अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना अपडेट्स वाचा सविस्तर

अहमदनगर Live24 टीम,7 ऑक्टोबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ६१७ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४३ हजार ४९७ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९१.९४ टक्के इतके झाले आहे. सध्या उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या ३०७१ इतकी आहे. दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा ११९, … Read more

लवकरच लिंकरोड पुलाचे काम पूर्ण होणार : सभापती मनोज कोतकर

अहमदनगर Live24 टीम,7 ऑक्टोबर 2020 :- केडगाव उपनगराच्या विकासासाठी व विस्तारीकरणासाठी आ. संग्राम जगताप यांनी लिंकरोडच्या कामासाठी दीड कोटी रुपये व त्यावरील खोकर नदीवरील पुलासाठी १ कोटी रुपयांचा निधी असा सुमारे अडीच कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारकडून मंजूर करुन आणला व कामाला सुरुवातही झाली. रस्त्याचे व पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आणि कोरोनामुळे संपूर्ण देशात … Read more

मोठी बातमी! शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत

अहमदनगर Live24 टीम,7 ऑक्टोबर 2020 :- शहर पाणीपुरवठा योजनेवरील दुरुस्तीसाठी उद्या गुरूवारी (ता. ८) महापालिकेकडून शट-डाऊन घेण्यात येणार आहे. गुरूवारी सकाळी दहा वाजल्यापासून ते दुसर्‍या दिवशी पहाटे तीन वाजेपर्यंत ही दुरुस्ती सुरू राहणार आहे. त्यामुळे शहराच्या पाणीपुरवठ्यात महापालिकेने बदल केला आहे. बोल्हेगाव, नागापूर, सावेडी उपनगर परिसर, लक्ष्मीनगर, सूर्यनगर, निर्मलनगर, स्टेशन रोड परिसर, सारसनगर, स्टेशन रोड, … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : आज ६१७ रुग्णांना डिस्चार्ज

अहमदनगर Live24 टीम,7 ऑक्टोबर 2020 :- आज ६१७ रुग्णांना डिस्चार्ज मनपा ११९ अकोले २१ जामखेड ३७ कोपरगाव २७ नगर ग्रा.६७ नेवासा ४६ पारनेर २२ पाथर्डी २२ राहाता ५९ राहुरी ४८ संगमनेर ५६ शेवगाव २६ श्रीगोंदा २८ श्रीरामपूर ३४ कॅन्टोन्मेंट ०३ मिलिटरी हॉस्पिटल ०१ इतर जिल्हा ०१ एकूण बरे झालेले रुग्ण:४३४९७ अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील आजचे कोरोना अपडेट्स वाचा सविस्तर एका क्लिकवर

अहमदनगर Live24 टीम,6 ऑक्टोबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ४५२ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४२ हजार ८८० इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९०.६४ टक्के इतके झाले आहे.  दरम्यान, काल (सोमवारी)  सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण  संख्येत ४५२ ने वाढ … Read more

अहमदनगर शहर अध्यक्षपदी अमीर खान

अहमदनगर Live24 टीम,6 ऑक्टोबर 2020 :- मुस्लिम आरक्षण संघर्ष समन्वय समिती महाराष्ट्र राज्य संघटनेची अहमदनगर शहरात संघटनेचे प्रदेश महासचिव डॉ. परवेज़ अशरफी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीत संघटनेची सविस्तर माहिती डॉ. परवेज अशरफी यांनी दिली. ही संघटना मुस्लिम समाजाच्या हक्कासाठी, आरक्षण, स्व:रक्षण आणि समाजातील अनेक प्रश्‍न व समस्या सोडविण्यासाठी बांधिल आहे. या बैठकीत जिल्ह्याचे … Read more

द्विपक्षीय नवनिर्वाचित सभापतींनी केले सभेचे आयोजन

अहमदनगर Live24 टीम,6 ऑक्टोबर 2020 :-  महानगर पालिकेच्या स्थायी समितीच्या सभापदी पदाच्या निवडणुकीदरम्यान भाजपातून राष्ट्रवादीत प्रवेश केलेले मनोज कोतकर यांनी स्थायी समितीची सभा निश्‍चित केल्याची चर्चा महापालिकेत सुरु आहे. दरम्यान हि सभा शुक्रवारी दुपारी एक वाजता ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. सभापतिपदी वादग्रस्त निवड झाल्यानंतर सुरू झालेली चर्चा थांबविण्यासाठी मनोज कोतकर यांनी स्थायी समितीची घाईघाईने सभा … Read more

मोहिम यशस्वी करण्यासाठी गतिमानतेने काम करण्याची गरज- जिल्हाधिकारी श्री. द्विवेदी

अहमदनगर Live24 टीम,6 ऑक्टोबर 2020 :-  कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहिम सुरु केली आहे. या मोहिमेच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबांना भेटी देऊन त्यातील सदस्यांची कोरोनादूत तपासणी करत आहेत. मात्र, ही मोहिम प्रत्येक तालुकास्तरीय यंत्रणांनी अधिक गतिमानतेने राबविण्याची गरज आहे. त्याचबरोबर, सर्वेक्षणाची माहिती लगेचच पोर्टलवर अपलोड करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी … Read more

नगरकरांना खड्ड्यांपासून सुटका मिळणार; महापौरांनी दिला ‘हा’ आदेश

अहमदनगर Live24 टीम,6 ऑक्टोबर 2020 :-   शहरातील खड्डे व नादुरुस्त रस्त्यावरून शहरातील राजकारण सध्या चांगलेच चर्चेत आहे. लोकप्रतिनिधी यांच्यासह महापौरांनी या सस्म्या सोडविण्यासाठी आता पुढाकार घेतला आहे. दरम्यान येत्या काळात नगरकरांना खड्डे व खडमडीत रस्त्यांचा सामना करावा लागणार नाही, अशी अशा व्यक्त केली जाऊ शकते. शहरात यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला. त्यात शहरातील ओढ्या-नाल्यांवर इमारती … Read more

महिलांनी मांडले तहसीलदारांच्या दालनात ठिय्या आंदोलन

अहमदनगर Live24 टीम,6 ऑक्टोबर 2020 :-   मराठा समाजाच्या आरक्षणासह विविध प्रलंबित मागण्यासाठी सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चाच्या महिला पदाधिकाऱ्यांच्या शिष्ठमंडळाने नगर तहसीलदारांच्या दालनात ठिय्या आंदोलन करून तहसीलदार उमेश पाटील यांना निवेदन देण्यात आले. मराठा क्रांती मोर्चाच्या महिला आघाडी केंद्र व राज्य सरकारकडे अनेक दिवसांपासून अरक्षणासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी शांततेच्या व संयमाच्या मार्गाने पाठपुरावा … Read more

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५० लाखांच्या धनादेशांचे वाटप !

अहमदनगर Live24 टीम,6 ऑक्टोबर 2020 :-  कोव्हिड-१९ चा प्रादूभाव सुरु झाल्यापासून अहमदनगर जिल्हा पोलीस दलातील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी कोव्हिड-१९ चा प्रादूर्भाव रोखण्यासाठी कर्तव्य बजावत आहेत. हे कर्तव्य बजावत असताना काही पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा या आजाराने मृत्यू झाला. त्यामुळे या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या हस्ते आज प्रत्येकी … Read more

स्टेट बँक ‘ह्यांना’ देणार महिन्याला १ लाख रु ; उरले शेवटचे २ दिवस

अहमदनगर Live24 टीम,6 ऑक्टोबर 2020 :- स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) दोन वर्षांच्या पोस्ट डॉक्टरेट रिसर्च फेलोशिपसाठी अर्ज मागविले आहेत. त्याअंतर्गत यातील उमेदवारांना दरमहा 1 लाख रुपये वेतन दिले जाईल. त्याचबरोबर, फेलोशिप संपल्यानंतर कामगिरीच्या आधारावर 2 ते 5 लाख रुपयांची एकमुखी रक्कमही दिली जाऊ शकते. एसबीआय फेलोशिपसाठी ऑनलाईन नोंदणी 18 सप्टेंबरपासून सुरू झाल्या आहेत आणि … Read more

कोविडचा काळ हा सर्वांसाठी कठिण अनुभव : आ. संग्राम जगताप

अहमदनगर Live24 टीम,6 ऑक्टोबर 2020 :-   एप्रिल महिन्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर जिल्ह्यासह शहरात नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले होते. कोरोना संसर्ग विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी संपूर्ण देशामध्ये लॉकडाऊन केले. त्यावेळी सर्वसामान्य नागरिकांचे हातातील काम गेल्यामुळे अनेकजण आर्थिक संकटात सापडला असल्यामुळे त्याला अन्नधान्य व किराणाच्या माध्यमातून मदतीचा हात दिला. शहरात कोरोनाचे रुग्ण मोठ्याप्रमाणात आढळत चालल्यामुळे रुग्णांना … Read more

जिजाऊ ब्रिगेडच्यावतीने हाथरस प्रकरणातील आरोपींना फाशीच्या शिक्षेची मागणी

अहमदनगर Live24 टीम,6 ऑक्टोबर 2020 :-  उत्तर प्रदेशातील हाथरस येथील एका निष्पाप मुलीवर सामूहिक बलात्कार करुन तिच्यासोबत काही नराधमांनी अतिशय अमानवीय कृत्य केले आहे. दिल्ली येथे उपचारादरम्यान त्या मुलीचा मृत्यू झाला असून तिच्या आई-वडिलांच्या गैरहजेरीतच तिच्यावर अंत्यसंस्कार केले. ही अतिशय घृणास्पद व मानवजातीला काळीमा फासणारी घटना असून दिवसेंदिवस महिलांवरील अत्याचार वाढत चालले आहे. सरकार नावाच्या … Read more

नगर तालुक्यातील सर्व रस्त्यांची डांबराने पॅचिंग करण्याची मागणी

अहमदनगर Live24 टीम,6 ऑक्टोबर 2020 :- पावसामुळे नगर तालुक्यातील अनेक रस्त्यांची मोठी दुरावस्था झाली असून, रस्त्यावरील खड्डे लहान-मोठ्या अपघातांना कारणीभूत ठरत आहे. तातडीने रस्त्यांची डांबराने पॅचिंग करण्याच्या मागणीसाठी नगर तालुका राष्ट्रवादीच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आला. या आंदोलनात नगर तालुकाध्यक्ष गहिनीनाथ दरेकर, गजानन भांडवलकर, अक्षय भिंगारदिवे, वैभव म्हस्के, विशाल म्हस्के, विकास … Read more

हाथरसच्या घटनेचा निषेध नोंदवून, आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी

अहमदनगर Live24 टीम,6 ऑक्टोबर 2020 :- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई गट) च्या वतीने उत्तर प्रदेशातील हाथरस मध्ये दलित तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेचा निषेध नोंदवून शहरातून कँडल मार्चसह संविधान रॅली काढण्यात आली. धर्मांध सरकारमुळे देशात मुलगी व संविधान धोक्यात असल्याचा आरोप करीत हिटलशाही भाजप हटाव लोकशाही बचावच्या घोषणा देण्यात आल्या. तर हाथरस येथील घटनेचे … Read more

दलित तरुणीवर झालेल्या बलात्कार घटनेचा निषेध

अहमदनगर Live24 टीम,6 ऑक्टोबर 2020 :- उत्तर प्रदेशातील हाथरस मध्ये दलित तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेचा दलित महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध नोंदविण्यात आला. या प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात होऊन आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी व आरोपींना पाठीशी घालणार्‍या उत्तर प्रदेशातील संबंधीत सर्वच खात्यातील अधिकार्‍यांना सहआरोपी करण्याची मागणी करण्यात आली. तर योगी व मोदी सरकारच्या … Read more

आज ४१६ रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

अहमदनगर Live24 टीम,6 ऑक्टोबर 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज ४१६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४२ हजार ८८० इतकी झाली आहे.  रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९१.५१ टक्के इतके झाले आहे. सध्या उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या ३२४१ इतकी आहे.  दरम्यान, आज  डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा ३१, … Read more