शासकीय तूर खरेदी केंद्र चालू न झाल्याने शेतकऱ्यांची होतेय अडचण

अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2021 :-शासकीय तूर खरेदी केंद्र चालू न झाल्याने अत्यल्प भावात शेतकऱ्यांनी तूर विक्री करावी लागत आहे. यामुळे नेवासा तालुक्यात शासकीय तूर खरेदी केंद्र चालू करण्यात यावे अशी मागणीचे निवेदन भारतीय जनसंसदने दिले आहे. दरम्यान यंदाच्या वर्षी तयार झालेल्या तुरीला बाजारात भाव वाढत आहेत. केंद्र सरकारने तुरीसाठी सहा हजार रुपये प्रतिक्विंटल … Read more

संरक्षक जाळीमध्ये घुसून बिबट्याने बकरे आणि कोंबड्या केल्या फस्त

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2021 :-जिल्ह्यातील बिबट्याची वाढती दहशत अद्यापही कायम आहे. गेल्या काही दिवसांमध्ये बिबट्याने अनेकांवर जीवघेणा हल्ला केला आहे.यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्याचबरोबर बिबट्याने अनेक प्राण्यांवर देखील हल्ले केले आहे. बिबट्याने कालवड, बैल, मेंढ्या शेळ्यांवर हल्ला करून त्यांना ठार केले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांसह पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नुकतेच संगमनेर … Read more

कत्तलखान्याचे केंद्रबिंदू बनलेल्या संगमनेरात 300 किलो मांस जप्त

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2021 :-राज्यात गोहत्याबंदी कायदा अस्तित्वात आहे. गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल करण्यास बंदी असताना संगमनेरात मात्र या कायद्याचा धाक राहिला नसल्याचे चित्र आहे. वाढते कत्तलखाने व गोवंश मांसाची तस्करीमुळे संगमनेर हे महाराष्ट्रातील गोवंश हत्येचे व गोमांस तस्करीचे केंद्र म्हणून कुप्रसिद्ध झाले आहे. नुकतेच संगमनेरमध्ये गोवंश जनावरांची कत्तल सुरू असलेल्या पत्र्याच्या वाड्यात … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ह्या तालुक्यात नकली नवरी बनून लोकांना फसविणाऱ्या टोळीचा पर्दाफाश !

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2021 :-फसवणुकीच्या प्रकारात तपास करताना पैसे कमविण्यासाठी नकली नवरी उभी करुन नकली लग्न लावणारी टोळी उघड झाली असून यात श्रीरामपुरातील दोघा जणांची फसवणूक झाल्याची माहिती जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील यांनी आज श्रीरामपूर येथे पत्रकार परिषदेत दिली. आज जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील यांनी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला भेट दिली. … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या वाढली !

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात आज ५९ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६९ हजार १५२ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.१९ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (मंगळवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १३० ने वाढ … Read more

दोन वेगवेगळ्या घटनेत दोघांचा मृत्यू; शिर्डीतील घटना

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2021 :-शिर्डी परिसरात बाजारातळ भागातून एका अनोळखी ५५ वर्षांच्या इसमास तो गंभीर स्थितीत असल्याचे लक्षात आल्याने श्रीसाइंबाबा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्याला डॉक्टरांनी तपासले असता तो उपचारापूर्वीच मयत झाला होता. याप्रकरणी शिर्डी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. हा इसम कोण? त्याचा मृत्यू नेमका कसा झाला? याचा पुढील तपास … Read more

विद्यार्थिनीस शाळेतूनच पळविले; या ठिकाणी घडली घटना

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2021 :-राहाता तालुक्यातील लोणी प्रवरानगर परिसरातील एका शाळेतुन सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास 17 वर्ष वयाच्या अल्पवयीन विद्यार्थिनीला अज्ञात आरोपीने काहीतरी फूस लावून अज्ञात कारणासाठी पळवुन नेले. दरम्यान याप्रकरणी शाळेतील शिक्षिकेने लोणी पोलिसात फिर्याद दिल्यावरुन अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सपोनि पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा अधिक तपास सफो … Read more

शिर्डीसह संगमनेर तालुक्यातील १४ ग्रामपंचायतींचे धक्कादायक निकाल समोर

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2021 :-  शिर्डी मतदारसंघ व संगमनेर तालुक्यातील १४ ग्रामपंचायतींचे धक्कादायक निकाल समोर आले आहेत. माजी मंत्री आमदार विखे पाटील गटाकडे असलेल्या चिंचपूर, शेडगाव, झरेकाठी व पानोडी या ग्रामपंचायती थोरात गटाकडे गेल्या, तर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या ताब्यातील कनोली व मनोली ग्रामपंचायत विखे गटाने खेचून आणल्या. खळी ग्रामपंचायतीत मंत्री थोरात व … Read more

तरुणाचा अपघाती मृत्यू,शोकाकूल वातावरणात अत्यसंस्कार !

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2021 :- संगमनेर तालुक्यातील उंबरी बाळापूर येथील दीपक साहेबराव भुसाळ या तरुणाचा नुकताच अपघाती मृत्यू झाला. त्यामुळे पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे. दीपक हा संगमनेर येथील एका खासगी फायनान्स कंपनीत नोकरी करत होता. दोन दिवसांपूर्वी कामानिमित्त तो नाशिकला गेला असता काम आटोपून संगमनेरकडे येत होता. परत येत असताना पहाटे ४ वाजेच्या … Read more

जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचे वर्चस्व कायम

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2021 :- मुळा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत मंगळवारी संपल्यावर निवडणूक निर्णय अधिकारी श्रीनिवास अर्जुन यांनी निवडणूक बिनविरोध झाल्याचे सांगत २१ उमेदवारांची नावे जा‍हीर केली. या निवडणुकीतही जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचे एकहाती नेतृत्व कायम राहिले. निवडलेले उमेदवार – उत्पादक सभासद सोनई गट – कारभारी डफळ, … Read more

निवडणुकीतील पराभव हा भाजपच्या धोरणांचे अपयश – महसूलमंत्री थोरात

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2021 :-राज्यभरात ग्रामपंचायतींच्या निकाल जाहीर झाले आहे. यामध्ये महाविकास आघाडी सरकारवर जनतेने मोठा विश्वास पुन्हा एकदा दाखविला आहे. निकालाच्या आकडेवारीतून हे स्पष्ठ देखील होते. ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालाने जनता हि महाविकास आघाडी सरकारच्या पाठीशी खंबीर पणे उभे असल्याचे शिक्कामोर्तब झाले आहे. दरम्यान निवडणुकीच्या निकालावरून राज्यात भाजपची पीछेहाट झाल्याचे समोर आले आहे. … Read more

भारतीय संघाच्या विजयचा जल्लोष संगमनेरातही; अजिंक्यच्या गावी आतिषबाजी

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2021 :-तीन दशकानंतर भारतीय क्रिकेट संघाने कर्णधार अजिंक्य रहाणे यांच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियासोबत कसोटी मालिका जिंकली आहे. या विजयाचा रहाणे यांच्या मूळगावी चंदनापुरी (ता. संगमनेर) येथे किक्रेटप्रेमींनी जल्लोष केला. ऑस्ट्रेलियाला गाबा या मैदानावर पराभूत करणे जवळपास अशक्यच आहे, असा समज होता. मात्र, अजिंक्य रहाणेच्या भारतीय संघाने अशक्य ‘शक्य’ करून दाखवले. या … Read more

शिर्डीतील गैरप्रकार टाळण्यासाठी साईबाबा मंदिर प्रशासनाचे भाविकांना आवाहन

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2021 :-कोरोनामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून शिर्डी येथील साई मंदिर बंद ठेवण्यात आले होते. मात्र काही दिवसांपूर्वी हे मंदिर पुन्हा एकदा भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे. दर्शनासाठी सशुल्क पासची सोय करण्यात आली आहे. मात्र सशुल्क पासेसच्या धोरणाचा पुरता बोजवारा उडाला आहे. पासेसचा आता धंदा होऊ लागला आहे. २०० रुपयांचा पास … Read more

जिल्ह्यात दीड हजाराहून अधिकांचे लसीकरण यशस्वी

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2021 :-कोरोना विषाणूला जिल्ह्यातून हद्दपार करण्यासाठी व नागरिकांना या विषाणूच्या प्रदूरभावापासून संरक्षित करण्यासाठी 16 जानेवारीपासून नगर जिल्ह्यात कोरोना लसीकरण सुरु करण्यात आले आहे. दरम्यान याच अनुषंगाने जिल्ह्यात 650 आरोग्य कर्मचार्‍यांना मंगळवारी दिवसभरात कोरोनाची लस देण्यात आली. यामुळे आतापर्यंत कोरोनाची दिलेल्यांची संख्या आता 1 हजार 521 झाली आहे. मंगळवारी लस घेतल्यानंतर … Read more

धोक्याची घंटा ! जिल्ह्यात 315 पक्षांचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2021 :-गेली अनेक महिने जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरु होता, या संकटाला सामोरे जात त्याच्यावर विजय मिळवत असताना नगरकरांच्या समोर आणखी एक मोठे संकट येऊन उभे राहिले आहे. देशात बर्ड फ्ल्यू या आजराने प्रवेश केला आहे, यामुळे अनेक पक्षयांच्या मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान या धोक्याची घंटा … Read more

धक्कादायक ! 80 वर्षीय आजीचा खून करून चोरटा झाला पसार

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2021 :- चोरीच्या व गळ्यातील दागिने लुटण्याच्या उद्देशाने अज्ञात चोरट्याने एका 80 वर्षे वयाच्या वृद्धेचा गळा दाबून खून केला. सावित्राबाई मोगल शेळके असे या खून झालेल्या वृद्धेचे नाव आहे. दरम्यान संगमनेर तालुक्यातील कौठेकमळेश्वर गावात भरदिवसा हा धक्कादायक प्रकार घडला आहे. यामुळे एकाच खळबळ उडाली होती. याबाबत अधिक माहिती अशी कि, … Read more

संगमनेर तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीवर शेतकरी विकास मंडळाचे वर्चस्व

अहमदनगर Live24 टीम, 19 जानेवारी 2021 :- जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकांसाठी मतदान झाले, मतमोजणी झाले आणि निकाल देखील घोषित झाले. अनेक ठिकाणी दिग्गजांनी आपली सत्ता कायम राखत ग्रामपंचायतींवर आपले वर्चस्व मिळवले. यातच संगमनेर तालुक्यात देखील दिग्गजांच्या नेतृत्वाखाली निवडणूक पार पडल्या होत्या व यामध्ये अनेक इच्छुक उमेदवारांनी विजयाचा गुलाल उधळला. दरम्यान संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील सावरगाव घुले ग्रामपंचायतीवर … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : आज वाढले इतके रुग्ण

अहमदनगर Live24 टीम, 19 जानेवारी 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात आज १५२ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६९ हजार ०९३ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.२८ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (सोमवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ६१ ने वाढ … Read more