पद्मश्री पवार व आमदार जगताप यांच्या हस्ते विधाते यांचा सत्कार

अहमदनगर Live24 टीम, 25 जानेवारी 2021 :- राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते परदेश दौर्‍यावर निघाले असता त्यांचा आदर्श गाव संकल्प व कार्य समितीचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार व आमदार अरुणकाका जगताप यांनी सत्कार करुन शुभेच्छा दिल्या. यावेळी राष्ट्रवादी ओबीसी सेलचे अमित खामकर, गणेश गोंडाळ, राजेश भंडारी आदी उपस्थित होते. प्रा. माणिक विधाते युएसएला … Read more

जिल्ह्यात ४५ हजार ३३४ मतदारांची नव्याने नोंद

अहमदनगर Live24 टीम, 25 जानेवारी 2021 :- जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या आहेत. दरम्यान प्रशासनातर्फे २५ जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिवस साजरा केला जातो. या अनुषंगाने १७ नोव्हेंबरपासून विशेष संक्षिप्त पुन:रिक्षण कार्यक्रम राबविण्यात आला होता. १ जानेवारी २०२१ रोजी ज्यांचे वय १८ वर्षे पूर्ण झाले आहे, अशांचे मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी हा कार्यक्रम जाहीर … Read more

जर कामात आडकाठी आणली तर पोलिस संरक्षणात काम करणार खा. सुजय विखे यांचा इशारा

अहमदनगर Live24 टीम, 25 जानेवारी 2021 :-नगर शहराला मुळाधरणावरून पाणीपुरवठा करणारी योजनेला सुमारे ४५ वर्षे झाली असल्यामुळे या योजनेला अनेक ठिकाणी पाणी गळती होत आहे. त्याचबरोबर नगर शहराचा विस्तार झपाट्याने वाढत असून मोठी लोकसंख्याही वाढली आहे. त्यामुळे शहराला पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. यासाठी केंद्र सरकारच्यावतीने शहरातील अंतर्गत पाईपलाईन टाकण्यासाठी फेज २ पाणी योजनेचा निधी उपलब्ध … Read more

मृत पावलेल्या पाच कोंबड्या तपासणीसाठी पुण्याला पाठविल्या

अहमदनगर Live24 टीम, 24 जानेवारी 2021 :-नगर तालुक्यातील चिचोंडीमधील बर्ड फ्ल्यूचा अहवाल पॉझिटिव्ह असणार्‍या भागातील ४८४ लहान कोंबड्या, १५४ मोठ्या कोंबड्या, ४५१ अंडी आणि १५० खाद्याची विल्हेवाट लावण्यात आली आहे. दरम्यान नुकतेच राहुरी तालुक्यातील सडे गावात शनिवारी पाच कोंबड्या मृत पावल्या आहेत. पशुसंवर्धन विभागाने या मृत कोंबड्यांचे नमुने घेऊन तातडीने पुण्याच्या प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठविले … Read more

जागेचे आमिष दाखवत नऊ लाखांना गंडा घातला

अहमदनगर Live24 टीम, 24 जानेवारी 2021 :-नगर शहरातील झोपडी कँटीन जवळील परिसरात असलेले सेंट मोनिका डी. एड. कॉलेजच्या जागेवर प्लॉट देतो असे सांगत एकाची 9 लाखाची फसवणूक करण्यात आली असल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात दोघांविरूद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, या फसवणूक प्रकरणी बाळू भास्कर पंडीत … Read more

जिल्हा बँक निवडणूक: नगरमध्ये खलबते २७ जानेवारीला मुंबईत शरद पवार घेणार बैठक

अहमदनगर Live24 टीम, 24 जानेवारी 2021 :-राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष जेष्ठनेते शरद पवार रविवारी नगरमध्ये आल्यावर आ.अरुण जगताप व आ.संग्राम जगताप यांच्या निवासस्थानी ते भोजनासाठी थांबले होते. यावेळी त्यांनी जिल्हा बँक  निवडणुकीविषयी माहिती घेतली. यावर चचार् करुन त्यांनी २७ जानेवारीला मुंबईत बैठक घेऊन रणनीति ठरवू, असे सांगितले. लॉकडाऊन नंतरच्या मोठ्या कालावधीने खा.शरद पवार नगरमध्ये आल्याने आमदार … Read more

दोन दिवसात वाहतूक शाखेने वसूल केला दोन लाखाहून अधिकचा दंड

अहमदनगर Live24 टीम, 24 जानेवारी 2021 :-विशेष मोहिम अंतर्गत दोन दिवसांमध्ये 785 वाहन चालकांविरूद्ध कारवाई करून नगर शहर वाहतूक शाखेने तब्बल दोन लाख 26 हजार 300 रूपये दंड वसूल केला आहे. दरम्यान बेशिस्त वाहन चालकांना वाहतुकीच्या नियमांचे महत्व समजावे यासाठी शहर वाहतूक शाखेकडून नेहमी दंडात्मक कारवाई केली जात असते. नुकतेच 32 वे रस्ता सुरक्षा अभियान … Read more

अहमनदनगर शहरातील सुरभि हॉस्पिटलच्या विस्तारित इमारतीचा लोकार्पण सोहळा संपन्न !

अहमदनगर Live24 टीम, 24 जानेवारी 2021 :-डॉक्टर्स आणि रुग्ण यांच्यात विश्वासाचे नाते आवश्यक आहे आणि हा विश्वास निर्माण करण्याची जबाबदारी डॉक्टरांवर असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी केले. अत्याधुनिक साधने आणि कुशल डॉक्टर्सने सुसज्ज विभागामुळे चांगली सेवा मिळत असल्याचेही ते म्हणाले. अहमनदनगर शहरातील सुरभि हॉस्पिटलच्या विस्तारित इमारतीचा लोकार्पण सोहळा आणि अॅपल हॉस्पिटलचे उद्घाटन … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : आज वाढले इतके रुग्ण वाचा चोवीस तासांतील अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 24 जानेवारी 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात आज ८५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६९ हजार ५६० इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.२० टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शनिवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १०९ ने वाढ … Read more

केडगावात भटक्या कुत्र्यांचा उच्छाद या कुत्र्यांनी केले असे काही …!

अहमदनगर Live24 टीम, 24 जानेवारी 2021 :-एकीकडे जिल्ह्यातील ग्रामीण भागात बिबट्याने धुमाकूळ घातला असून दुसरीकडे शहरात मात्र भटक्या कुत्र्यांनी धुमाकूळ घातला आहे. केडगाव देवी परिसरामध्ये भटक्या कुत्र्यांनी पहाटे पाच शेळ्यांचा फडशा पाडला. परिसरातील नागरिकांना प्राथमिक बिबट्या असल्याचेच वाटले परंतु या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये पाहिल्यानंतर हा हल्ला भटक्या कुत्र्यांनी केल्याचे समजले. या घटनेची माहिती मिळातयानंतर … Read more

दोन मोटारसायकलींच्या अपघातात एकाचा मृत्यू !

अहमदनगर Live24 टीम, 24 जानेवारी 2021 :- नगर-मनमाड राज्यमार्गावर जुन्या बसस्थानकाजवळ दोन मोटारसायकलींच्या समोरासमोर झालेल्या अपघातात नानासाहेब नारायण गाडे (वय ३८, बारागावनांदूर) हा दुचाकीस्वार जागीच ठार झाला, तर प्रशांत गोरखनाथ चोपडे, राहुरी खुर्द हा गंभीर जखमी झाला. त्याला पुढील उपचारासाठी नगरला हलवण्यात आले आहे. आज संध्याकाळी पाच वाजता नगर-मनमाड राज्यमार्गावर जुन्या बसस्थानकातील चौकात हा अपघात … Read more

पत्रकार नंदकुमार सोनार यांचे निधन

अहमदनगर Live24 टीम, 24 जानेवारी 2021 :-अहमदनगर जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार सोनार यांचे आज सकाळी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे. आज दुपारी साडेबारा वाजता नगरमधील नालेगाव अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. विविध वृत्तपत्रांतून काम करताना त्यांनी जिल्ह्याचे प्रश्न सातत्याने मांडले. स्वत:चे वृत्तपत्रही चालविले. सर्वच क्षेत्रात त्यांचा मोठा जनसंपर्क होता. जिल्हा पत्रकार संघाच्या माध्यमातून पत्रकारांसाठीही … Read more

सामाजिक आणि आर्थिक प्रश्नांवर तरुणाईने संघर्ष करावा – अण्णा हजारे.

अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2021 :- आर्थिक सुरक्षा आणि स्वातंत्र्यासाठी मागील 2 महिन्यांपासून देशातील शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. दुसरीकडे करोनाच्या लॉकडाउन कालखंडात देशातील बालविवाह-मुली आणि स्त्रियांवरील अत्याचार , तरुणांची बेरोजगारी व्यसनाधीनतेसह त्यांचे मानसिक आरोग्याचे वाढलेले जटील प्रश्न, यामुळे देशातील असंतोष शिगेस पोहोचला आहे, असे मत ज्येष्ठ गांधीवादी अण्णा हजारे यांनी आज व्यक्त केले.या परिस्थितीला … Read more

अहमदनगरच्या सांस्कृतिक क्षेत्राच्या विकासासाठी सरसावलेली राजकीय इच्छाशक्ती राज्यातील आदर्श

अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2021 :- अहमदनगर- नाट्य सांस्कृतिक क्षेत्राच्या विकासासाठी हक्काचे नाट्यगृह तयार होत आहे आणि यासाठी नाट्य कलाकारांबरोबरच राजकीय क्षेत्रातील नेतृत्व सकारात्मक प्रयत्न करतात ही राज्यातील आदर्श घटना असून सर्वांच्या इच्छाशक्तीमुळे अहमदनगर शहरात महानगरपालिकेचे हक्काचे अद्यावत असे नाट्यगृह लवकरच तयार होणार आहे. असे प्रतिपादन जेष्ठ आणि लोकप्रिय नाट्य-सिने अभिनेते श्री.प्रशांत दामले यांनी … Read more

अहमदनगर’ चं अंबिकानगर नामकरण करा; शिवसेनेची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2021 :-अहमदनगर जिल्ह्याचे नाव ‘अंबिकानगर’ करण्यात यावे अशी मागणी शिवसेना दक्षिण जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. मंत्री शिंदे यांना दिलेल्या निवेदनात गाडे यांनी म्हटले आहे की,अहमदनगर जिल्हा व शहराचे नाव अंबिकानगर व्हावेत अशी स्वर्गीय हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा होती. सभेत … Read more

सोमवारी जिल्ह्यातील सर्व १४ पंचायत समित्या समोर संगणकपरिचालक करणार निषेध आंदोलन!

अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2021 :-ग्रामविकास विभागा अंतर्गत आपले सरकार प्रकल्पाच्या माध्यमातून ग्रामपंचायत,पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावर संगणकपरिचालक कार्यरत असून १० वर्ष प्रामाणिक काम केलेल्या संगणकपरिचालकांना महाराष्ट्र आय टी महामंडळाकडून नियुक्ती देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य संगणकपरिचालक संघटना तसेच राज्यातील अनेक लोकप्रतिनिधी नी केलेली असताना संगणकपरिचालकांना कर्मचारी दर्जा व किमान वेतन देण्याच्या मागणीला बगल … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात इतक्या नव्या रुग्णांची भर !

अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात आज ९० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६९ हजार ४७५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.२३ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शुक्रवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ११७ ने वाढ … Read more

जमिनीच्या वादातून तलवारीने वार

अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2021 :- नगर तालुक्यात घोसपुरी येथे राहणारे शेतकरी विठोबा जयसिंग भोसले, वय ४१ यांना साडेसातच्या सुमारास पाच आरोपींनी मेंढपाळ व शेतीच्या वादातून तलवाऱीने वार करुन गुप्तीने भोसकून गज डोक्यात मारुन दगड मारून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. या मारहाणीत विठोबा जयसिंग भोसले हे गंभीर जखमी झाले असुन त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून … Read more