कोरोनाचा रुग्ण बरा झाला तरीही धोका; `ही` लक्षणे आढळतात

अहमदनगर Live24 टीम,19 ऑगस्ट 2020 :- देशात कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढत आहेत. दिलासादायक बाब म्हणजे कोरोनावर मात करणाऱ्या पेशंटची संख्याही वाढते आहे. मात्र, कोरोनाचे रुग्ण बरा झाला तरी त्यांना पुन्हा आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आले तरी निश्चिंत राहणे धोकादायक आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतरही त्यांना … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ७८ नवे रुग्ण

अहमदनगर Live24 टीम,19 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज कोरोना आजारातून बरे झालेल्या ५२२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या आता ११,६४७ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ही ८१.१९ टक्के इतकी आहे. दरम्यान, काल (मंगळवार) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ७८ ने वाढ झाली. यामुळे … Read more

अहमदनगर जिल्ह्यात आज ५३६ रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

अहमदनगर Live24 टीम,19 ऑगस्ट 2020 :-अहमदनगर जिल्ह्यात आज ५३६ रुग्णांना मिळाला डिस्चार्ज. मनपा१५७  संगमनेर३८  राहाता२६  पाथर्डी२९  नगर ग्रा.४९  श्रीरामपूर१४  कॅन्टोन्मेंट१०  नेवासा२५  श्रीगोंदा१५  पारनेर२८  अकोले ७  राहुरी१५  शेवगाव३५  कोपरगाव१५  जामखेड२६  कर्जत३५  मिलिटरी हॉस्पिटल १  इतर जिल्हा१ बरे झालेले एकूण:११६६१ आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

गणेशोत्सवाबाबत आमदार संग्राम जगताप यांनी केली ही मागणी !

अहमदनगर Live24 टीम,19 ऑगस्ट 2020 :-गणेशोत्सवाची परंपरा खंडीत होऊ नये, यासाठी साध्या पध्दतीने गणेशोत्सव साजरा करण्यासाठी काही अटी-शर्तींवर गणेश मंडळांना परवानगी द्यावी, अशी मागणी आमदार संग्राम जगताप यांनी केली आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवावर प्रशासनाकडून निर्बंध आणण्याची तयारी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आमदार संग्राम जगताप यांनी आयुक्त श्रीकांत मायकलवार यांची भेट घेऊन चर्चा केली. कोरोना … Read more

एका दिवसात अहमदनगर जिल्ह्यात कोरोनामुळे ‘इतक्या’ रुग्णांचा मृत्यू !

अहमदनगर Live24 टीम,19 ऑगस्ट 2020 :- नगर शहर व जिल्ह्यात मंगळवारी कोरोनामुळे आणखी १३ जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील कोरोना बळींची संख्या आता १८१ झाली आहे. दरम्यान, चोवीस तासांत आणखी ६८१ रुग्ण आढळून आल्यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या १४ हजार २६७ झाली. जिल्ह्यात २१ जूनपासून सातत्याने रुग्णसंख्या वाढत आहे. गेल्या २४ तासांत जिल्हा रुग्णालयाच्या कोविड चाचणी प्रयोगशाळेत … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कामावर गैरहजर राहणाऱ्या ‘त्या’ डॉक्टरांवर गुन्हा दाखल !

अहमदनगर Live24 टीम,18 ऑगस्ट 2020 :-कोरोना विषाणू (कोव्‍हीड 19) चा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने प्रतिबंधात्‍मक उपाययोजना करण्यात येत आहेत. या उपाययोजनांचा एक भाग म्हणून जिल्हा रुग्णालयात आंतर रुग्ण होऊन दाखल होणाऱ्या रूग्णांची तपासणी करण्यासाठी डॉक्टरांच्या नेमणूक करण्यात आल्या होत्या. मात्र, आदेश मिळूनही कामावर गैरहजर राहिल्याने फिजीशिअन डॉ. पियुष मराठे यांच्यावर जिल्हा प्रशासनाने गुन्हा दाखल … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज ६८१ नवे रुग्ण वाढले !

अहमदनगर Live24 टीम,18 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज कोरोना आजारातून बरे झालेल्या ५०५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या आता ११,१२५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ही ७७.९८ टक्के इतकी आहे. दरम्यान, काल (सोमवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ६८१ ने वाढ झाली. … Read more

गणपती बाप्पासंदर्भात ‘हे’ उपाय करा; किस्मत चमकेल आणि पैसेही येतील

अहमदनगर Live24 टीम,18 ऑगस्ट 2020 :-  कोरोना विषाणूच्या या महामारीच्या काळात आपल्याला जीवनात सर्व प्रकारच्या अडथळ्यांना तोंड द्यावे लागत आहे. सर्व प्रयत्न करूनही आपणास कोणतेही काम मिळत नाही आणि आजूबाजूला निराशा येत आहे, यश मिळत नाही अशी परिस्थिती असेल तर तुमच्यासाठी, दु: ख विनाशक श्री गणपती बाप्पांची साधना खूप फलदायी सिद्ध होईल. गणेश चतुर्थीच्या दिवशी … Read more

गणेश चतुर्थीला ‘असे’ करा गणपती बाप्पाचे पूजन; पूर्ण होतील सर्व मनोकामना

अहमदनगर Live24 टीम,18 ऑगस्ट 2020 :- पौराणिक मान्यतांनुसार देवतांमध्ये प्रथम गणेशाची पूजा केली जाते. भगवान गणपतीचा जन्म भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या दिवशी झाला. हा दिवस प्रत्येक वर्षी सनातन परंपरेत गणेश चतुर्थी म्हणून साजरा केला जातो. या वर्षी या उत्सवाचा सुरु होण्याचा मुहूर्त 21 ऑगस्ट 2020 रोजी रात्री 11:02 पासून 22 ऑगस्ट 2020 रोजी रात्री 07:57 पर्यंत … Read more

प्रदीपशेठ गांधी यांच्या निधनाने नगरच्या उद्योग क्षेत्राला मोठा धक्का

अहमदनगर Live24 टीम,18 ऑगस्ट 2020 :-  उद्योग क्षेत्राच्या माध्यमातून नगरचे नाव राज्यभरात नेणारे येथील प्रसिद्ध उद्योजक, कोहिनूर वस्त्रदालनाचे संचालक प्रदीपशेठ गांधी (वय 65) यांचे करोनाने निधन झाले. चार दिवसांपासून त्यांच्यावर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. आज दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. कापड व्यवसायासाठी प्रसिद्ध असलेल्या कोहिनूर वस्त्रदालनासह विविध उद्योग-धंद्यांच्या माध्यमातून प्रदीपशेठ गांधी यांनी नगरच्या नावलौकिकात … Read more

अहमदनगरचा ‘कोहिनूर’ही कोरोनाने हिरावला !

अहमदनगर Live24 टीम,18 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर शहरातील कोहिनूर वस्त्रदालनाचे संचालक प्रदिप वसंतलाल गांधी (वय ६५) यांचे आज मंगळवार १८ ऑगस्ट रोजी खाजगी रुग्णालयात उपचारा दरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले.  काही दिवसांपूर्वीच त्यांना कोरोनाची लागण झाली होती,   गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या मागे पत्नी, १ मुलगा, १ मुलगी असा … Read more

कोहिनूर चे प्रदीप गांधी यांचे कोरोनाने निधन, परिवाराने केले ‘हे’ आवाहन

अहमदनगर Live24 टीम,18 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर शहरातील कापडबाजार येथील कोहिनूर चे मालक श्री प्रदिपशेठ गांधी यांचे आज कोरोना मुळे दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या वर खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. दरम्यान त्यांच्या निधनानंतर त्यांच्या परिवाराकडून एक संदेश देण्यात आला आहे – तो खालीलप्रमाणे –   दुःखद निधन श्री प्रदीपजी गांधी, उम्र ६५ वर्ष इनका मंगळवार … Read more

कोहिनूर चे मालक श्री प्रदीप शेठ गांधी यांचे दुःखद निधन

अहमदनगर Live24 टीम,18 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर शहराच्या वैभवात भर घालणारे कोहिनूर चे मालक श्री प्रदीप शेठ गांधी यांचे दुःखद निधन झाले आहे.  त्यांच्यावर खासगी हॉस्पिटलमध्ये चार दिवसांपासून उपचार चालू होते.दरम्यान उपचार चालू असतानाच आज दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. अहमदनगर सह राज्यात प्रसिद्ध असणाऱ्या कोहिनूर ह्या वस्त्रदालनाचे ते मालक होते.या दालनाच्या माध्यमातून नगरच्या सामाजिक व … Read more

खा.सुजय विखे म्हणाले नगर जिल्‍ह्यास वेठीस धरण्‍याचा प्रकार …मृत्‍युसंख्‍येबाबत सविस्‍तर अहवाल तयार करुन यावर भाष्‍य करणार

अहमदनगर Live24 टीम,18 ऑगस्ट 2020 :- आपला जिव धोक्‍यात घालून कोरोना संकटात सेवा देणा-या डॉक्‍टरांच्‍या संदर्भात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलेले विधान अतिशय अक्षेपार्ह असुन, याबद्दल त्‍यांनी देशातील डॉक्‍टरांची माफीच मागितली पाहीजे अशी मागणी भा.ज.पा चे खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी केली.  इतरांना काही कळत नाही आणि यांनाच सर्व कळत असेल तर राज्‍यातील कोरोना … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ८४ नवे रुग्ण

अहमदनगर Live24 टीम,18 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज कोरोना आजारातून बरे झालेल्या ५३९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या आता ११,१२५ इतकी झाली आहे.  रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ही ८१.३८ टक्के इतकी आहे. दरम्यान, काल (सोमवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ८४ ने वाढ झाली. यामुळे … Read more

कोरोना ब्रेकिंग : अहमदनगर जिल्ह्यात आतापर्यंत ११,१२५ रुग्ण झाले बरे!

अहमदनगर Live24 टीम,18 ऑगस्ट 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यात आतापर्यंत ११,१२५ रुग्ण झाले बरे! आज ५०५ रुग्णांना मिळाला डिस्चार्ज. मनपा २३० संगमनेर २४ राहाता ३५ पाथर्डी ३४ नगर ग्रा.२५ श्रीरामपूर २५ कॅन्टोन्मेंट १३ नेवासा १९ श्रीगोंदा १८ पारनेर ०५ अकोले ०४ राहुरी १५ शेवगाव १३ कोपरगाव १३ जामखेड ०८ कर्जत २१ मिलिटरी हॉस्पिटल ०१ इतर जिल्हा … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ३६३ नवे रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम,17 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज कोरोना आजारातून बरे झालेल्या ५३९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या आता १०६२० इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ही  ७८.१७ टक्के इतकी आहे. दरम्यान, काल (रविवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ३६३ ने वाढ झाली. यामुळे … Read more

जिल्हा रुग्णालयातील कोरोना योद्धे गणेश बारवकर यांचे दु:खद निधन

अहमदनगर Live24 टीम,17 ऑगस्ट 2020 :-  महाराष्ट्र औषध निर्माण अधिकारी संघटनेचे पदाधिकारी जिल्हा रुग्णालयातील औषधनिर्माते गणेश बारवकर यांचे नुकतेचे कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावामुळे दु:खद निधन झाले. मृत्यू समयी ते 40 वर्षांचे होते. त्यांच्यावर अमरधाम स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. स्व.बारवकर यांच्या पश्‍चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, भाऊ-बहिण असा परिवार आहे. स्व.बारवकर हे जिल्हा रुग्णालयातील औषध विभागात … Read more