अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील कोट्यावधी रुपयांचे मंजूर कामे महायुती सरकारने स्थगित केली;आ. शंकरराव गडाख यांचा आरोप

ahmadnagar news : नुकताच प्रवरासंगम येथे महाविकास आघाडीच्या माध्यमातून निर्धार मेळावा पार पडला व या मेळाव्याला बेलपिंपळगाव गटातील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित लावलेली होती. या मेळाव्याला आमदार शंकरराव गडाख यांनी मार्गदर्शन केले व या मेळाव्याच्या प्रसंगी बोलताना त्यांनी अनेक मुद्द्यांना हात घातला. यावेळी बोलताना त्यांनी महायुती सरकारवर आरोप केला की कोट्यावधी रुपयांच्या कामांना तालुक्यात मंजुरी … Read more

नेवासा तालुक्यातील पाचेगाव येथे विहिरीत आढळला शेतकऱ्याचा दोन्ही हात पाय बांधल्याच्या स्थितीत मृतदेह; घातपात की आत्महत्या?

newasa news

सध्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात आत्महत्यांचे आणि घातपाताच्या संख्येमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत असून अशाच प्रकारची एक धक्कादायक घटना अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील पाचेगाव येथून समोर आलेली आहे. नेवासा तालुक्यातील पाचेगाव येथे शनिवारी म्हणजेच 21 सप्टेंबर रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास एका शेतकऱ्याचा मृतदेह तब्बल 80 फूट खोल विहिरीत हातपाय दोरीने बांधलेल्या स्थितीत आला … Read more

विरोधकांच्या खोडा घालण्याच्या प्रवृत्तीमुळे संधी मिळूनही तालुक्याचा विकास साधता न आल्याची खंत – आमदार गडाख !

shankar gadakh

राजकारण करताना विरोधकांनी तालुक्याच्या हिताला प्राधान्य देऊन विकासकामांना खोडा घालण्याचा उद्योग थांबवावे, असे आवाहन आमदार शंकरराव गडाख यांनी केले. नेवासे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव उपआवारातील १६ कोटी रुपये खर्चाच्या काँक्रीटीकरणचा शुभारंभ बुधवारी करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार पांडुरंग अभंग होते. प्रास्ताविक बाजार समितीचे सभापती नंदकुमार पाटील यांनी केले. सचिव … Read more

“रघु विठ्ठल तनपुरे” झळकणार रूपेरी पडद्यावर ! कलाकारांनी शनिशिंगणापूर येथे शनिदेवाचे घेतले दर्शन

सुदर्शन फिल्म एंटरटेनेंट प्रस्तुत रघु 350 हा मराठी चित्रपट शुक्रवार दी.6 सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे या निमित्ताने चित्रपटातील सर्व कलाकारांनी शनिशिंगणापूर येथे शनिदेवाचे दर्शन घेतले आहे अशी माहिती दिग्दर्शक आशिष मडके यांनी राहुरी येथे गौरव तनपुरे यांच्या समवेत चर्चा करत असताना दिली. एका साधारण घरातील युवक एका बलाढ्य अशा शक्तीला राजकारणातील बारकावे … Read more

नेवाशाच्या विकासासाठी आम्ही आ. गडाखांबरोबर, म्हणत बेलपिंपळगाव परिसरातील विरोधी कार्यकर्त्यांचा गडाख गटात प्रवेश !

shankar gadakh

नेवाशाच्या विकासासाठी आम्ही माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख यांच्या बरोबर काम करणार, असे म्हणत नेवासा तालुक्यातील बेलपिंपळगाव परिसरातील अनेक विरोधी कार्यकर्त्यांनी नुकताच आमदार गडाख गटात प्रवेश केला. गेल्या दोन वर्षांपासून भाजपचे अनेक नेते, विद्यमान जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्यांसह जिल्हा व तालुका भाजपचे पधाधिकारी गडाख गटात आल्याने भाजपचे स्थानिक नेतृत्व अडचणीत आले आहे. त्यात … Read more

शासनाने अग्निशामक सेवा केंद्र उभारणीला मंजुरी देण्यास दिरंगाई केली नसती तर, नेवाश्यातील आगीची घटना टळली असती !

nevasa aag

येथील बाजारपेठेतील १४ दुकानांची आगीच्या घटनेत राख रांगोळी होऊन १४ संसार उघड्यावर पडल्यानंतर अग्निशमन बंबाचा प्रश्न ऐराणीवर आला आहे. नेवासा नगरपंचायतीने अग्निशामक सेवा केंद्र व अग्निशमन बंबासाठी १ कोटी ९० लाखांचा प्रस्ताव २ ते ३ वर्षापासून शासन दरबारी दाखल केला आहे. परंतु विकासकामे व सरकारच्या योजेनेसाठी नेवासा तालुक्याला राजकीय सूडबुद्धीतून निधी मिळत नसल्याचा आरोप केले … Read more

मुळा धरणाचा पाणीसाठा ५० टक्क्यांवर, राहुरी, नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण !

mula dharan

अखेर मुळा धरणाचा पाणीसाठा ५० टक्क्यांवर पोहचल्याने राहुरी, नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे. सायंकाळी ६ वाजता कोतूळ येथील पाण्याची आवक मंदावली असली तरी मुळा धरणात १२ हजार ९८० दशलक्ष घनफुट झाला असून धरण ५० टक्के झाले आहे. मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात बुधवारी रात्री झालेल्या प्रचंड प्रमाणात तुफानी पर्जन्यवृष्टी झाल्याने धरणाचा पाणीसाठा वेगाने वाढला. … Read more

मागील वर्षीच्या खरीप हंगामातील पीकविम्याचा परतावा न मिळाल्याने शेतकरी वर्गात संतापाची लाट !

एक रूपयात पीकविमा

शासनाने एक रूपयात पीकविमा योजनेची घोषणा केली. मात्र नेवासा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी मागील वर्षी खरीप हंगामात सोयाबीन, कापुस, बाजरी, मुग, मका, उडीद, तुर या पिकासाठी पीक विमा भरला होता. परंतु सदर पीकाचा विमा परतावा अद्याप न मिळाल्याने शेतकरी वर्गामध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. विमा रक्कम मिळण्यासाठी शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. मुख्यमंत्री यांनी … Read more

मुलीचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत मारहाण, सोनाईत तीघांवर गुन्हा दाखल !

badanami

मुलीचे फोटो व्हायरल करून बदनामी करून जीवे मारण्याची धमकी देणे व दीड तोळा सोन्याची चैन बळजबरीने काढून घेऊन मारहाण केल्याप्रकरणी रुपेवाडी (ता. पाथर्डी) येथील तिघांवर सोनई पोलीस ठाण्यात नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका ३८ वर्षीय इसमाने सोनई पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे की, आदिनाथ संजय मिठे याने आमच्या मुलीबरोबर … Read more

नेवासा तालुक्यात तलवारीचा धाक दाखवणाऱ्या गुंडांवर गुन्हा दाखल !

crime

नेवासा तालुक्यातील तामसवाडी गावात तलवारीचा धाक दाखवणाऱ्यावर नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अविनाश आसाराम कापसे (रा. तामसवाडी) याने विशाल सावळेराम आयनर याच्याविरुद्ध फिर्याद दाखल केलेली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि. १२) संध्याकाळी ७.२० वाजेच्या सुमारास फिर्यादी अविनाश कापसे हे त्यांच्या राहात्या घरून गावामध्ये जात असताना तामसवाडी गावातील जय भवानी कृषी केंद्राजवळ … Read more

नेवास्यामध्ये एट्रॉसिटीची धमकी दिल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल !

atrocity

नेवासा येथे, लज्ज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करुन, एट्रॉसिटीची धमकी व शिवीगाळ करण्यात आली आहे. एवढेच नाही तर जिवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार देखील नुकताच घडला आहे. याप्रकरणी नेवासा पोलीस ठाण्यात सचिन रतन धोंगडे या आरोपीविरुद्ध नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला तीच्या घरामध्ये सासु, पती, मुलगा, मुलगी असे … Read more

अहमदनगर जिल्ह्याला हादरवणारी बातमी ! मुलाच्या त्रासाला कंटाळून बापानेच केला मुलाचा खून

Ahmednagar News

Ahmednagar News : शेती वाटपाच्या कारणावरून सतत भांडण करणाऱ्या मुलाच्या त्रासाला कंटाळून वडिलांनी मुलाचा खून केल्याची घटना नेवासा तालुक्यातील गोधेगाव येथे मंगळवारी (दि.१४) मे रोजी सायंकाळी ५.३० वाजता घडली आहे. याप्रकरणी नेवासा पोलिसांनी आरोपी वडिलांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. याबाबत नेवासा पोलिसांनी दिलेली माहिती अशी, आरोपी दादासाहेब जाधव व त्यांची पत्नी अलका … Read more

अहमदनगर जिल्हा हादरला ! पुरुष मुंडके, धडाचा कुजलेला मांसाचा तुकडा, करदोरा आणि गुडघ्याच मांस…

Ahmednagar News

Ahmednagar News : नेवासा तालुक्यातील देडगाव येथे अनोळखी पुरुषाचा खून करून त्याच्या शरीराचे तुकडे तुकडे करून मुळा कालव्याच्या पाथर्डी बँच पाटात टाकल्याची घटना गुरुवारी घडल्याने देडगाव परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबद देडगावचे पोलीस पाटील प्रल्हाद यशवंत ससाणे (वय ४७) यांनी नेवासा पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली की, दि. १६ मे २०२४ रोजी देडगावचे सरपंच चंद्रकांत भानुदास … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : वीज चोरी प्रकरणी हॉटेल मालकावर गुन्हा दाखल

Ahmadnagar Breaking

Ahmadnagar Breaking : वीजपुरवठा करणाऱ्या सर्व्हस वायरला टॅपिंग करून हॉटेलमधील उपकरणांना डायरेक्ट वीजपुरवठा केल्याप्रकरणी नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम येथील नगर- औरंगाबाद महामार्गावरील हॉटेल दीपकच्या मालकावर वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी, की प्रवरासंगम येथे दीपक दिलीप अगले (वय ४५) याचे हॉटेल दीपक नावाचे हॉटेल आहे. या हॉटेलवर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी … Read more

नेवासा तालुक्यातील पाईपलाईन फोडल्याने चार दिवसांपासून पाणीबाणी

Ahmednagar News

Ahmednagar News : नेवासा तालुक्यातील रस्तापूर येथील ग्रामपंचायतीच्या जुन्या विहिरीजवळील पाणीपुरवठा करणारी पाईपलाईनची अज्ञात व्यक्तीने तोडफोड केली. त्यामुळे गावाला चार दिवसांपासून पिण्यासाठी पाणीपुरवठा होण्यास ग्रामपंचायतकडून विलंब होत आहे. एकाच महिन्यात जवळपास तीन वेळाही पाईपलाईन फोडण्याचा खोडसाळपणा केला आहे. त्यामुळे नागरीकांतुन संताप व्यक्त होत आहे. यापूर्वी याच ग्रामपंचायतीच्या विहिरीवरील शंभर फूट इलेक्ट्रिक केबल कापून चोरून नेली … Read more

कांद्याची माळ घालून, दुधाची बाटली घेऊन केले मतदान

Ahmednagar News

Ahmednagar News : तालुक्यातील उस्थळ दुमाला येथे शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष त्रिंबक भदगले यांनी शेतकऱ्यांच्या समवेत काल सोमवारी (दि. १३) मतदानावेळी गळ्यात कांद्याची माळ घालून हातात दुधाची बाटली धरून मतदान केले व दुध व शेतमालाच्या भावाकडे सरकारचे लक्ष वेधले. सरकारचे कांदा व दुधाच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. इतर शेतीमाल बरोबर आणू शकत नसल्याने … Read more

मजूरी वाढल्याने उन्हाळी बाजरीची हार्वेस्टरने सोंगणी !

Ahmednagar News

Ahmednagar News : तालुक्यातील ग्रामीण भागात शेतकऱ्यांनी यंदा मोठ्या प्रमाणात उन्हाळी बाजरीचे पीक घेतले आहे. निसर्गाचा कोप आणि वन्यप्राण्यांकडून होत असलेल्या नासाडीमुळे बाजरीचे पीक घेणे काही वर्षापासून कमी होत चालले होते. परंतु यंदा प्रथमच शेतकरी पुन्हा उन्हाळी बाजरीला प्राधान्य देत पाचेगाव भागातील शेतकऱ्यांनी उन्हाळी बाजरीचे पीक घेतले आहे. मात्र उन्हाळी बाजरी सोंगणीसाठी मजूर एकरी तीन … Read more

Onion Price : कांदा लिलावात शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

Onion Price

Onion Price : नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथील बाजार समितीत कांदा विक्रीस घेऊन आलेल्या एका शेतकऱ्याने कांदा भाव पडल्याने शासनाच्या धोरणाचा निषेध करत विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. कांदा निर्यात बंदी उठवल्याची मोठ्या प्रमाणावर चर्चा गेली आठवडभर सर्वत्र झाली. त्यानुसार एक ते दोन बाजार कांद्याचे भाव प्रति क्विंटल ४०० ते ५०० रुपयांनी … Read more