Onion Price : कांदा लिलावात शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Onion Price : नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथील बाजार समितीत कांदा विक्रीस घेऊन आलेल्या एका शेतकऱ्याने कांदा भाव पडल्याने शासनाच्या धोरणाचा निषेध करत विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे.

कांदा निर्यात बंदी उठवल्याची मोठ्या प्रमाणावर चर्चा गेली आठवडभर सर्वत्र झाली. त्यानुसार एक ते दोन बाजार कांद्याचे भाव प्रति क्विंटल ४०० ते ५०० रुपयांनी वाढले. त्यामुळे चार पैसे पदरात पडतील ही अपेक्षा लागून राहिलेल्या शेतकऱ्यांना गेल्या २ दिवसांत पदरी पुरती निराशा आली. २५०० रुपये प्रति क्विंटल गेलेला कांदा बुधवारी (दि.८) मे रोजी १८०० ते १९०० पर्यंत खाली आले.

त्यामुळे अचानक एक, दोन दिवसात अचानक ४०० ते ५०० रुपयांनी भाव कसे काय कमी झाले. एका बाजूला असलेला तीव्र दुष्काळ व शेतमालाचे पडलेले भाव, यामुळे घोडेगाव (ता. नेवासा) येथे बाजार समितीत कांदा विक्रीस घेऊन आलेले कैलास भानुदास गादे खुणेगाव (ता. नेवासा) या शेतकऱ्याने कांदा भाव पडल्याने शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाचा व निर्यात बंदीचा निषेध करत विषारी औषध प्राशन करत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

यावेळी बाजार समिती कर्मचारी व उपस्थित शेतकरी व व्यापारी यांनी प्रसंगावधान राखत त्या शेतकऱ्यांकडील औषध हिसकावून घेतल्याने पुढील अनर्थ टळला. तात्काळ या शेतकऱ्याला वडाळा मिशन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करून पुढील उपचार सुरू केले आहे. सदर प्रकारामुळे शेतकरी वर्गात सरकार विरोधात असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.