बेशिस्त वाहनधारकांवर कारवाई करत दीड कोटीहून अधिकचा दंड वसूल

अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2020 :- वाहनधारकांकडून वाहतुकीच्या नियमांचे पालन केले जावे यासाठी आरटीओ, वाहतूक शाखेच्या वतीने दंडात्मक कारवाई केली जाते. नागरिकांना नियमांचे महत्व समजावे हा या कारवाई मागे उद्देश असतो.  अशाच काही कारवाई मध्ये कोट्यवधींची दंडात्मक वसुली करण्यात आली आहे. पुणे- नाशिक राष्ट्रीय महामार्गावरुन प्रवास करणार्‍या बेशिस्त वाहन चालकांवर डोळासणे महामार्ग पोलिसांनी स्पीडगन … Read more

वासन टोयोटात इनोव्हा क्रिस्टाचे आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते अनावरण

अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2020 :-एमपीव्ही सेगमेंटमध्ये भारतात अव्वल ठरलेली व ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली नवीन इनोव्हा क्रिस्टाचे अनावरण शहरातील केडगाव इंडस्ट्रियल इस्टेट येथील वासन टोयोटा शोरुममध्ये आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते थाटात झाले. यावेळी जनक आहुजा, अनिश आहुजा, माजी नगरसेवक अजिंक्य बोरकर, दिपक जोशी, प्रविण जोशी, रविंद्र थोरात, सावली संस्थेचे नितेश बनसोडे आदी उपस्थित … Read more

शाळा परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री नको

अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2020 :- जिल्ह्यातील शाळांच्या परिसर हा तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ विक्रीपासून मुक्त असला पाहिजे. त्यादृष्टीने सर्व शाळा परिसरांचा अहवाल येत्या आठवडाभरात देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी केल्या आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग तसेच इतर आरोग्य यंत्रणांशी संबंधित विषयांसंदर्भात आज येथील जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी आढावा घेतला. त्यावेळी ते … Read more

ट्रकचालकाला लुटणाऱ्या आरोपीला पोलिसांनी केले गजाआड

अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2020 :-नगर तालुक्यातील शेंडी बायपास येथे आयशर टेम्पो उभा करून चालकावर हल्ला करत लुटल्याची घटना नुकतीच घडली होती. नगर तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत हि घटना घडली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान ट्रक चालकाला लुटणाऱ्या या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने औरंगाबाद येथून ताब्यात घेतले आहे. अविनाश दानियल चौतमल … Read more

बनावट धनादेशाद्वारे खात्यातून लाखो रुपये काढले

अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2020 :- बिहार राज्यातील छपरा येथील बँक ऑफ बडोदा शाखेतील डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग ऑफिस अर्ज बचत खाते द्वारे दोन बनावट धनादेश द्वारे नगर मधील सावेडी शाखेतून तब्बल 89 लाख रुपये काढण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघा आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी खातेदार … Read more

विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी सासरच्यांविरोधात गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2020 :-जिल्ह्यात महिला अत्याचाराच्या घटना मध्ये वाढ होत आहे. तसेच यामुळे महिलांचे अस्तित्व धोक्यात येऊ लागले आहे. तसेच जिल्ह्यात दरदिवशी महिलांच्या कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना वाढू लागल्या आहेत. नुकतेच नेवासा तालुक्यात महिला हिंसाचाराची घटना घडली आहे. लग्नानंतर दोन वर्षांनी पतीसह सासरच्या मंडळींनी पैशाची मागणी करून शारीरिक व मानसिक छळ केल्याची फिर्याद … Read more

महाविकास आघाडी सरकार म्हणजे महाराष्ट्रावर आलेले एक मोठे संकट ; माजी पालकमंत्र्यांचा हल्लाबोल

अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2020 :- महाविकास आघाडी सरकार म्हणजे महाराष्ट्रावर आलेले एक मोठे संकट असल्यासारखी परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झाली आहे. राज्यातील सध्याचे हे सरकार लवकरच कोसळेल कारण हे सरकार जनतेच्या मनातील सरकार नाही, असं वक्तव्य माजी मंत्री राम शिंदे यांनी केले आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त भाजप नेते आणि माजी मंत्री राम … Read more

संपात सहभागी झाल्याने दिवसभर मनपाचे काम बंदच

अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2020 :-कामगार कायद्यातील बदलामुळे कामगारांमधून संताप व्यक्त होत आहे. याच नवीन कामगार कायद्याविरोधात देशव्यापी संपाची हाक देण्यात आली होती. या देशव्यापी संपात महापालिकेतील कर्मचारी सहभागी झाल्याने झाडूकामासह अत्यावश्यक सेवा वगळता इतर कामकाज गुरूवारी दिवसभर ठप्प होते. युनियनने मनपात कर्मचाऱ्यांशी संवाद साधून भूमिका हि मांडली होती. महाराष्ट्र राज्य श्रमिक संघाशी कामगार … Read more

त्या गुन्हेगारांवर मोक्का अंतर्गत कारवाई करा

अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2020 :-नगर जिल्ह्यात दरोड्खोरी, चोरी, घरफोडीचे घटनामध्ये सातत्याने वाढ होत आहे. संपूर्ण जिल्ह्यात चोरटयांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. वाढत्या चोरीच्या घटनांमुळे मात्र नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण होत आहे.यातच सराफ व्यापाऱ्यांना लुटण्याच्या अनेक घटना जिल्ह्यात घडल्या आहेत. याच अनुषंगाने जिल्ह्यातील सराफ सुवर्णकार व्यावसायिकांना लुटणाऱ्या गुन्हेगारांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई करावी, अशी … Read more

कोरोना रुग्णसंख्या वाढू लागली तसेच मृत्यूचे प्रमाणही, काल झाले ‘इतके’ मृत्यू !

अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2020 :-अहमदनगर जिल्ह्यात दिवाळीनंतर कोरोना रुग्णसंख्या वाढू लागली आहे. मृत्यूचे प्रमाण काहीसे वाढले आहे.नगर शहर व जिल्ह्यात गुरुवारी ३३८ नवे पॉझिटिव्ह आढळले. सहा जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. गुरुवारी २६० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५९ हजार ६४३ झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.६१ टक्के … Read more

गतिमान काम करा जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांच्या सूचना

अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2020 :- केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना- ग्रामीण आणि राज्य पुरस्कृत विविध आवास योजनांना गतिमान करण्यासाठी आणि गुणवत्ता वाढीसाठी राज्यात ‘महाआवास अभियान – ग्रामीण’ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत जिल्ह्यातील गटविकास अधिकार्‍यांनी गावनिहाय विविध प्रलंबित प्रस्तावांचा आढावा घेऊन येत्या आठ दिवसात परिपूर्ण प्रस्ताव सादर करावेत. या अभियानाची जिल्ह्यात योग्य प्रकारे … Read more

चोरट्यांच्या भीतीनं नागरिकांची झोप उडाली; पोलीस प्रशासन मात्र निर्धास्त

अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2020 :-नगर जिल्ह्यात दरोड्खोरी, चोरी, घरफोडीचे घटनामध्ये सातत्याने वाढ होत आहे. संपूर्ण जिल्ह्यात चोरटयांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. वाढत्या चोरीच्या घटनांमुळे मात्र नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण होत आहे. गेल्या काही दिवसांपासून नगर शहरासह जिल्ह्यात चोऱ्यांचे सत्र सुरूच आहे. नवीन पोलीस अधीक्षक येऊनही नागरिकांची सुरक्षितता वाऱ्यावर आहे. जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था … Read more

गावठी कट्टा बाळगणाऱ्यांना पोलिसांनी केले गजाआड

अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2020 :- बेकायदेशीर गावठी कट्टा बाळगणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हि कारवाई शहरातील ताराकपूर परिसरात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, २६ नोव्हेंबर २०२० रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके याना गोपनिय माहीती मिळाली कि, शिरपूर जि.धुळे येथून दोन इसम अहमदनगर येथे … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : जिल्ह्यातील रुग्णांची वाढती संख्या कायम,आजही वाढले ‘इतके’ रुग्ण…

अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2020 :-जिल्ह्यात आज २६० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५९ हजार ६४३ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९५.६१ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (बुधवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ३३८ ने वाढ झाली. … Read more

बायपास रस्त्यावर चाकूचा धाक दाखवून टेम्पो चालकाला लुटले

अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2020 :-नगर जिल्ह्यात दरोड्खोरी, चोरी, घरफोडीचे घटनामध्ये सातत्याने वाढ होत आहे. संपूर्ण जिल्ह्यात चोरटयांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. वाढत्या चोरीच्या घटनांमुळे मात्र नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण होत आहे. सद्यस्थिती महिन्यात हे प्रकार अधिक वाढीस लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातारण निर्माण झाले आहे. नुकतेच नगर तालुक्यातील शेंडी बायपास येथे आयशर टेम्पो उभा … Read more

जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला शेतकरी, कामगारांचा मोर्चा

अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2020 :- 26 नोव्हेंबरच्या देशव्यापी संपाच्या पार्श्‍वभूमीवर अहमदनगर जिल्हा कामगार आणि किसान संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने जुने बस स्थानक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करुन मोर्चाची सुरुवात करण्यात आली. नगर-पुणे महामार्गावरुन जिल्हाधिकारी कार्यालया जवळील भूजलसर्व्हेक्षण कार्यालयाच्या आवारात मोर्चा धडकला. … Read more

26 – 11 दहशतवादी हल्ल्यातील शहीद जवान यांना श्रद्धांजली

अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2020 :-  मुंबईत झालेल्या 26-11 दहशतवादी हल्ल्यातील शहीद जवान व पोलिसांना पोलीस बॉईज असोसिएशन महाराष्ट्र राज्याच्या वतीने हुतात्मा स्मारक येथे पुष्पचक्र वाहून व मेणबत्त्या प्रज्वलित करून श्रद्धांजली वाहण्यात आली भारत माता की जय वंदे मातरम च्या घोषणांनी परिसर दुमदुमला होता संस्थापक अध्यक्ष प्रमोद वाघमारे यांच्या आदेशावरून दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या … Read more

स्वातंत्र्य समता व बंधुत्व हेच बाबासाहेबांच्या संविधानाचा पाया – आ. संग्राम जगताप

अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2020 :- संविधान दिनानिमित्त शिव फुले-शाहू-आंबेडकर-साठे चळवळीतील संघटनांच्यावतीने मार्केट यार्ड येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून संविधानाचे वाचन करण्यात आले . तर भीम स्मरणाचे पठण करण्यात आले व आमदार संग्राम जगताप यांचा शिव फुले-शाहू-आंबेडकर-साठे चळवळीतील संघटनांच्यावतीने सविधान देऊन सत्कार करण्यात आला यावेळी सुरेश बनसोडे, अजय साळवे, उबेद शेख, … Read more