अहमदनगर ब्रेकिंग : आणखी 3 कोरोना रुग्ण वाढले जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या @43

अहमदनगर :- जामखेड येथील कोरोना रुग्णाच्या संख्येत आज आणखी ०३ व्यक्तींची भर पडली. जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे काल पाठविलेल्या अहवालापैकी या व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये दोन पुरुष तर एक महिला आहे. त्यामुळे एकट्या जामखेड शहरातील बाधीत रुग्णांची संख्या आता १७ झाली आहे तर जिल्ह्यातील बाधीतांची संख्या ४३ झाली आहे. नागरिकांनी विनाकारण … Read more

कोरोनाची लागण झालेल्या ‘त्यांची’ रवानगी न्यायालयीन कोठडीत

अहमदनगर Live24 :- व्हिसाचा गैरवापर करत नगरमध्ये बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या २६ परदेशी नागरिकांना जिल्हा व सत्र न्यायालयाने आठ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. मुदत संपल्यानंतर त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता त्या सर्वांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. तबलिगी जमातसाठी आलेले परदेशी नागरिक कायद्याचे उल्लंघन करून नगर जिल्ह्यात राहिले. त्यातील चार जणांना कोरोनाची लागण झाली. इतरांनाही क्वारंटाइन … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील आजचे कोरोना न्यूज अपडेट्स

अहमदनगर :- आज अहमदनगर जिल्ह्यातील ४१ पैकी २४ व्यक्तींच्या घशातील स्त्राव चाचणीचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यात, जामखेड येथील १६, अहमदनगर शहर व तालुका ०५, संगमनेर ०१, अकोले ०१ आणि आष्टी तालुक्यातील ०१ जणांचे अहवाल निगेटिव्ह असून अद्याप १७ अहवालाची प्रतीक्षा आहे. #FightAgainstCOVID19#Ahmednagar जिल्ह्यातील ४१ व्यक्तींच्या स्त्राव चाचणी अहवालाची प्रतीक्षा. आतापर्यंत १४८३ पैकी १३८१ अहवाल … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील नागरिक आणि दुकानदारांसाठी महत्वाची बातमी

अहमदनगर Live24 :- आजपासून देशभरातील दुकानं उघडण्यास सरकारकडून परवानगी देण्यात आली आहे.गृहमंत्रालयानं काढलेल्या आदेशानुसार सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये दुकानं ही आजपासून सुरू करण्यात येणार आहे. कोरोनाबाबत खबरदारीचा उपाय म्हणून सगळीकडे अत्यावश्यक सेवेची दुकान म्हणजे अन्न धान्य, मेडिकल्स, दूध, भाजीपाला वगळता मॉल्स, व्यायामशाळा, चित्रपट आणि नाट्यगृहे, जलतरण तलाव आणि अन्य प्रकारची दुकानं बंद करण्याचा निर्णय … Read more

रमजानमध्ये मुकुंदनगर भागात मुलभूत सुविधांना सवलत देण्याची मागणी

अहमदनगर (प्रतिनिधी)- कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील हॉटस्पॉट ठरलेल्या मुकुंदनगर भागामध्ये रमजान निमित्त मुलभूत जीवनावश्यक वस्तूंसाठी सवलत देण्याची तसेच पहाटे व संध्याकाळी दोन वेळच्या आजानला मुभा मिळण्याची मागणी समाजवादी पार्टीच्या वतीने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजीत पवार, अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक व समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांच्याकडे शहराध्यक्ष अजीम राजे यांनी निवेदन पाठवून केली आहे. कोरोनाचा … Read more

तर रमजान घरच्या घरीच साजरी करण्याचे आवाहन

अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर-पाथर्डी रोड येथील जामिया इस्लामिया इशातुलउलूम अक्कलकुवा संचलित जामिया मोहम्मदिया मदरसा बाराबाबळी (ता. नगर) येथील विलगीकरण कक्षातून 144 क्वॉरन्टाईन नागरिकांना शुक्रवार दि.24 एप्रिल रोजी सोडण्यात आले. मदरसाच्या विश्‍वस्त व स्वयंसेवकांनी क्वॉरन्टाईन नागरिकांना मास्कचे वाटप करुन कोरोनाच्या बचावासाठी घरा बाहेर न पडता स्वत:सह कुटुंबीयांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे व रमजानच्या महिन्यात नमाज, उपवास घरातच करण्याचे … Read more

लक्ष्मीबाई भाऊराव पाटील विद्यालयाचे सहा विद्यार्थी मंथन प्रज्ञा शोधमध्ये राज्याच्या गुणवत्ता यादीत

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी मंथन प्रज्ञा शोध परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. तर राज्याच्या गुणवत्ता यादीमध्ये विद्यालयाच्या 6 विद्यार्थ्यांनी स्थान पटकाविला आहे. मंथन प्रज्ञा शोध परीक्षेत जिल्ह्यासह राज्यातील अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. गुणवत्तेची परंपरा कायम राखत लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक विद्यालयातील इयत्ता दुसरी मधील … Read more

सर्वात मोठी बातमी : आजपासून देशभरातील दुकानं उघडण्यास परवानगी !

अहमदनगर :-  दुकानदारांसाठी आणि व्यवसायिकांसाठी दिलासा देणारी बातमी आज आलीय, आजपासून देशभरातील दुकानं उघडण्यास सरकारकडून परवानगी देण्यात आली आहे. गृहमंत्रालयानं काढलेल्या आदेशानुसार सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये दुकानं ही आजपासून सुरू करण्यात येणार आहे. या दुकानांची सरकारकडे नोंदणी असणं आवश्यक आहे. देशभरात लॉकडाऊनमध्ये  केंद्र सरकारच्या गाईडलाईन मध्ये अजून शिथिलता देण्यात आली आहे. मॉल्स वगळता इतर … Read more

रमजानवर कोरोनाचे सावट, मुस्लिम बांधवांना घरात साजरा करावा लागणार रमजान

अहमदनगर :-  रमजान महिना आजपासून सुरु होत आहे. या सणावर कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे मुस्लिम बांधवांना घरात राहूनच हा सण साजरा करावा लागणार आहे. नगरमध्ये रमजान मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. मुस्लिम बांधव तीस दिवस रोजे ठेवतात. या सणासाठी लागणाऱ्या साहित्याची पंधरा दिवसांपूर्वीच खरेदी करण्यात येते. यंदा मात्र या सणावर कोरोनाचे सावट आहे. मुकुंदनगर व … Read more

अहमदनगरमध्ये कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण समाधानकारक, २६ दिवसांत २४ रुग्ण झाले ठणठणीत …

अहमदनगर :-  जिल्ह्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण समाधानकारक आहे. गेल्या २६ दिवसांत २४ रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या नगरच्या बूथ हॉस्पिटलमध्ये १२ जणांवर उपचार सुरू आहेत. शुक्रवारी आणखी चार रुग्णांना १४ दिवसांच्या उपचारांनंतर घरी सोडण्यात आले. दरम्यान, गुरुवारी रात्री जामखेडमध्ये कोरोनाचा आणखी एक, तर शुक्रवारी दोन रुग्ण आढळून आले. त्यामुळे जामखेडमध्ये … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील २८ व्यक्तींची कोरोना चाचणी निगेटिव्ह !

अहमदनगर :- जिल्हा रुग्णालया आणि प्रवरा ग्रामीण रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे गुरुवारी पाठविलेल्या २८ व्यक्तींच्या घशातील स्त्राव चाचणी अहवाल आज रात्री प्राप्त झाले. हे सर्व अहवाल निगेटिव्ह आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीपकुमार मुरंबीकर यांनी दिली. तसेच आज आणखी १४ व्यक्तींच्या घशातील स्त्राव तपासणीसाठी पुण्याला पाठविण्यात आले आहेत. आज निगेटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये … Read more

होय ! आता वेळ बदललीय : फेसबुक म्हणतेय अहमदनगर Live24 नंबर 1

???? होय ! आता वेळ बदललीय ! ????‍♂️ फेसबुक म्हणतेय अहमदनगर Live नंबर 1 ???? कोरोना व्हायरस तसेच अहमदनगर जिल्ह्यातील लॉकडाउन व ब्रेकिंग न्यूज चे वेगवान अपडेट्स दिल्याने गेल्या सात दिवसांत अहमदनगर Live24 चे फेसबुक पेज नंबर 1 ???? अहमदनगर Live च्या फेसबुक पेजला अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक नेटीझन्सने पसंती दिली असून ???? गेल्या सात दिवसांत पेज Engagement 3,33,333 हून अधिक … Read more

विनाअनुदानित शिक्षकांवर उपासमारीची वेळ

नगर- कोरोनाच्या अभुतपूर्व संकटामुळे देशात लाॅकडाऊन लागू करण्यात आला. यामुळे सर्वच स्तरातील लोकांना वेगवेगळ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. राज्यातील विनाअनुदानित शिक्षकांना वेतना अभावी हाल होत आहेत. त्यामुळे या शिक्षक कर्मचाऱ्यांना लॉकडाऊन काळात प्रतिमहा ठराविक सानुग्रह अनुदान द्यावे, अशी मागणी अहमदनगर जिल्हा कनिष्ठ महाविद्यालय संघटनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे जिल्हा अध्यक्ष डॉ. नवनाथ टकले, सेक्रेटरी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : आणखी 2 व्यक्ती कोरोना बाधीत ,अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्ण @ 40!

अहमदनगर :- जामखेड येथील कोरोना रुग्णाच्या संख्येत आज आणखी ०२ व्यक्तींची भर पडली. जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे काल पाठविलेल्या अहवालापैकी या व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे एकट्या जामखेड शहरातील बाधीत रुग्णांची संख्या आता १४ झाली आहे. बुधवारी कोरोना बाधीत आढळलेल्या २ व्यक्तींचे हे दोन्ही मित्र असून त्यांना लागण झाल्याचे आज स्पष्ट झाले. … Read more

अहमदनगरच्या दोन भावांचे ग्रेटवर्क : लॉकडाऊनमध्ये घरबसल्या तयार केली ‘व्हेंटिलेटर मशीन !

अहमदनगर Live24 :- आज संपूर्ण जग कोरोना या संसर्ग विषाणूशी लढत आहे. या विषाणूमुळे मानवी जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे परिस्थिती चिंताजनक झाली आहे. मानवी जीवनावर आलेल्या या संकटावर मात करण्यासाठी प्रशांत सिसोदिया, विशाल सिसोदिया या दोन्ही भावांनी इंटरनेटचा उपयोग करुन घर बसल्या व्हेंटिलेटर तयार करण्याचे काम केले आहे. या लॉकडाऊनचा उपयोग चांगल्या कामासाठी करत … Read more

आनंदवार्ता: जिल्ह्यातील आणखी 4 रुग्ण आता कोरोनामुक्त !

अहमदनगर Live24 :-  पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडून ०४ जणांचे १४ दिवसांनंतरचे दोन्ही अहवाल निगेटिव आल्याने ते आता कोरोनामुक्त झाले आहेत. आलमगीर येथील दोघे रुग्ण तर सर्जेपुरा आणि आष्टी (जि. बीड) येथील प्रत्येकी एक रुग्णाला बूथ हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. या रुग्णांना संस्थात्मक देखरेखीखाली ठेवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली. या रुग्णासह २४ रुग्णांना … Read more

जिल्हा बॅँकेची बदनामी केली तर ….वाचा काय म्हणतात बॅँकेचे अध्यक्ष सीताराम गायकर

अकोले : अहमदनगर जिल्हा बॅँकेचा देशासह राज्यात लौकीक आहे. शेतकरी व ठेवीदारांच्या विश्वासावर आजवर बॅँकेने यशस्वी वाटचाल केली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी बॅँकेत झालेली नोकरभरती शासन व उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या अधीन राहून झाली आहे; मात्र काही लोक या भरतीविषयी गैरसमज पसरवत आहेत. बॅँकेला बदनाम करणाऱ्या अशा लोकांविरोधात न्यायालयात जाणार असल्याची माहिती बॅँकेचे अध्यक्ष सिताराम पाटील … Read more

मास्क न वापरणाऱ्यांकडून झाला ‘इतका’ दंड वसूल

अहमदनगर Live24 :- आदेश देऊनही अनेकजण मास्क न वापरता रस्त्यांवर फिरतात. त्यामुळे मनपाच्या पथकांनी नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईला गती दिली आहे. गुरूवारी दिवसभरात सुमारे साडेदहा हजारांचा दंड वसूल करण्यात आला. कारवाईसाठी आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी चार पथके नेमली आहेत. प्रभाग १ ते ४ समित्यांसाठी ही पथके आहेत. बुधवारी पथकाने कचरा संकलित करणाऱ्या वाहनचालकांना दंड ठोठावला. … Read more