कर्जदारास मारहाण करणाऱ्या फायनान्स कंपनीच्या तिघांवर गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 07 फेब्रुवारी 2021:- कोरोनाच्या संकट काळात पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊन काळात कर्जदारांना वेठीस धरुन खाजगी एजंटा मार्फत अवाजवी वसूली करर्णा­या खाजगी फायनान्स कंपनीवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने करण्यात आलेल्या आंदोलनाला यश आले आहे. खाजगी फायनान्स कंपनीच्या सांगण्यावरुन टाळेबंदीत गाडी हिसकावण्यासाठी आलेल्या व मारहाण करर्णा­या विरोधात फिर्यादी साहेबराव चांदणे यांच्या तक्रारीवरुन … Read more

आज ७७ रूग्णांना डिस्चार्ज तर १०३ नव्या बाधितांची रुग्ण संख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 06 फेब्रुवारी 2021:- जिल्ह्यात आज ७७ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ७० हजार ७०१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.०३ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शुक्रवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १०३ ने वाढ झाल्याने … Read more

गॅस दरवाढ : शहर महिला राष्ट्रवादीचे शेणाच्या गोवऱ्यावर स्वयंपाक आंदोलन

अहमदनगर Live24 टीम, 06 फेब्रुवारी 2021:- घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरचे दर दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे सर्व सामान्य गृहिणी त्रस्त झाल्या आहेत. कोरोना टाळेबंदीमुळे सर्वसामान्यांचे आर्थिक हाल झाले आहेत, त्यातच या दरवाढीमुळे  केंद्र सरकारच्या विरोधात भयंकर असंतोष आहे. यापूर्वीच राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्यावतीने चूल पेटवा आंदोलन करून केंद्र सरकारचे लक्ष वेधले होते. पण केंद्राच्यावतीने त्याची दखल घेतली नसल्यामुळे … Read more

खड्डेमय शहराची प्रतिमा बदलण्यासाठी रस्त्यांचे काम सुरु -आमदार संग्राम जगताप

अहमदनगर Live24 टीम, 06 फेब्रुवारी 2021:-  अल्पसंख्यांक समाजाला प्रवाहात आनण्याचे काम राष्ट्रवादीच्या माध्यमातून सुरु आहे. सर्व समाजाला बरोबर घेऊन, युवकांना दिशा देण्याबरोबर शहराच्या विकासात्मक दृष्टीकोनाने कार्य सुरु आहे. खड्डेमय शहराची प्रतिमा बदलण्यासाठी विकास आराखड्यातील सर्व रस्त्यांचे काम हाती घेण्यात आले असून, नागरिकांना चांगल्या दर्जाचे रस्ते उपलब्ध होणार आहे. राष्ट्रवादीत युवकांची शक्ती एकवटली असून, शहराचा विकासात्मक … Read more

भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलच्या खेळाडूची राष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेसाठी निवड

अहमदनगर Live24 टीम, 06 फेब्रुवारी 2021:- येथील अ.ए.सो. च्या भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलचा खेळाडू ओम बाबासाहेब करांडे याची राष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे. नुकतीच वेरुळ (जि. औरंगाबाद) येथे महाराष्ट्र राज्य सायकलिंग फेडरेशनच्या वतीने झालेल्या राज्यस्तरीय सायकलिंग स्पर्धेत करांडे याने 16 वर्षाखालील गटात रौप्य पदक पटकाविल्याबद्दल त्याची दि.5 ते 8 मार्च दरम्यान पनवेल (मुंबई) येथे होणार्‍या … Read more

आरपीआयचे राष्ट्रीय नेते राजेंद्र गवई यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा

अहमदनगर Live24 टीम, 06 फेब्रुवारी 2021:- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई गट) चे राष्ट्रीय नेते राजेंद्र गवई यांचा वाढदिवस शहरात सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला. आरपीआयच्या वतीने स्नेहालय संचलित लालटाकी येथील बालभवन मधील विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजनाचे वाटप करण्यात आले. यावेळी आरपीआयचे शहराध्यक्ष सुशांत म्हस्के, युवक जिल्हाध्यक्ष पवन भिंगारदिवे, अल्पसंख्यांक शहराध्यक्ष नईम शेख, टायगर ग्रुपचे जिल्हाध्यक्ष … Read more

तपोवन रोडच्या निकृष्ट कामाच्या चौकशीसाठी राज्यमंत्री बच्चू कडू यांना निवेदन

अहमदनगर Live24 टीम, 06 फेब्रुवारी 2021:- शहरात मुख्यमंत्री सडक योजने अंतर्गत तपोवन रोडचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून, या निकृष्ट कामाच्या भ्रष्टाचाराची चौकशी करुन सदर रस्त्याचे काम पुन्हा चांगल्या पध्दतीने करण्याच्या मागणीचे निवेदन प्रहार संघटनेच्या वतीने राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांना देण्यात आले. यावेळी इंजि. भाग्येश शिंदे, संतोष पवार, विनोदसिंग परदेशी, अजित धस, प्रकाश … Read more

चक्काजाम आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना अटक !

अहमदनगर Live24 टीम, 06 फेब्रुवारी 2021:- दिल्लीच्या सीमेवर दोन महिन्यांहून अधिक कालावधीपासून आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांची दखल न घेता त्यांचे आंदोलन हुकुमशाहीने दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा निषेध नोंदवून अ.भा.किसान संघर्ष समन्वय समिती व महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने शहरातील मार्केटयार्ड चौकात नगर-पुणे महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले. केंद्रातील मोदी प्रणित भाजप सरकारच्या विरोधात जोदराद घोषणाबाजी करुन … Read more

आमदार जगताप म्हणाले…महावितरण विरोधात गुन्हा दाखल करा

अहमदनगर Live24 टीम, 06 फेब्रुवारी 2021:- महावितरण कंपनीने महापालिकेची कुठलीही परवानगी न घेता शहरातील रस्त्यांची मनमानी पद्धतीने खोदाई करून रस्त्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे, त्यामुळे संबधितांवर तातडीने गुन्हे दाखल करण्याचे आदेश महापालिकेच्या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना द्यावेत अशी मागणी आ.संग्राम जगताप यांनी जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त डॉ.राजेंद्र भोसले यांच्याकडे केली आहे. नगर शहरात मुख्यत: नगर … Read more

जिल्हा सहकारी बँक निवडणूक: हे दोन उमेदवारीअर्ज माघारी!

अहमदनगर Live24 टीम, 06 फेब्रुवारी 2021:- सहकार क्षेत्रातील लौकिक प्राप्त बॅंक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणूकीची प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांच्या नियोजनात सुरु आहे. काल शुक्रवारी भानुदास मुरकुटे यांनी शेती पूरक मतदार संघ आणि बिगर शेती मतदार संघासाठी दाखल केलेले प्रत्येकी एक असे दोन अर्ज माघारी घेतले. अर्ज माघारीची … Read more

करोना लस घेण्यासाठी आरोग्य यंत्रणेचा अल्प प्रतिसाद

अहमदनगर Live24 टीम, 06 फेब्रुवारी 2021:- शुक्रवारी नगर महापालिका हद्दीतील आठ व जिल्हा सामान्य रूग्णालयासह जिल्ह्यातील 16 केंद्रावर 1 हजार 970 आरोग्य कर्मचार्‍यांना करोनाची लस देण्यात आली. आतापर्यंत 17 हजार 320 कर्मचार्‍यांना करोनाची लस देण्यात आली आहे. शुक्रवारी जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे यांनी स्वत: ही लस घेतली. दरम्यान जिल्हा प्रशासन आणि आरोग्य … Read more

पुतळ्यांचे विटंबन थांबविण्यासाठी महापुरुषांच्या पुतळ्या जवळ सीसीटिव्ही कॅमेरे लावावे

अहमदनगर Live24 टीम, 05 फेब्रुवारी 2021:-महापुरुषांच्या पुतळ्यांचे विटंबनेचे प्रकार महाराष्ट्रात घडत असताना सुरक्षिततेच्या दृष्टीकोनाने शहरातील सर्व महापुरुषांच्या पुतळ्या जवळ सीसीटिव्ही कॅमेरे लावण्याची मागणी अखिल भारतीय मेहतर समाज संघटनेच्या वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांना देण्यात आले. राष्ट्रीय महापुरुष हे देशाचे धरोवर आहेत. त्यांचा सन्मान करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. महापुरुषांच्या पुतळ्यांपासून … Read more

व्यापाऱ्याला खंडणी मागणा-या तिघांना पोलिसांनी केले गजाआड

अहमदनगर Live24 टीम, 05 फेब्रुवारी 2021:-नेप्ती कांदा मार्केट येथे व्यापाऱ्याला खंडणी मागणा-या तिघांना नगर तालुका पोलिसांची अटक केली. व्यापारी महेश जवाहरलाल भराडिया (रा. वांबोरी, ता. राहुरी, जि. अहमदनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अक्षय दिलीप कोके (रा. अक्षदा गार्डनसमोर, नगर), … Read more

वीजबिल प्रश्नी महावितरण कार्यालयासमोर भाजपचे जोरदार आंदोलन

अहमदनगर Live24 टीम, 05 फेब्रुवारी 2021:-थकीत वीजबिल ग्राहकांची वीज खंडित करू नये, वीज खंडित करण्याची मोहीम तातडीने थांबवावी, १०० युनिटपर्यंत असलेल्या घरगुती ग्राहकांचे वीजबिल माफ करावे यांसह अनेक मागण्यांसाठी भाजपाने शुक्रवारी नवीन नगर रोड येथील महावितरण कार्यालयासमोर आंदोलन केले. यावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मागण्या मान्य न झाल्यास महावितरण कार्यालयास टाळे ठोकण्यात येईल असे … Read more

सरकार विरोधी निदर्शनासाठी भाजप – शिवसेना उतरली रस्त्यावर

अहमदनगर Live24 टीम, 05 फेब्रुवारी 2021:-वीज बिल वसुली थांबविण्यासाठी राज्यातील ठाकरे सरकारविरोधात आक्रमक होत भाजपने आज आंदोलन केले. तर दुसरीकडे इंधन दरवाढीविरोधात शिवसेना आज रस्त्यावर उतरली व केंद्र सरकारचा निषेध केला. त्याचबरोबर नगर शहर शिवसेनेने बैलगाडीतून प्रवास करत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर निदर्शने केली. जिल्हा प्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांच्या नेतृत्वाखाली शहर शिवसेनेने हे आंदोलन … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : आज वाढले इतके रुग्ण वाचा चोवीस तासांतील अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 05 फेब्रुवारी 2021:-अहमदनगर जिल्ह्यात आज ६७ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ७० हजार ६२४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.०६ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (गुरुवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १०९ ने वाढ झाल्याने … Read more

‘त्या’ हॉस्पिटलमधील मेडिकलने खरेदी केलेल्या औषधांच्या जीएसटी भरलेल्या बिलांची तपासणी करा मनसेची जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाव्दारे मागणी

अहमदनगर Live24 टीम, 05 फेब्रुवारी 2021:-कोरोनाच्या काळामध्ये खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेतलेल्या रुग्णांना अवाच्या सव्वा बिले आलेली आहेत. त्या बिलांचे जिल्हाधिकारी समितीने ऑडिट करून आत्ता पर्यंत १ कोटी १३ लाख वसूल पात्र रक्कम रूग्णांना परत देण्याचे आदेश दिले आहेत. परंतु आज पर्यंत रुग्णांच्या खात्यावर ही वसुल पात्र रक्कम जमा झालेली नाही. ही वसूल पात्र रक्कम फक्तत … Read more

नगर तालुक्यातील या जंगलास वणवा! शेकडो हेक्टर क्षेत्र जळून खाक

अहमदनगर Live24 टीम, 05 फेब्रुवारी 2021:-नगर तालुक्यातील इमामपुर येथील जंगलाला वनवा लागला असून शेकडो हेक्टर क्षेत्र जळून खाक झाले आहे. वणव्यात विविध झाडांचे तसेच पशुपक्ष्यांचे ही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याबाबत सविस्तर माहिती अशी की, राहुरी तालुक्यातील गुंजाळे हद्दीतील डोंगरात वनवा लागल्यानंतर त्याची झळ इमामपूर हद्दीतील डोंगराला ही लागली. राहुरी तालुक्यातील व नगर तालुक्यातील शेकडो … Read more