अहमदनगर ब्रेकिंग : इंग्लंडहुन आलेल्या त्या नगरकरांचे अहवाल आले वाचा सविस्तर …

अहमदनगर Live24 टीम, 26 डिसेंबर 2020 :- राध्या इंग्लंडमधील काही भागात कोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेत काही बदल झालेला नवीन विषाणू स्टेन आढळला असून या विषाणूचा प्रसार नेहमीपेक्षा अधिक वेगाने होऊ शकतो, असे तज्ञांचे मत आहे. या पार्श्वभूमीवर शासनाकडून प्राप्त सूचनानुसार राज्यात 25 नोव्हेंबर ते 23 डिसेंबर या काळात इंग्लंडहून आलेल्या प्रवाशांचे विशेष सर्वेक्षण करणेत येत … Read more

तोफखानाचा कारभार आता पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांच्या हाती

अहमदनगर Live24 टीम, 26 डिसेंबर 2020 :- शहरातील तोफखाना पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक हरूण मुलाणी यांना पोलीस उपअधीक्षकपदी पदोन्नती मिळाली आहे. दरम्यान त्यांच्या जागी नियंत्रण कक्षातील निरीक्षक सुनील गायकवाड यांची नियुक्ती झाली आहे. दरम्यान तोफखानचे नूतन पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी शुक्रवारी रात्री पदभार स्वीकारला. पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी याबाबतचे आदेश काढले आहे. … Read more

सावित्री उत्सवाच्या स्वागताध्यक्षपदी अविनाश घुले

अहमदनगर Live24 टीम, 26 डिसेंबर 2020 :- महाराष्ट्र राज्य हमाली मापाडी महामंडळाचे सहचिटणीस व अहमदनगर जिल्हा हमाल पंचायतचे अध्यक्ष, नगरसेवक अविनाश घुले यांची सावित्री उत्सवाच्या स्वागताध्यक्षपदी निवड झाल्याची माहिती विचारधाराचे अध्यक्ष विठ्ठल बुलबुले, संगीताताई गाडेकर व श्रीकांत वंगारी यांनी दिली. विचारधारा गेल्या तीन वर्षापासून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस 3 जानेवारी हा ‘सावित्री उत्सव’ या … Read more

इंग्लडहून आलेल्यांच्या संपर्कातील लोकांना भोंग्याद्वारे तपासणीचे आवाहन करावे

अहमदनगर Live24 टीम, 26 डिसेंबर 2020 :-  अहमदनगर शहरात इंग्लंड येथून आलेल्या नागरिक व त्यांचे संपर्कात आलेले अहमदनगर येथील जनतेला शोधण्यासाठी अहमदनगर शहरात फिरत असलेली घंटा गाडीचा व भोंग्याचा वापर करून पूर्ण अहमदनगर शहरात गाडी फिरवण्यात याव्यात अशी मागणी एम.आय.एम. जिल्हाध्यक्ष डॉ.परवेज अशरफी यांनी मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी व आयुक्त यांच्याकडे केली आहे. मुख्यमंत्री यांना पाठविण्यात आलेल्या … Read more

‘ह्या’ कारणामुळे लॉरेन्स स्वामी यांच्यावर खोटे गुन्हे !पत्नीचे पोलीस अधिक्षकांना निवेदन

अहमदनगर Live24 टीम, 26 डिसेंबर 2020 :- राजकीय दबावापोटी लॉरेन्स स्वामी यांच्यावर खोटे गुन्हे दाखल होत असून, अजूनही त्यांच्यावर आमच्या कुटुंबीयांवर खोटे गुन्हे दाखल होण्याची शक्यता असल्याने सदर प्रकरणी सखोल चौकशी करण्याची मागणी स्वामी यांच्या पत्नी वैशाली स्वामी यांनी जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे. नगर-पाथर्डी रोड भिंगार येथे स्वामी रेसिडेन्सीमध्ये सर्व लॉरेन्स कुटुंबीय एकत्रित … Read more

एका दिवसात कोरोनामुळे झाले इतके मृत्यू !

अहमदनगर Live24 टीम, 26 डिसेंबर 2020 :- नगर शहर व जिल्ह्यात कोरोनामुळे आणखी ७ जणांचा मृत्यू झाला. बळींची संख्या १ हजार ३२ झाली आहे. दरम्यान, जिल्ह्यात नवे १२५ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.८४ टक्के झाले आहे. नगर शहर व जिल्ह्यात गुरुवारी सायंकाळी सहा वाजेपासून शुक्रवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट … Read more

ख्रिसमस निमित्त गरजूंना ब्लॅकेटचे वाटप सामाजिक उपक्रमाचे 34 वे वर्ष

अहमदनगर Live24 टीम, 26 डिसेंबर 2020 :-ख्रिसमस सणाचा आनंद दीनदुबळ्यां समवेत साजरा करण्याच्या उद्देशाने कोठी येथील जवान मित्र मंडळाच्या वतीने थंडीच्या पार्श्‍वभूमीवर गरजूंना ब्लॅकेटचे वाटप करण्यात आले. या सामाजिक उपक्रमाचे हे 34 वे वर्ष असून, माजी नगरसेवक रुपसिंग कदम यांच्या प्रेरणेने दरवर्षी ख्रिसमसला या सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात येते. आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते गरजूंना … Read more

वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकार्‍यांसह कार्यकर्त्यांचा आरपीआयमध्ये प्रवेश

अहमदनगर Live24 टीम, 26 डिसेंबर 2020 :-भिंगार येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) च्या सभासद नोंदणी अभियानाचा प्रारंभ करण्यात आला. युवक शहराध्यक्ष अमित काळे यांच्या नेतृत्वाखाली भिंगारमध्ये पाचशे सभासदांची नोंदणी करुन वंचित बहुजन आघाडीचे युवक शहराध्यक्ष विशाल साबळे, अनिकेत मोहिते, शिव भोसले, संदीप ससाणे, नागेश साठे यांचासह दोनशे युवकांनी आरपीआयमध्ये प्रवेश केला. आरपीआयचे राष्ट्रीय … Read more

महापालिकेच्या स्थायीची सभागृहातील पहिली सभा या दिवशी पार पडणार

अहमदनगर Live24 टीम, 26 डिसेंबर 2020 :-महापालिकेच्या स्थायी समितीची पहिलीच सभा सोमवारी (दि. 28) प्रत्यक्षपणे सभागृहात होत आहे. सभापती मनोज कोतकर यांनी सोमवारी (दि.28) स्थायी समितीची सभा बोलविली आहे. मुख्य लेखा परीक्षक चंद्रकांत खरात यांच्या मनमानी व चुकीच्या कारभारामुळे त्यांच्यावर कारवाईचा प्रस्ताव सभेसमोर ठेवण्यात आला आहे. सभेसमोर 18 विषय ठेवण्यात आले आहे. त्यात प्रामुख्याने महापालिकेच्या … Read more

वृद्धेच्या एकटेपणाचा फायदा घेत चोरटयांनी लाखो लुटले

अहमदनगर Live24 टीम, 26 डिसेंबर 2020 :-जिल्ह्यातील गेल्या काही दिवसांपासून चोरी, लुटमारी आदी घटनांमध्ये वाढ झालेली पाहायला मिळते आहे. कायदा व सुव्यवस्थेचा धाक चोरट्यांच्या मनात राहिला नसल्याने शहरासह जिल्ह्यात खुलेआम दिवसाढवळ्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे . नुकतेच शहरातील एका ठिकाणी चोरीची घटना घडली आहे. याबाबत घडलेली घटना अशी कि, शहरातील धर्माधिकारी मळ्यातील सुमन कॉलनीमध्ये गुरूवारी … Read more

रेखा जरे हत्याकांड : एका महिलेसह ‘त्या’ वादग्रस्त डॉक्टरला पोलिसांनी घेतलं ताब्यात !

अहमदनगर Live24 टीम, 25 डिसेंबर 2020 :- रेखा जरे हत्याकांडातील मुख्य आरोपी बाळ बोठे याचा शोध घेत असतांना पोलिसांना तब्बल अडीच वर्षांपासून फरार असलेला आरोपी डॉ. निलेश शेळके सापडला आहे. पोलिसांनी त्याला शुक्रवारी पुणे येथून ताब्यात घेतले आहे. या डॉक्टरवर नगरमधील बँकांची आर्थिक फसवणूक केल्याचे गुन्हे दाखल आहेत. याशिवाय पत्नीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचाही गुन्हा … Read more

केडगावच्या रचनात्मक विकासासाठी कटिबध्द – आमदार संग्राम जगताप

अहमदनगर Live24 टीम, 25 डिसेंबर 2020 :-  केडगावच्या विकासासाठी निधी कमी पडु देणार नाही . केडगावचा रचनात्मक विकास करण्यासाठी कटिबध्द असुन त्यासाठी नियोजनबध्द विकासकामे हाती घेण्यात येत असल्याची माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिली . केडगाव येथील नविन गावठाण परिसरात असणाऱ्या बोल्हाईमाता मंदिराच्या जिर्णोध्दर कामाचे भुमिपुजन आमदार जगताप यांच्या हस्ते झाले . त्यावेळी ते बोलत … Read more

कार्यकर्त्‍यांनीच शेतक-यांशी थेट संवाद साधुन विधेयकातील तरतुदींबाबत शंकाचे निरसन करावे

अहमदनगर Live24 टीम, 25 डिसेंबर 2020 :-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या नेतृत्‍वाखाली केंद्र सरकारने लागू केलेल्‍या कृषि विधेयकांच्‍या संदर्भात कार्यकर्त्‍यांनीच शेतक-यांशी थेट संवाद साधुन विधेयकातील तरतुदींबाबत शंकाचे निरसन करावे, बाजार समितीच्‍या माध्‍यमातून यासाठी परिसंवादाचे आयोजन करण्‍यात येणार असल्‍याची माहीती माजीमंत्री आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी दिली. माजी पंतप्रधान स्‍व.अटल बिहारी वाजपेयी यांच्‍या जयंती दिनाचे औचित्‍य साधुन पंतप्रधान … Read more

ख्रिश्‍चन समाजातील विद्यार्थ्‍यांनीशिक्षण क्षेत्राममध्‍ये चांगल्‍या पध्‍दतीची गुणवत्‍ता प्राप्‍त केली – सौ.शालिनी ताई विखे

अहमदनगर Live24 टीम, 25 डिसेंबर 2020 :- ख्रिश्‍चन समाजातील विद्यार्थ्‍यांनी शिक्षण क्षेत्राममध्‍ये चांगल्‍या पध्‍दतीची गुणवत्‍ता प्राप्‍त केली आहे. भविष्‍यात वेगवेगळ्या क्षेत्रात काम करताना समाजाची सेवा करण्‍यासाठीही पुढाकार घ्‍या असा संदेश जिल्‍हा परिषदेच्‍या माजी अध्‍यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील यांनी दिला. नाताळ सणाच्‍या निमित्‍ताने लोणी येथील शारोन चर्चमध्‍ये गुणवंत विद्यार्थ्‍यांचा सत्‍कार सौ.शालिनीताई विखे पाटील यांच्‍या हस्‍ते आयोजित … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जाणून घ्या गेल्या २४ तासांतील अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 25 डिसेंबर 2020 :-जिल्ह्यात आज १३३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६६ हजार १३३ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.८४ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (गुरूवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १२५ ने वाढ झाल्याने … Read more

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस पदी इंजि. सुधिर शिरसाठ यांची निवड

अहमदनगर Live24 टीम, 25 डिसेंबर 2020 :- राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी इंजि. सुधिर चंद्रहास शिरसाठ यांची निवड झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष ना. जयंतराव पाटील व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया दिदी दुहन यांच्या मान्यतेने ही निवड करण्यात आलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ना. जयंतराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व माजी … Read more

शिक्षक भारती उर्दू संघटनेची जिल्हा कार्यकारिणी जाहीर

अहमदनगर Live24 टीम, 25 डिसेंबर 2020 :- शिक्षक भारती संघटनेची बैठक नुकतीच राज्य सचिव सुनिल गाडगे यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. याप्रसंगी जिल्हा कार्यध्यक्ष बाबा लोंढे, इलियास तांबोली, मुख्याध्यापक खलील शेख, रफिया खान, एटीयुचे चेअरमन नज्जू पहेलवान, फिरोज खान आदिं मान्यवर उपस्थित होते. यावेळी शिक्षक भारती उर्दू विभागाचे राज्य अध्यक्ष मुश्ताक पटेल यांनी या बैठकीस ऑनलाईन … Read more

बिग ब्रेकिंग : अखेर डॉ. निलेश शेळके पोलिसांच्या ताब्यात !

अहमदनगर Live24 टीम, 25 डिसेंबर 2020 :- बनावट कर्ज प्रकरणातील आरोपी डॉ. नीलेश शेळके यास पोलिसांनी रेखा जरे हत्याकांड प्रकरणात चौकशी साठी ताब्यात घेतले आहे.   रेखा जरे हत्याकांड प्रकरणातील मुख्य सूत्रधार व आरोपी बाळ बोठे यास मदत केल्या प्रकरणी डॉ. नीलेश शेळके यास चौकशीसाठी ताब्यात घेतले असल्याची सूत्रांची माहिती आहे. दरम्यान बोगस कागदपत्रांच्या आधारे कोट्यावधी … Read more