माजी आमदार अनिल राठोड अनंतात विलीन
अहमदनगर Live24 टीम,5 ऑगस्ट 2020 :- शिवसेनेचे उपनेते, माजी मंत्री अनिल राठोड यांचे बुधवारी पहाटे ह्रदयविकाराने निधन झाले. गेल्या आठवड्यात त्यांना खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या मागे एक मुलगा, तीन मुली असा परिवार आहे. अहमदनगर शहरातील अमरधाममध्ये त्यांच्यावर अंतीम संस्कार करण्यात आले. हजारो चाहते, समर्थकांनी गर्दी करत लाडक्या भैय्या यांना अखेरचा निरोप दिला. … Read more