अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : चोविस तासांत वाढले फक्त इतकेच रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 3 जानेवारी 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात आज ७५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६७ हजार ३०१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.०१ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शनिवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ८८ ने वाढ … Read more

मातृ-पितृछत्र हरलेल्या दिपकला फुंदे दाम्पत्यांचा आधार

अहमदनगर Live24 टीम, 3 जानेवारी 2021 :-काही दिवसापुर्वी एक फोन आला अन दिपक ची माहिती मिळाली,त्याच्यासह आम्हालाही भेटीची ओढ लागली…दिपक घरी आला. बीड जिल्ह्यातील दुष्काळी गावातला दिपक बारावीत असतांना दोन वर्षापुर्वी वडीलांच निधन झाल, घरातील कमवती व्यक्ती गेली. वडील कुठे गेले हे न समजणारी चिमुकली बहीणच्या संगोपनासह डोंगराएवढ्या दुःखातून सावरत असतांना एका जीवघेण्या असाध्य आजाराने … Read more

स्वातंत्र्य आणि समानता निर्माण करण्यास सावित्रीबाईंचेही योगदान

अहमदनगर Live24 टीम, 3 जानेवारी 2021 :- स्वातंत्र्य आणि समानता निर्माण करण्यास सावित्रीबाई फुलेंचेही योगदान आहे. महात्मा ज्योतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या विचारधारेतून देशाला स्वातंत्र्य आणि आजचा आधुनिक समाज निर्माण झाला. समाजात एकजूट आणि समानता कायम ठेवण्यासाठी फुले दांम्पत्यांची विचारधारा आणि चरित्र आजच्या नव्या पिढीला प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन प्रा. स्वाती सुडके-चौधरी यांनी केले. … Read more

डॉ.संकेत पुरोहित यांचा रुग्णांकडून उस्फुर्त सन्मान.

अहमदनगर Live24 टीम, 3 जानेवारी 2021 :- सामान्य गरीब रुग्णांना अल्प दरात सेवा देण्याची आचार्य श्री आनंदऋषजी यांनी संकल्पना मांडली. आदर्शऋषी आणि सहकार्‍यांनी ती प्रत्यक्षात आणली. संतोष बोथरा व सर्व सहकारी मित्रांनी ती पूर्णत्वास नेली. मात्र डॉ. आशिष भंडारी, डॉ. गोविंद कासट आणि सेवाभावी डॉक्टरांनी निस्पृह सेवेचा कळस चढवून आनंदऋषी डायलिसिस विभाग आज देशात अग्रेसर … Read more

खासदार लोखंडे यांच्या अहमदनगरच्या नामांतर मागणीस पाठिंबा

अहमदनगर Live24 टीम, 3 जानेवारी 2021 :- अहमदनगरचे नामांतर अंबिकानगर करावे या खासदार सदाशिव लोखंडे यांच्या मागणीस दीनदयाळ परिवाराने पाठिंबा दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना ई-मेल द्वारे निवेदन पाठवून अहमदनगरचे नामांतर अंबिकानगर करण्याची मागणी केली आहे, अशी माहिती दीनदयाळ परिवाराचे संस्थापक वसंत लोढा यांनी दिली. … Read more

‘त्या’ चोराकडे सापडल्या इतक्या मोटरसायकली

अहमदनगर Live24 टीम, 3 जानेवारी 2021 :- शहरातून मोटारसायकल चोरी करणार्‍या एकाला तोफखाना पोलिसांनी अटक केली आहे. गणेश देवीदास नल्ला असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून चोरी केलेल्या तीन मोटारसायकल पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. चोरीला गेलेल्या मोटारसायकलचा शोध तोफखाना पोलीस घेत असताना, शहरातील सोळातोटी कारंजा परिसरात तेथे एक जण विना नंबरच्या मोटारसायकलवरून संशयितरित्या फिरताना … Read more

मनपाच्या परवानगीविना घरे – दुकान उभारणाऱ्या टॅक्स चोरांवर कारवाई होणार

अहमदनगर Live24 टीम, 3 जानेवारी 2021 :-रस्त्याकडेला अथवा मार्केटमध्ये पत्र्याचे शेड ठोकून दुकानदारी करणार्‍या टॅक्सचोरांचा शोध महापालिकेने सुरू केला आहे. तसेच शहरात दोन लाखांवर घरे असले तरी त्यातील केवळ लाखभर घरांचीच महापालिकेकडे नोंद आहे. अर्थात त्यांच्याकडूनच महापालिका टॅक्स वसुली करते. मात्र, महापालिकेची परवानी न घेता अनेकांनी घरे/दुकाने सुरू केली आहेत. तसेच मोहिमेच्या पहिल्या आठवड्यातच तब्बल … Read more

नगर तालुक्यातील ही ग्रामपंचायत तब्बल सातव्यांदा बिनविरोध

अहमदनगर Live24 टीम, 3 जानेवारी 2021 :- केंद्र व राज्य शासन विविध विकास योजनांचा निधी थेट ग्रामपंचायतींना उपलब्ध करुन देत असल्याने गावच्या विकासात ग्रामपंचायतीची भूमिका महत्वाची आहे. काळानुसार राजकारण बदलत आहे. निवडणुकांमध्ये चुरस वाढत आहे. मात्र नगर तालुक्यातील वारूळवाडी ग्रामपंचायतीची निवडणुक सातव्यांदा बिनविरोध झाली असून गावकऱ्यांनी गेल्या  तीस वर्षांची परंपरा कायम राखली आहे. याचा गावच्या … Read more

मनपा हद्दीतील राष्ट्रीय महामार्गांसह शहरातील रस्त्यांची कामे तातडीने व्हावीत

अहमदनगर Live24 टीम, 2 जानेवारी 2021 :- मनपा हद्दीतील राष्ट्रीय महामार्गावरील अंतर्गत असलेले आयुर्वेद-अमरधाम रस्ता, आरटीओ ऑफिस येथील रस्ता तसेच शहरातील कलेक्टर कचेरीसह शहरातील विविध भागातील रस्त्यांची मोठी दुर्दशा झाली आहे. हे रस्ते तातडीने दुरुस्त करावेत, अन्यथा शिवराष्ट्र सेनेच्यावतीने उपोषण करण्यात येईल, अशा आशयाचे निवेदन मनपा उपायुक्त श्री.पठारे यांना देण्यात आले. याप्रसंगी पक्षाध्यक्ष संतोष नवसुपे, … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : वर्षाच्या दुसर्या दिवशीही कोरोना रुग्णसंख्येत घट कायम, आज वाढले ‘फक्त’ इतकेच रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 2 जानेवारी 2021 :-जिल्ह्यात आज १७० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६७ हजार २२६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.०३ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शुक्रवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ९९ ने वाढ झाल्याने … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : तर खासदार सुजय विखेंसह ते सर्व जण देणार राजीनामा !

अहमदनगर Live24 टीम, 2 जानेवारी 2021 :-नैसर्गिक आपत्ती वगळता पुढील ७२ तासात डॉ.तनपुरे कारखाना सुरळित न चालल्यास मी व माझे सर्व संचालक मंडळ राजीनामा देण्याचा निर्णय घेऊ असा इशारा खासदार सुजय विखे पाटील यांनी दिला आहे. डॉ.तनपुरे कारखाना कार्यस्थळावर आज सकाळी अधिकारी व कर्मचारी यांची बैठक पार पडली प्रसंगी डॉ.विखे बोलत होते. पुढे बोलताना डॉ.सुजय … Read more

सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त शहर जिल्हा काँग्रेसच्यावतीने “क्रांतिज्योती महिला सन्मान” सोहळ्याचे रविवारी आयोजन

अहमदनगर Live24 टीम, 2 जानेवारी 2021 :-स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये महिला शिक्षणासाठी अमुलाग्र काम केलेल्या सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने “क्रांतिज्योती महिला सन्मान सोहळ्याचे” रविवार दि. ३ जानेवारीला आयोजन करण्यात आले असल्याची माहिती, पक्षाच्या वतीने देण्यात आली आहे. या सोहळ्यामध्ये नगर शहरातील शिक्षण क्षेत्रामध्ये भरीव योगदान दिलेल्या महिलांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे. … Read more

दलित महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने.

अहमदनगर Live24 टीम, 2 जानेवारी 2021 :-मातंग समाजाला स्वतंत्र सात टक्के आरक्षण द्यावे व अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था सुरू करण्यात यावे अशी मागणी दलित महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे निदर्शनं करून करण्यात आली यावेळी दलित महासंघाचे महाराष्ट्र अध्यक्ष काशिनाथ सुलाखे पाटील समवेत जिल्हा अध्यक्ष संजय चांदणे, कडूबाबा लोंढे, जिल्हा उपाध्यक्ष सलीम सय्यद, नागेश … Read more

कास्ट्राईबची ऑनलाईन सेवा शासकीय, निमशासकीय कर्मचार्‍यांसाठी दुवा ठरणार

अहमदनगर Live24 टीम, 2 जानेवारी 2021 :-शासकीय, निमशासकीय कर्मचार्‍यांच्या न्याय हक्कासाठी कास्ट्राईब संघटना सतत प्रयत्नशील आहे. संघटनेच्या माध्यमातून कर्मचार्‍यांचे अनेक न्याय हक्काच्या मागण्या सोडविण्यात आल्या आहेत. शासन स्तरावरील प्रश्‍न सोडविण्यासाठी संघटनेचा पाठपुरावा सुरु आहे. ही ऑनलाईन सेवा सर्व कर्मचार्‍यांसाठी दुवा ठरणार असून, सर्व कर्मचारी व विभाग एकमेकाशी जोडले गेले असून, असंघटित कामगारांना देखील एकत्रित आनण्याचे … Read more

शब्दगंधची दिनदर्शिका साहित्यिकांना मार्गदर्शक ठरेल. :- ॲड. कॉ. सुभाष लांडे पाटील.

अहमदनगर Live24 टीम, 2 जानेवारी 2021 :-नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी दिनदर्शिकेचे प्रकाशन करून शब्दगंध प्रकाशनाने नवीन वर्षाची चांगली सुरुवात केली आहे. ही दिनदर्शिका साहित्यिकांना मार्गदर्शक ठरेल असे प्रतिपादन ॲड. कॉ. सुभाष लांडे पाटील यांनी केले. शब्दगंध साहित्यिक परिषद व शब्दगंध प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने येथील कोहिनुर मंगल कार्यालायात आयोजित करण्यात आलेल्या दिनदर्शिका प्रकाशन समारंभात ते … Read more

निवडणुकीच्या कामातून महिला, दिव्यांगांना सूट मिळावी; तहसीलदारांना दिले निवदेन

अहमदनगर Live24 टीम, 2 जानेवारी 2021 :-राज्यासह जिल्ह्यात निवडणुकीचा धुराळा उडाला आहे. दिग्गज पुढाऱ्यांसह कार्यकर्ते देखील निवडणुकीच्या कामात मग्न झाले आहे. यातच निवडणूक म्हंटले कि सरकारी कार्यालयांमधील कर्मचाऱ्यांची नियुक्ती निवडणूक कामांमध्ये केली जाते. मात्र राहाता तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या कामातून महिला, दिव्यांग आणि बीएलओ असलेल्या शिक्षकांना सूट मिळावी. यासाठी नुकतेच राहाता तालुका प्राथमिक शिक्षक परिषदेने तहसीलदार … Read more

कोट्यवधींचा अपहार करणाऱ्या डॉ.निलेश शेळकेच्या पोलिस कोठडीत वाढ

अहमदनगर Live24 टीम, 2 जानेवारी 2021 :-बँक कर्ज फसवणूक प्रकरणात अटकेत असलेल्या डॉ. निलेश शेळके याच्या पोलीस कोठडीत आज पुन्हा वाढ झाली आहे. याआधी 2 जानेवारीपर्यंत त्याला पोलिस कोठडी दिली होती.त्याची मुदत संपल्यानंतर त्याला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी त्याच्या पोलिस कोठडीत आणखी पाच दिवसांची वाढ करण्यात आली आहे. दरम्यान स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या … Read more

दुःखद बातमी : अहमदनगरचे प्रथम माजी उपमहापौर यांचं निधन’

अहमदनगर Live24 टीम, 2 जानेवारी 2021 :- अहमदनगर शहराचे प्रथम माजी उपमहापौर ज्ञानेश्वर खांडरे यांचं ह्रदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं. ते ५५ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन भाऊ, बहिणी, सून, नातवंडे असा परिवार आहे. स्व. खांडरे हे स्व. गोपीनाथ मुंडे, माजी मंत्री पंकजा मुंडे यांचे निकटवर्तीय मानले जात होते. अहमदनगरचे विधिज्ञ अॅड. बाळासाहेब … Read more