संपूर्ण नगर शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न लवकरात लवकर सुटणार – महापौर बाबासाहेब वाकळे

अहमदनगर Live24 टीम, 21 जून 2021 :- अहमदनगर शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा कित्येक वर्षापासून प्रलंबित आहे कोणत्या प्रभागांमध्ये दोन दिवसानंतर तर कोणत्या प्रभागांमध्ये चार दिवसानंतर पाणी सुटते हा प्रश्न लवकरात लवकर सुटणार आहे व येणाऱ्या काळात आम्ही लाईट पाणी रस्ते व नागरी सुविधा तत्पर देणार व उपनगर असलेल्या सावेडी परिसरात वाढणारी लोकसंख्या पाहता अनेक … Read more

कोरोनाच्या टाळेबंदीनंतर जॉगींग पार्कच्या हिरवळीवर नागरिक आले एकत्र

अहमदनगर Live24 टीम, 21 जून 2021 :- भिंगार येथील भगवान गौतमबुध्द जॉगींग पार्कमध्ये हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. कोरोनाच्या टाळेबंदीनंतर जॉगींग पार्कच्या हिरवळीवर नागरिकांनी एकत्र येत योग, प्राणायाम केले. यामध्ये रमा फाऊंडेशन व मानस प्रतिष्ठानचे सदस्य देखील सहभागी झाले होते. आरोग्याप्रती जागृक राहून दररोज व्यायाम व योग करण्याचे आवाहन ग्रुपच्या … Read more

अहमदनगर शहरात पार्कींगमधून मोटारसायकल चोरली

अहमदनगर Live24 टीम, 21 जून 2021 :- सोसायटीच्या पार्कींगमध्ये लावलेली मोटारसायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना केडगाव उपनगरात घडली आहे. याबाबत सविस्तर असे की, केडगाव येथील अंबिकानगर परिसरातील आदित्य रेसिडेन्सी मध्ये राहणारे प्रसाद दिनकर खेडकर यांनी त्यांची बजाज कंपनीची दुचाकी (एमएच १६ बीए ६२७७) पार्कींगमध्ये लावली होती. मात्र अज्ञात चोरट्याने ती लंपास केली आहे. ही … Read more

पित्याने स्वतःच्याच अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर

अहमदनगर Live24 टीम, 21 जून 2021 :- नगर शहरातील एमआयडीसी परिसरात मजुरीचे काम करणाऱ्या पित्याने स्वतःच्याच अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली. पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरुन आरोपी विरोधात बलात्कारासह पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १६ जूनला रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. परप्रांतातून एमआयडीसी परिसरात कामासाठी आलेल्या व्यक्तीने राहत्या घरी स्वतःच्याच १२ … Read more

अहमदनगर शहराला लवकरच पूर्ण दाबाने पाणी !

अहमदनगर Live24 टीम, 20 जून 2021 :- अहमदनगर शहराला मुळा धरण, विळद पंपिंग स्टेशन ते वसंत टेकडी पर्यतच्या केंद्र सरकारच्या अमृत पाणी योजने कामामधील सर्व अडचणी दूर झाल्या असून शहराला लवकरच पूर्ण दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. वसंत टेकडी येथे अमृत योजनेमधून 50 लाख लीटर पाणी टाकीचे काम पूर्ण झाले असून याद्वारे नगर शहराला पूर्ण दाबाने … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात इतक्या नव्या रुग्णांची भर !

अहमदनगर Live24 टीम, 20 जून 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ५९५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ६७ हजार ४५७ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.८८ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ५९४ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

खा.राहुल गांधींचा वाढदिवस संकल्प दिन कार्यक्रमाने उत्साहात साजरा

अहमदनगर Live24 टीम, 20 जून 2021 :- कोरोनाच्या दोन्ही लाटांमध्ये असंख्य कोरोना योद्ध्यांनी नगर शहरातील कोरोनाग्रस्तांची सेवा केली. त्यांच्या खांद्याला खांदा लावून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सामाजिक जबाबदारीतून रुग्णांना बेड उपलब्ध करून देणे, वेंटिलेटर मिळवून देणे, प्लाजमा मिळवून देणे, जेवण पुरविणे, गरजूंना किराणा किट उपलब्ध करून देणे आदी केलेली जनसेवा ही मन भारावून टाकणारी असल्याचे प्रतिपादन शहर … Read more

अहमदनगर शहरात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 20 जून 2021 :-एमआयडीसीतील दांगट मळ्यात १७ ते १८ जून दरम्यान घरफोडीची घटना घडली. नवीनकुमार पांडे यांच्या घरी ही चोरी झाली. श्री.पांडे यांच्या घरातील २२ हजार रुपयांचा ऐवज चोरीस गेला. पांडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार एमआयडीसी पोलिस ठाण्यात विकास अण्णा कुऱ्हाडे (रा.गांधीनगर, बोल्हेगाव), गणेश भगवान कुऱ्हाडे व आकाश डाके या तिघांविरुद्ध गुन्ह्याची नोंद … Read more

काळ्या बाजारात जाणारा स्वस्त धान्याचा साठा जप्त ! तब्बल ४२ लाखांचा मुद्देमाल जप्त

अहमदनगर Live24 टीम, 20 जून 2021 :- काळ्याबाजारात विक्रीसाठी आणलेला रेशनिंगच्या तांदूळ व गव्हाचा मोठा साठा कोतवाली पोलिसांनी जप्त केला आहे. शहरातील मार्केट यार्ड तसेच केंडगाव इंडस्ट्रीज इस्टेट अशा दोन ठिकाणी संबंधित व्यापाऱ्याच्या दुकान व गोदामवर शनिवारी दुपारी छापा टाकून ही कारवाई करण्यात आली. कारवाईत धान्य व सहा वाहने मिळून सुमारे ४२ लाखांचा मुद्देमाल हस्तगत … Read more

अडचणीत सापडलेल्या विभागनियंत्रकांनी तक्रारदाराची केली तक्रार

अहमदनगर Live24 टीम, 20 जून 2021 :- नगरमध्ये एसटी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांत झालेल्या अनियमिततेची चौकशी करण्यासाठी एसटीच्या वरिष्ठ सुरक्षा व दक्षता अधिकाऱ्यांनी नगरमध्ये येत नगरचे एसटीचे विभाग नियंत्रक विजय गिते यांची चौकशी केली. याचा राग धरून गिते यांनी सामाजिक कार्यकर्ते अमोल घोलप यांची तक्रार माहिती आयुक्तांकडे केली आहे. सामाजिक कार्यकर्ते अमोल घोलप यांनी तक्रारीत म्हटले आहे … Read more

पैशासाठी विद्यार्थ्यांचा छळ सुरु; ऑनलाईन शाळेसाठी ऑनलाईन पैसे भरा

अहमदनगर Live24 टीम, 20 जून 2021 :- कोरोनाची स्थिती असली तरीही शाळांकडून फीची मागणी केली जात आहे. ऑनलाईन शाळा सुरू झाल्याने सर्व शाळांनी ऑनलाईनच प्रवेश सुरू केले. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी ऑनलाईन फी भरावी यासाठीही तगादाही लावला जात आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भावाने शैक्षणिक व्यवस्थेवर मोठा परिणाम केला. एवढे सगळे सुरु असतानाही शाळा व महाविद्यालयांनी विद्यार्थी व पालकांकडून … Read more

जिल्हा परिषदेत गर्दी करणाऱ्यांवर होणार कारवाईची संक्रांत

अहमदनगर Live24 टीम, 19 जून 2021 :- जिल्ह्यातील कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याचे दिसताच अनलॉक करण्यात आले आहे. यामध्ये शासगीसह शासकीय कार्यालये 100 टक्के उपस्थित सुरु करण्यास परवानगी दिली आहे. मात्र कोरोनाचा धोका कायम असतानाही नागरिकांकडून शासकीय कार्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी केले जात असल्याचे दिसून आले आहे. यातच आता अशा गर्दी करण्यास कारणीभूत ठरणाऱ्यांवर कारवाई केली … Read more

जिल्ह्यात राबविले जाणार एक व्यक्ती एक झाड अभियान

अहमदनगर Live24 टीम, 19 जून 2021 :-जिल्हा प्रशासनाने पर्यावरण संवर्धनासाठी आता आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. येत्या वटपौर्णिमेपासून (ता. २४) जिल्ह्यात ‘एक व्यक्ती-एक झाड’ अभियान राबविले जाणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्याचे ठरविले आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचे मार्गदर्शन आणि सक्रीय सहभाग याबरोबरच स्वयंसेवी संस्था, विविध पदाधिकारी यांच्यासह लोकसहभाग … Read more

स्टेशन रोडवरील पथदिव्यांसाठी धरणे आंदोलन करुन शिव राष्ट्र सेनेच्यावतीने कंदिल भेट

अहमदनगर Live24 टीम, 19 जून 2021 :- स्टेशन रोड परिसरातील रविश कॉलनी ते रेल्वे स्टेशन परिसरात लाईट नसल्याने या परिसरात अंधाराचे सामराज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे या भागात प्रवाशांना लुटण्याचा प्रकार वाढत आहे. चोर्‍यांचे प्रमाण वाढले आहे, छोट-मोठे वाहनांचे अपघात होता याबाबत मनपा आयुक्त मा श्री शंकर गोरे साहेब यांना शिव राष्ट्र सेना पक्षाच्यावतीने तीन … Read more

राज्यमंत्री तनपुरे यांच्यासह मनपा आयुक्तांना खंडपीठाची नोटीस

अहमदनगर Live24 टीम, 19 जून 2021 :- राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधीलनगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना नगर महापालिकेच्या नगररचना विभागातीलअभियंते कल्याण बल्लाळ यांना पाठीशी घालणे भोवण्याची चिन्हे आहेत. याअभियंत्यावरील कार्यवाहीला नगरविकास राज्यमंत्री म्हणून तनपुरेंनी दिलेल्या स्थगितीलायेथील सामाजिक कार्यकर्ते शाकीरभाई शेख यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबादखंडपीठात आव्हान दिले आहे. न्यायालयाने या प्रकरणी राज्यमंत्री तनपुरेंसह प्रधानसचिव, मनपा आयुक्त … Read more

अहमदनगरची कन्या, प्रथम बॉलिवूड अभिनेत्री अर्शिन मेहता झळकली वेब सीरिज मध्ये

अहमदनगर Live24 टीम, 19 जून 2021 :- अहमदनगरचे नाव बॉलिवूड क्षेत्रात घेऊन जाणारी अर्शिन मेहता ही बॉलिवूड मध्ये अभिनेत्री म्हणून आपले स्थान मिळवणारी एकमेव अहमदनगर शहरातील अभिनेत्री आहे. द रॅली, सल्लु की शादी असे हिट बॉलिवूड चित्रपट तिने दिले आहेत. आपल्या उत्कृष्ठ अभिनयाच्या जोरावर तिने आपली स्वतंत्र ओळखच या क्षेत्रात बनविलेली आहे. यामुळे तिला वेब … Read more

एकीकडे पाणी टंचाई तर दुसरीकडे रस्त्यावर वाहतेय लाखोलिटर पाणी

अहमदनगर Live24 टीम, 19 जून 2021 :- नगर शहरात काही दिवस झाले कि व्हॉल्व दुरुस्ती, पाईपलाईन दुरुस्तीच्या नावाखाली शहरातील नागरिकांना पाणीकपात केली जात असते. आजही शहरातील अनेक ठिकाणी पाण्याचे हाल असलेले दिसून येत आहे. एकीकडे शहरात हि परिस्थिती सुरु असताना मात्र दुसरीकडे लाखो लिटर पाणी रस्त्यावर वाहत असल्याचा अनुभव नगरकरांना आला. महापालिकेच्या वसंत टेकडी येथे … Read more

खाकीचा धाकच उरला नसल्याने शहरात गुन्हेगारीचा सुळसुळाट

अहमदनगर Live24 टीम, 18 जून 2021 :- नगर जिल्ह्यासह शहरात अवैध धंद्यांचा सुळसुळाट झाला आहे. या अवैध धंद्यामुळे गुन्हेगारीत वाढ झाली असून शहराची कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली आहे. निर्बंध शिथील होताच अवैध धंद्यांत वाढ झाली आहे. यामध्ये दारू, मटका, जुगार, गुटखा, बिंगोचे धंदे जोरात सुरू झाले आहे. लोकांनी घराबाहेर पडण्यास सुरूवात केली आहे. यामुळे … Read more