्ठ आणि गटबाजी न करता समाजकार्य अखेरपर्यंत करणारे भिंगार काँग्रेसचे अध्यक्ष स्व.आर.आर.पिल्ले किरण काळे यांच्या गटबाजीच्या कृतीत सामिल नव्हते म्हणून त्यांच्या निधनाकडे दुर्लक्ष केले आणि आता सावरण्याच्या प्रयत्नात खोटे दु:ख व्यक्त करतांना पिल्ले परिवारात कोणी कोरोना बाधित असल्याची बदनामी शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे करत असल्याच्या कृतीचा … Read more

जागा बळकावणार्‍या लॅण्ड माफियावर कारवाई करण्याची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 1 एप्रिल 2021 :- शहरातील वसंत टेकडी, संदेशनगर येथील मागासवर्गीय कुटुंबाची जागा दडपशाहीने बळकाविणार्‍या लॅण्ड माफियावर कारवाई करण्याची मागणी भीम आर्मी संघटनेच्यावतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस उपअधिक्षक प्रांजली सोनवणे व आमदार संग्राम जगताप यांना देण्यात आले. यावेळी भीम आर्मी संघटनेचे शहराध्यक्ष सनी खरारे, उपाध्यक्ष राहुल लखन, शहर सचिव … Read more