शहरातील वर्दळीच्या ठिकाणी महिलेला चोरटयांनी लुटले

अहमदनगर Live24 टीम, 11 फेब्रुवारी 2021:-नगर शहरातील अत्यंत वर्दळीचे ठिकाण असलेल्या कापड बाजारात महिलेची रोख रक्कम, चांदीचे चाळ व सॅमसंग कंपनीचा मोबाईल चोरट्याने लांबविला असल्याची घटना घडली आहे. दरम्यान याबाबत वैशाली उमेश देठेकर यांनी फिर्याद दाखल केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, देठेकर या हनुमाननगर येथील रहिवाशी असून त्या कापड खरेदी करण्यासाठी कापडबाजारात आल्या … Read more

वाढत्या चोऱ्यांमुळे महापौरांनी पोलीस अधीक्षकांकडे केली ‘ही’ मागणी

अहमदनगर Live24 टीम, 10 फेब्रुवारी 2021:-एरवी नगर शहराच्या रस्त्यांवरून बिनदिक्कतपणे दिवसा वा रात्री फिरणे सुरक्षित आहे, असे म्हणणे केवळ आभास ठरू लागले आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये नगर शहरातील रस्त्यांवर रात्री-बेरात्री होणाऱ्या लुटमारीमुळे नागरिकांना धडकी भरली आहे. दुचाकी अथवा चारचाकींमधून येणारे टवाळ काहीही कारण काढून नागरिकांना अडवितात. काही समजण्याच्या पूर्वीच मारहाण करून ऐवज लुटून पसार होतात. … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ह्या पोलीस निरीक्षकांच्या मालमत्तेची चौकशी करुन निलंबित करा अन्यथा…

अहमदनगर Live24 टीम, 10 फेब्रुवारी 2021:-खुनाच्या गुन्ह्यात हलगर्जीपणा केल्याबद्दल निलंबीत झालेले भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनचे सहा. पो.नि. प्रवीण पाटील यांच्या मालमत्तेची चौकशी करुन, गुन्हा दडपण्याचा प्रयत्न केल्याबद्दल त्यांच्यावर ३०२ चा गुन्हा दाखल व्हावा व त्यांचे कायमचे निलंबन करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई गट) च्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालय … Read more

‘या’ गावातील सेवा संस्थेच्या सभासदांच्या मतदार यादीत अफरातफर ! निवडणुकीवर बहिष्काराचा इशारा

अहमदनगर Live24 टीम, 10 फेब्रुवारी 2021:-नगर तालुक्यातील सारोळा कासार सेवा संस्थेच्या सभासदांच्या मतदार यादीत मोठी अफरातफर झाली असून सेवा संस्थेच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा पंचायत समिती सदस्य रवींद्र कडूस यांनी दिला आहे. सारोळा कासार सेवा संस्थेच्या मतदार यादीवरून तालुक्याचे राजकारण चर्चेत आले आहे. निवडणूकीसाठी ८५५ कर्जदार सभासदांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली.त्यावर हरकती घेण्याची … Read more

नगर तालुक्यातील शेतकऱ्यांनी केले वीज कंपनीचे ‘गेट बंद आंदोलन’

अहमदनगर Live24 टीम, 10 फेब्रुवारी 2021:-नगर तालुक्यातील अनेक गावातील शेतकऱ्यांना वीज वितरण कंपनीने कोणत्याही प्रकारची पूर्व कल्पना न देता वीज पुरवठा खंडित केला होता. अचानक वीज पुरवठा खंडित केल्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी वीज कंपनीचे कार्यालय गाठले व वीज बिलाची मागणी केली. मात्र कोणताही अधिकारी उपस्थित नसल्याने शेतकऱ्यांनी गेट बंद आंदोलन केले. तालुक्यातील शेतकऱ्यांना कुठलीही कल्पना … Read more

वाहतुक कोंडी व अपघात टाळण्यासाठी गतीरोधक व सिग्नल बसविण्याची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 10 फेब्रुवारी 2021:-बाह्यवळण रस्त्यावरील निंबळक बायपास चौक शिंदे वस्ती येथे वाहतुक कोंडी आणि अपघात टाळण्यासाठी त्वरीत गतीरोधक व सिग्नल बसविण्याची मागणी निंबळक व इसळक ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअधिक्षक अभियंता चव्हाण यांना देण्यात आले. मौजे निंबळक (ता. नगर) बायपास चौक येथे चार रस्ते एकत्र येत असल्याने … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात इतक्या नव्या रुग्णांची भर !

अहमदनगर Live24 टीम, 10 फेब्रुवारी 2021:-अहमदनगर जिल्ह्यात आज ८४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ७१ हजार ०४५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.०४ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (मंगळवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १०३ ने वाढ झाल्याने … Read more

काळजी घ्या सोन्यासारखा जीव वाचवा

अहमदनगर Live24 टीम, 10 फेब्रुवारी 2021:-नगर – अनेक घटनांमधून अनेक ठिकाणी सोनसाखळी चोर्‍यांमधून महिलांना जीव गमवावे लागले तर काहींना अपंगत्व आले आहे. आपला जीव हा सोन्यापेक्षा मौल्यवान आहे, तेव्हा महिलांनी सोने घालून फिरतांना काळजी घ्या व आपला सोन्यासारखा जीव वाचवा, असे आवाहन तोफखाना पोलिस स्टेशनचे निरिक्षक सुनिल गायकवाड यांनी केले. सावेडी भागातील उपनगरात गेल्या अनेक … Read more

एकाच दिवसात ५ जणांचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 10 फेब्रुवारी 2021:-अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा प्रभाव दिवसेंदिवस कमी होत असल्याची चिन्हे असतानाच सोमवारी (दि.७) १०४ कोरोनाबाधित आढळून आले असून, एकाच दिवसात ५ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात चिंतेचे वातावरण कायम असल्याचे दिसते. आतापर्यंत ७० हजार ८३३ रुग्ण बरे होऊन परतले. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.९८ टक्के इतके आहे. रविवारी कोरोनाने … Read more

लाच प्रकरणी ‘महिला तलाठी’ एसीबीच्या जाळ्यात!

अहमदनगर Live24 टीम, 10 फेब्रुवारी 2021:- शेतजमीनीचे वाटणी पत्र व हक्क सोडपत्रा आधारे नोंदी घेऊन फेरफार देणे करिता ६ हजारांची लाच स्वीकारताना महिला तलाठी एसीबीच्या जाळ्यात अडकली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नगरमधील पथकाने ही कारवाई केली. याबाबत सविस्तर माहिती अशी की, तक्रारदार यांनी त्यांचे खडकेवाके हद्दीतील वडिलांचे व चुलत्यांचे नावे असलेल्या शेतजमीनीचे वाटणी पत्र व … Read more

अहमदनगर कॉलेजमध्ये ‘अर्थसंकल्प 2021’ या विषयावर ऑनलाईन परिसंवाद संपन्न

अहमदनगर Live24 टीम, 09 फेब्रुवारी 2021:-अहमदनगर कॉलेजमध्ये अर्थशास्त्र विभागाच्या वतीने ‘अर्थसंकल्प 2021’ या विषयावर ऑनलाईन परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमासाठी स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडचे प्रमुख डॉ.प्रमोद लोणकर व्याख्याते म्हणून लाभले. विभागप्रमुख डॉ पराग कदम हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. जे. बार्नबस यांनी कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या. अर्थसंकल्पावरील आपल्या व्याख्यानात डॉ. … Read more

खासदार विखेंच्या प्रयत्नांतून सावेडीकरांसाठी हॉस्पिटल उभारले जाणार !

अहमदनगर Live24 टीम, 09 फेब्रुवारी 2021:-जिल्ह्यातील गोरगरीब, आर्थिक परिस्थिती खालावलेली असलेल्यांसाठी, तसेच महागडे उपचार परवडत नसल्याने सर्वांसाठी मोफत रुग्णसेवा करणारे महापालिकेचे कै. बाळासाहेब देशपांडे हे एकमेव हॉस्पिटल नगर शहरात आहेत. आर्थिक स्थिती बिकट असलेले अनेक पेशंट याच हॉस्पिटलमध्ये उपचार घेतात. मात्र तेथील इमारत मोडकळीस आली असून जीव मुठीत धरून तेथे रुग्णावर उपचार सुरू आहेत. दरम्यान … Read more

वंचित बहुजनच्या कार्यकर्त्यांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई गट) पक्षात प्रवेश

अहमदनगर Live24 टीम, 09 फेब्रुवारी 2021:-अरणगावसह शहरातील माळीवाडा व बाबा बंगाली परिसरातील वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई गट) पक्षात प्रवेश केला. भारिपचे माजी युवक तालुकाध्यक्ष मेहेर कांबळे, शिवम साठे, आफताब शेख यांच्यासह कार्यकर्त्यांचा आरपीआय पक्षात शहराध्यक्ष सुशांत म्हस्के यांनी स्वागत केले. यावेळी युवक जिल्हाध्यक्ष पवन भिंगारदिवे, अल्पसंख्याक शहर अध्यक्ष नईम शेख, … Read more

एसपी साहेब चोर मचाए शोर….

अहमदनगर Live24 टीम, 09 फेब्रुवारी 2021:-नगर शहर परिसरात वाहन चोरी, सोनसाखळी चोरी, व्यापार्‍यांकडील रोख रक्कम पाळत ठेवुन लुटण्याचे प्रमाण वाढले आहे. रात्रीच्या वेळीच नव्हे तर दिवसा ढवळ्याही घरफोड्या, रस्तालूट, मंगळसूत्र चोर्‍या, पळवून नेऊन होणारी लूटमार, असे गुन्हे सध्या सुरू आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे केवळ रात्रीच नव्हे तर दिवसाही पोलिस गस्त सुरु … Read more

निंबळकच्या सरपंच पदाची धूरा महिलेच्या खांद्यावर

अहमदनगर Live24 टीम, 09 फेब्रुवारी 2021:-तालुकूयातील निंबळक येथे मंगळवार (दि.9 फेब्रुवारी) सरपंच व उपसरपंच पदाची निवड प्रक्रिया पार पडली. निंबळकच्या सरपंचपदी प्रियंका अजय लामखडे यांची सतरा पैकी अकरा मतांनी निवडून आल्या. तर उपसरपंचपदी बाळासाहेब जगन्नाथ कोतकर यांची बिनविरोध निवड झाली. निंबळक गावात पुन्हा सरपंच पदाची धूरा महिलेच्या खांद्यावर आली असून, लामखडे परिवारातील चौथी पिढी ग्रामपंचायत … Read more

शहरात धूमस्टाईल चोरट्यांचा धुमाकूळ! एकाच दिवसात लाखोंचे दागिने लांबवले

अहमदनगर Live24 टीम, 09 फेब्रुवारी 2021:-शहर परिसरात गेल्या काही दिवसांपासून धूमस्टाईल चोर्‍या करणाऱ्या चोरट्यांनी नुसता धुमाकूळ घातला आहे. दिवसाढवळ्या रस्त्याने चाललेल्या महिलांच्या गळ्यातील दागीने हे चोरटे हिसाकावून नेत आहेत. त्यामुळे महिला वर्गात प्रचंड घबराट पसरली आहे. महिलांना घराबाहेर पडणेही मुश्किल झाले आहे. एकीकडे या घटना वाढत असताना दुसरीकडे पोलिसांकडून मात्र केवळ गुन्हे रजिस्ट्ररला दाखल करण्याचे … Read more

मोटरसायकल प्रशिक्षणामुळे चोऱ्यांना आळा बसेल!: जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील

अहमदनगर Live24 टीम, 09 फेब्रुवारी 2021:-सद्यस्थितीत नगर शहरासह जिल्हाभरात मोटरसायकलवरून महिलांच्या गळ्यातील दागिने चोरण्याचे प्रमाण वाढत आहेत. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसांना वेगळ्या प्रकारचे मोटारसायकल चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात येत असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली. नगर-कल्याण महामार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज इंजीनियरिंग कॉलेजमध्ये जिल्हाभरातील पोलीस कर्मचाऱ्यांसाठी आयोजित मोटारसायकल प्रशिक्षणाच्या वेळी पाटील बोलत होते. … Read more

रविवारी मातंग समाजाचा निशुल्क डिजिटल वधू-वर आणि पालक परिचय मेळाव्याचे आयोज

अहमदनगर Live24 टीम, 09 फेब्रुवारी 2021:-येथील प्रतिबिंब सामाजिक संस्थेच्या वतीने रविवार दि.14 फेब्रुवारी रोजी मातंग समाजाचा डिजिटल निशुल्क वधू-वर आणि पालक परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा वधू-वर आणि पालक परिचय मेळावा नागापूर महापालिका जॉगिंग पार्क शेजारी चैतन्य क्लासिक हॉटेल मागे होणार असून, या मेळाव्यास समाजबांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष दादु नेटके, सचिव … Read more