अहमदनगर ब्रेकिंग : दोन गटात तुफान हाणामारी , चौघांचा जागीच मृत्यू !

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2020 :- मागील वादाच्या कारणातून एका विशिष्ट समाज्यातील दोन गटात आज दुपारी साडेचार वाजता श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर फाट्यावर तुफान हाणामारी झाली.  या हाणामारीत झालेल्या चाकू हल्ल्यात एका गटातील चौघेजण मयत झाल्याची माहिती बेलवंडी पोलिसांकडून समजली आहे मयत झालेले चौघेजण हे सुरेगाव येथील आहेत. …………………………………………………………………….. जाहिरात : व्यवसायाची सुवर्णसंधी – येवले … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : गेल्या चोवीस तासांत वाढले ४१७ रुग्ण, वाचा सविस्तर अपडेट्स

File Photo

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज ५०६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे कोरोनातून बरे झालेल्या रुग्ण संख्येने १२ हजारांचा टप्पा ओलांडला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १२ हजार १५३ इतकी झाली आहे.  रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण  आता ७९.२५ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (बुधवारी ) सायंकाळी सहा … Read more

‘लालपरी’ झाली प्रवाशांच्या सेवेसाठी पुन्हा सज्ज!

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2020 :-  कोरोना प्रादुर्भाव वाढू लागल्यानंतर प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेऊन लॉकडाऊन काळात बंद करण्यात आलेली राज्य परिवहन महामंडळाची आंतरजिल्हाबस सेवा आज पूर्ववत आरोग्यविषयक नियमांचे काटेकोरपणे पालन करीत सुरु झाली. प्रवाशांच्या सेवेसाठी हे बिरुद मिरवणारी एसटी बसेस ने आज जिल्हा मुख्यालयाच्या माळीवाडा, स्वस्तिक आणि तारकपूर बस स्थानकातून प्रवाशांसह इच्छित स्थळी प्रयाण … Read more

आता या मोर्चावर पोलिस कारवाई करणार का ?

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2020 :- नगर शहरात कोरोचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नयेत असा आदेश आहे. मात्र, कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी नगरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. आता या मोर्चावर पोलिस कारवाई करणार का असा सवाल विचारला जात आहे. या … Read more

स्वच्छता अभियान: अहमदनगर महापालिकेने देशात पटकावला `हा` क्रमांक

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2020 :-  यावर्षी स्वच्छ सर्वेक्षणात अहमदनगर शहराचा समावेश झाला होता. यामध्ये नागरिकांचा व समाजातील सर्व स्तरांचा सहभाग स्वच्छ भारत अभियानामध्ये करणे. याकरिता त्यांच्यामध्ये माहिती, शिक्षण व संवादाद्वारे साधून त्यांच्या वर्तनातील बदल घडवणे हा या सर्वेक्षणाचा प्रमुख हेतू होता. केंद्र सरकारने मागील वर्षापासून स्वच्छ सर्वेक्षणात बदल केले होते. तीन टप्प्यात सर्वेक्षण … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ५७ ने वाढ झाली

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ५०६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्येने १२ हजारांचा टप्पा ओलांडला.  आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १२ हजार १५३ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे ८० टक्क्यांहून अधिक असून ते आता ८१.१६ टक्के इतके झाले आहे.  … Read more

आंतर जिल्हा बस वाहतूक आजपासून सुरु

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2020 :-  आंतर जिल्हा बस वाहतूक आजपासून सुरु झाली. अहमदनगर येथून विविध भागासाठी बस सोडण्यात आल्या. यावेळी प्रवाशांची काळजी घेण्यात येत होती. प्रवाशांमध्ये पुरेसे अंतर ठेऊन आणि चेहऱ्यावर मास्क ठेवणे आवश्यक करण्यात आले. आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

गणेश मंडळाच्या बैठकीत उपस्थित राहिलेले अध्यक्षच कोरोना पॉझिटिव्ह, प्रतिष्ठीत धास्तावले !

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2020 :-  सध्या गणेशोत्सवाची सर्वत्र तयारी सुरु आहे. परंतु यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा उत्सव साध्या पद्धतीने आणि प्रशासकीय नियम पाळून साजरा केला जाणार आहे. या संदर्भात अहमदनगर शहरातील गणपती मंडळांच्या अध्यक्षांची एक बैठक बोलावली होती. परंतु या बैठकीत उपस्थित असणाऱ्या मानाच्या एका गणेश मंडळाच्या अध्यक्षाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने बैठकीला … Read more

हे सगळं कोरोनापेक्षा भयावह आहे. कोरोनातून आपण नक्की बरे व्हाल पण …

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2020 :-  मागील काही दिवसांपासून अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अकोले तालुक्यातही कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने चिंता वाढली आहे. अकोले तालुक्यात दिवसेंदिवस करोनाचे रुग्ण वाढतच चालले आहे. याच पार्श्वभूमीवर तालुक्याचे तहसीलदार मुकेश कांबळे यांनी कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी अकोले तालुका व शहरवासीयांसाठी महत्वाची सूचना व नम्र निवेदन सादर … Read more

कोरोना ब्रेकिंग : अहमदनगर जिल्ह्यात बरे होणाऱ्या रुग्ण संख्येने ओलांडला १२ हजारांचा टप्पा !

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात बरे होणाऱ्या रुग्ण संख्येने ओलांडला १२ हजारांचा टप्पा. आज ५०६ रुग्णांना डिस्चार्ज. त्यामुळे बरे होणाऱ्या रूग्णांची एकूण संख्या आता १२,१५३ मनपा १९१ संगमनेर३६ राहाता२८ पाथर्डी२० नगर ग्रा.४० श्रीरामपूर२४ कॅन्टोन्मेंट६ नेवासा२४ श्रीगोंदा१८ पारनेर२५ अकोले २० राहुरी ७ शेवगाव २८ कोपरगाव७ जामखेड२४ कर्जत ५ मिलिटरी हॉस्पिटल ३ आमच्या … Read more

हे सरकार ५ वर्षे स्थिर राहणे अवघड आहे – खासदार सुजय विखे

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2020 :- तीनचाकी सरकार चालवण्यासाठी मोठी काळजी घ्यावी लागते. पाच मिनिटे तीनचाकी रिक्षा चालवण्याचा मी अनुभव घेतला आहे. हे सरकार ५ वर्षे स्थिर राहणे अवघड आहे. राज्य सरकारने दूध दरवाढीबाबत तातडीने निर्णय घेण्याची गरज आहे. पिकांच्या नुकसानीचे अद्याप पंचनामे झालेले नाहीत, अशी टीका खासदार डाॅ. विखे यांनी केली. खासदार असलोे, … Read more

निष्क्रीय सरकार शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करीत आहे

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2020 :- शेतकरी बांधवांच्या संवेदनाची कदर न करणाऱ्या राज्य सरकारला जागे करून दूध उत्पादकांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी विविध मागण्यांचे स्मरणपत्र पाठवून महादूध आंदोलन करण्यात आले. महाविकास आघाडी सरकारला बळीराजाच्या प्रश्नाचे गांभीर्य नसल्याने भाजप महायुती हा लढा आणखी तीव्र करणार असल्याचा इशारा भाजपच्या प्रदेश सचिव माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी आंदोलनावेळी … Read more

जिल्ह्यात कोरोनाने आणखी दहा जणांचे बळी घेतले

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2020 :-  नगर शहर व जिल्ह्यात कोरोनाने आणखी दहा जणांचे बळी घेतले. त्यामुळे बळींची संख्या १९१ झाली आहे. दरम्यान, चोवीस तासांत जिल्ह्यात आणखी ६५० पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. नगर शहरात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७८.०८ टक्के आहे. उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या ३ हजार … Read more

विवाहितेला लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार करणाऱ्या युवकास अटक

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2020 :-  विवाहितेला लग्नाचे आमिष दाखवून वर्षभर तिच्यावर अत्याचार करणाऱ्या तालुक्यातील गुंजाळवाडी येथील युवकावर अत्याचार व अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. नीलेश देशमुख (कृष्णानगर, विडी कामगार सोसायटी, गुंजाळवाडी) याला २४ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. या तरुणाने खांडगावच्या २८ वर्षीय विवाहितेशी ओळख वाढवत लग्नाचे आमिष दाखवून … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2020 :- शेतमालासाठी किसान रेल्वे दर शुक्रवारी नगरच्या रेल्वेस्थानकावर थांबणार आहे. दुपारी ३.३५ ला तिचे आगमन होईल. ही गाडी २१ ऑगस्टपासून कोल्हापूर येथून सुरू होणार अाहे. मार्गावरील सर्व थांब्यांवर शेतमालाची लोडिंग, अनलोडिंग करण्याची परवानगी आहे. ही सेवा सुरूवातीला आठवड्यातून एकदा असेल. कोल्हापूरहून मिरज, सांगोला, पंढरपूर, कुर्डुवाडी, दौंड आणि नगर या … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : वाढले ६५० नवे रुग्ण, वाचा 24 तासांतील अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम,19 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज कोरोना आजारातून बरे झालेल्या ५२२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या आता ११,६४७ इतकी झाली आहे.  रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ही ७८.०८ टक्के इतकी आहे. दरम्यान, काल (मंगळवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ६५० ने वाढ झाली. … Read more

नगरमधील गोंधळ चव्हाट्यावर; कोण निगेटिव्ह अन पॉझिटिव्ह कोण याचा मेळ बसेना

अहमदनगर Live24 टीम,19 ऑगस्ट 2020 :-  नगर शहरात करोनाचा पादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. सिव्हिल आणि खासगी लॅबमध्ये कोरोना चाचणीसाठी नागरिकांच्या रांगा लागत आहेत. मात्र, प्रशासनातील सावळा गोंधळ सुरु असल्याने उपचारा अभावी लोकांना ताटकळत आहे. आता आरोग्यविभागाला कोण निगेटिव्ह अन पॉझिटिव्ह कोण याचा मेळ बसेना. सावेडीतील 46 वर्षाची महिलाही कोरोना चाचणीसाठी सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल झाली. सकाळीच … Read more

भिंगार येथे अश्या प्रकारे साजरा होणार गणेशोत्सव

अहमदनगर Live24 टीम,19 ऑगस्ट 2020 :-  नगर कोरोना कोविड संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर भिंगार येथे यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने पण भक्तीमय वातावरणात साजरा करण्याचा निर्णय मानाच्या गणपतीसह सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी घेतला आहे. तर काही मंडळांनी गणेशोत्सव साजरा करणार नसल्याचे जाहीर केले. भिंगार येथील देशमुख सांस्कृतिक हाॅल मध्ये कॅम्प पोलिसांनी येथील शांतता समिती सदस्य व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांची … Read more