ड्रेनेजचे तुंबलेले पाणी रस्त्यावर ; नागरिकांचे होतायत हाल

अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2020 :- कल्याण-नगर-विशाखापट्टणम हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 222 आहे. हा रस्ता नगर शहरातून जात आहे.या महामार्गाची महापालिकेच्या हद्दीत प्रचंड दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी मोठ मोठे खड्डे पडले आहेत. त्यातच महामार्गालगत ड्रेनेजलाईन तुंबल्याने दुर्गंधीयुक्त घाण पाणी या महामार्गावरूनच वाहत आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. तसेच या रस्त्यावर सीना नदीवर अनेक … Read more

भिंगार शहराचा पाणीपुरवठा पुन्हा झाला विस्कळीत

अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2020 :- मागील काही महिन्यापासून मुळाधरण ते एमआयडीसी या दरम्यान जलवाहिनी फुटत आहे. ही जलवाहिनी जुनी झाल्याने वारंवार ही घटना घडत आहे. त्यामुळे भिंगार शहराचा पाणी पुरवठा पुन्हा विस्कळीत झाला आहे. बुधवारी (दि.25) पुन्हा एमआयडीसीची जलवाहिनी फुटल्याने छावणी परिषदेला पाणी मिळू शकले नाही. ती दुरुस्ती झाल्यावर पाणी मिळणार आहे, असे … Read more

सारडा महाविद्यालयातील नऊ विद्यार्थी देशसेवेत दाखल

अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2020 :- शहरातील नामंकित असे सारडा कॉलेजमध्ये एनसीसी विभागाकडून छात्रांना योग्य प्रशिक्षण दिले जात आहे. त्यामुळेच सारडा महाविद्यालयाच्या नऊ छात्रांची भारतीय सैन्यदलामध्ये निवड होऊन त्यांना भारतमातेची सेवा करण्याची सुवर्णसंधी मिळाली आहे. एकाच वेळी नऊ छात्रांची निवड होणे ही बाब महाविद्यालयासाठी अभिमानास्पद आहे, असे प्रतिपादन हिंद सेवा मंडळाचे कार्याध्यक्ष अजित बोरा … Read more

कपड्याचे दुकान फोडून चोरटयांनी लाखोंचा माल केला लंपास

अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2020 :-जिल्ह्यात लुटमारी, चोरी, दरोडा, घातपात अशा गुन्हेगारी घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. संपूर्ण जिल्ह्यात चोरटयांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. वाढत्या चोरीच्या घटनांमुळे मात्र नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण होत आहे. नुकतेच चोरटयांनी नगर तालुक्यातील रुईछत्तीसी येथील शिवशांती कापड दुकान फोडून चोरट्यांनी सव्वादोन लाख रुपयांच्या कपड्यांची चोरी केली. याप्रकरणी बिभिषण शंकर … Read more

चिंताजनक : चोवीस तासांत जिल्ह्यातील ‘इतक्या’ कोरोना रुग्णांचा मृत्यू !

अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2020 :- जिल्ह्यात कोरोनामुळे चोवीस तासांत आणखी पाच जणांचा मृत्यू झाला. बळींची एकूण संख्या ९२० झाली आहे. दिवसभरात नवे २७३ पॉझिटिव्ह आढळून आले. त्यातील सर्वाधिक ४५ नगर शहरातील आहेत. सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात मोठ्या प्रमाणात चाचण्या झाल्या होत्या. आता चाचण्या कमी झाल्याने रुग्णसंख्या कमी झाल्याचे दिसत आहे. दरम्यान, कोरोनाची दुसरी लाट … Read more

तीन तोंडी सरकारच्या घोषणे’ चे श्राद्ध घालून केले आंदोलन

अहमदनगर Live24 टीम, 25 नोव्हेंबर 2020 :-  कोरोनामुळे आर्थिक हतबल झालेल्या नागरिकांना महावितरणने वाढीव वीजबिले पाठवून शॉक दिला आहे. आधीच कोरोनामुळे गेली अनेक महिने नागरिकांच्या हाताला कामे नसल्यानी अनेकांवर उपासमारीची वेळ ओढवली आहे. यातच 100 युनिट मोफतची घोषणा केलेल्या महाविकास आघाडी सरकारने आपल्या वक्तव्यावरून घुमजाव केले आहे. यामुळे अडचणीत सापडलेले नागरिकांकडून महावितरण सक्तीने वीजबिल वसुली … Read more

आज ३३७ रुग्णांना डिस्चार्ज तर २७३ बाधितांची रुग्णसंख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 25 नोव्हेंबर 2020 :-अहमदनगर जिल्ह्यात आज ३३७ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५९ हजार ३८३ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९५.७१ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (मंगळवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २७३ ने वाढ … Read more

रस्त्याच्या कामासाठी मनपा आयुक्तांच्या दालनात ठिय्या आंदोलन

अहमदनगर Live24 टीम, 25 नोव्हेंबर 2020 :-जिल्ह्याबरोबरच नगर शहरातील अनेक रस्त्यांची नादुरुस्त अवस्था पाहून नागरिकांमध्ये प्रशासनाविरोधात चीड निर्माण झाली आहे. यातच दरदिवशी या नागरी समस्येसाठी शहरात आंदोलने करण्यात येत आहे. यातच आज शिवसेनेच्या वतीने मनपा आयुक्तांच्या दालनातच आंदोलन करण्यात आले आहे. बोल्हेगाव येथील गणेश चौकातील रस्त्याच्या कामासाठी शिवसेनेच्या नगरसेवकांनी आयुक्त यांच्या दालनांमध्ये ठिय्या आंदोलन सुरू … Read more

कृषिकन्या वैष्णवी हराळ हीने साकारला गुंडेगावचा नकाशा

अहमदनगर Live24 टीम, 25 नोव्हेंबर 2020 :-  महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी संलग्न मुळा एज्युकेशन सोसायटीच्या कृषी महाविद्यालय, सोनई येथील विद्यार्थिनी वैष्णवी रतन हराळ हिने रांगोळीद्वारे गावचा नकाशा सादर केला. या प्रतिकृतीत तिने गावचे चित्रण रेखाटले. या नकाशाद्वारे तिने गावातील मंदिरे, शेती, विहिरी, बस स्थानक, दवाखाना यांचे चित्रण रेखाटले. या भव्य नकाशाद्वारे तिने गावाची धार्मिक, … Read more

अहमदनगर महाविद्यालयाचा एम.एस.सी कॉम्प्युटर सायन्सचा 100 टक्के निकाल

अहमदनगर Live24 टीम, 25 नोव्हेंबर 2020 :- पुणे विद्यापीठाच्यावतीने नुकतीच जाहिर झालेल्या एम.एस.सी कॉम्प्युटर सायन्स परिक्षेमध्ये अहमदनगर महाविद्यालयाचा सायन्स विभागाचा निकाल 100 टक्के लागला असून यात विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. महाविद्यालयाच्यावतीने प्राचार्य डॉ.आर.जे.बार्नबस यांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी उपप्राचार्य डॉ.सय्यद रज्जाक, उपप्राचार्य ए.व्ही.नागवडे, डॉ.बी.एम.गायकर सर्व विद्यार्थ्यांचे या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत … Read more

शहरात चोरट्यांचा धुमाकूळ; घरात घुसून 50 हजार चोरले

अहमदनगर Live24 टीम, 25 नोव्हेंबर 2020 :- जिल्ह्यात लुटमारी, चोरी, दरोडा, घातपात अशा गुन्हेगारी घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. संपूर्ण जिल्ह्यात चोरटयांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. वाढत्या चोरीच्या घटनांमुळे मात्र नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण होत आहे. त्यातच नगर शहरात होणाऱ्या चोऱ्यांमुळे नागरिकांच्या सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नुकतेच शहरातील एका घराच्या खिडकीचे ग्रिल उचकाटून चोरट्यांनी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : लग्नाचे आमिष दाखवत बलात्कार , नग्नावस्थेतील फोटो तिच्या मोबाइलवर पाठवुन …

अहमदनगर Live24 टीम, 25 नोव्हेंबर 2020 :-  एका तरुणीवर लग्नाचे अमिष दाखवुन बळजबरीने शारीरीक संबंध प्रस्तापित केले आणि नजर चुकवुन नग्न अवस्थेत फोटो काढले. हा खळबळजनक प्रकार नगरमध्ये घडला आहे. याबाबत पीडित मुलीच्या फिर्यादी वरून आरोपी तरुणविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या बाबतची सविस्तर माहिती अशी कि फिर्यादी मुलगी (वय-२७ वर्षे, रा.- मु.पो.शेकापुर, ता-आष्टी, जि- … Read more

माजी सरपंचाकडून गावठी कट्टा, तलवार, दांडक्यांने मारहाण !

अहमदनगर Live24 टीम, 25 नोव्हेंबर 2020 :- जातेगांवमध्ये भाऊबंदकीमधील वाद विकोपाला गेला असून माजी सरपंचांच्या मुलाचे डोके पिस्तुलाच्या बटने डोके फोडणाऱ्या भानुदास पोटघन व त्यांच्या पत्नीला गावठी कटटा, तलवार तसेच लाकडी दांडक्याचा धाक दाखवित मारहाण केल्याचा गुन्हा सुपे पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात भानुदास रामचंद्र पोटघन (वय ६६ रा. जातेगांव) यांनी फिर्याद दाखल … Read more

हेलिकॉप्टर सफरीबाबत खुलासा झाल्यानंतरही शिळ्या काढिला ऊत कशाला ?

अहमदनगर Live24 टीम, 25 नोव्हेंबर 2020 :- नगर शहर शिवसेनेत गट तट आता नाहीत . शिवसैनिकातील नाराजी नाट्य आता पूर्णपणे संपलेले आहे . शिवसेना संपर्क प्रमुख भाऊ कोरगावकर यांच्याबाबत शहर शिवसेनेत कधीच नाराजी नव्हती . त्यांना पदावरून हटविण्याबात आमच्यात कधी चर्चाच झालेली नसताना व स्थानिक आमदारांची सरचिटणीस मिलिंद नार्वेकर साहेबांसोबत झालेली हेलिकॉप्टर सफर याबाबत पक्षश्रेष्ठीकडून … Read more

पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न मार्गी लावणार्‍या नगरसेवकांचा नागरी सत्कार

अहमदनगर Live24 टीम, 25 नोव्हेंबर 2020 :-काटवन खंडोबा रोड येथील साई कॉलनीचा एक वर्षापासून असलेला पिण्याच्या पाण्याचा प्रलंबीत प्रश्‍न नगरसेवक बाळासाहेब बोराटे, मंगलाताई लोखंडे व परेश लोखंडे यांनी सोडविल्याबद्दल त्यांचा स्थानिक नागरिकांच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी साई कॉलनीचे अध्यक्ष वैभव चव्हाण, अनिल दारकुंडे, संतोष दारकुंडे, जयश्री दारकुंडे, मंदा वाळके, संगीता दारकुंडे, वैभव चव्हाण, … Read more

स्वच्छतेच्या माध्यमातून शहराचा कायापालट होणार

अहमदनगर Live24 टीम, 25 नोव्हेंबर 2020 :-दोन वर्षांपासून स्वच्छ सर्वेक्षणाच्या माध्यमातून नगर शहर कचरा कुंडीमुक्त झाले. नागरिकांनी केलेल्या सहकार्यामुळे नगर शहर स्वच्छतेच्या बाबतीत देशात ३० व्या स्थानावर आले. आता पुन्हा स्वच्छ सर्वेक्षण सुरू झाले आहे. सर्व नगरकरांच्या सहकार्यातून नगर शहर देशात टॉपटेन करणार आहे, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले. शहरातील सारसनगर येथे भुयारी … Read more

शहरातील कुष्ठधाम रस्त्यावरील बांधकामाला स्थगिती

अहमदनगर Live24 टीम, 25 नोव्हेंबर 2020 :- कुष्ठधामलगत असलेल्या भूखंड १२२ मध्ये सुरू बांधकाम विनापरवाना असल्याची तक्रार वैभव जाधव यांनी आयुक्तांकडे केली होती. हे बांधकाम स्थगित करण्याचे आदेश मनपा नगररचना विभागाच्या सहायक संचालकांनी दिले आहेत. पत्रात सहायक संचालकांनी सावेडी नगररचना योजना ४ अंतिम भूखंड १२२ अ जागेतील रेखांकनास अंतिम मंजुरीबाबत संदर्भ दिला आहे. जागेच्या रेखांकनास … Read more

वाढत्या चोरीच्या घटनांना आवर घाला; नागरिकांचे पोलिसांना साकडे

अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2020 :-जिल्ह्यात गुन्हेगारी वाढत चालली असून गुन्हेगार आपल्या क्षेत्रात अपडेट होत गुन्हेगारीसाठी आता नवनवे फंडे वापरू लागला आहे. वाढती गुन्हेगारी हि पोलिसांबरोबरच आता नागरिकांसाठी डोकेदुखी ठरू लागली आहे. मात्र अशा भामट्यांना गजाआड करण्यासाठी पोलीस प्रशासन देखील आक्रमक झाले आहे. मात्र तरी देखील शहरात वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण … Read more