शेततळ्यात पडून चार वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 19 जानेवारी 2021 :- शेततळ्यात बुडून एका चिमुरडीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दरम्यान हि दुर्दैवी घटना अकोले तालुक्यातील गणोरे येथे घडली आहे. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे. समृद्धी स्वप्नील खतोडे (वय ४) असे या मयत चिमुकलीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, गणोरे येथील समृद्धी सकाळी घराजवळील अंगणात खेळत … Read more

विखे गटाची ३५ वर्षांची सत्ता थोरात गटाने ताब्यात घेतली !

अहमदनगर Live24 टीम, 19 जानेवारी 2021 :-महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या गटाने अनेक वर्षे विखेंच्या नेतृत्वाखाली असलेल्या १४ पैकी ६ ग्रामपंचायतींवर काँग्रेसचा झेंडा फडकला. व कनोली, मनोली या थोरात गटाच्या ताब्यातील ग्रामपंचायतींवर विखे गटाने वर्चस्व सिद्ध केले. संगमनेर तालुक्यातील ९४ पैकी थोरात गटाच्या भोजदरी, निमगाव टेंभी, निमगाव बुद्रूक, आंबी खालसा या चार ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. … Read more

दोन बिबटे एकमेकांना भिडले आणि पहा पुढे काय झाले…

अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2021 :-  नगर जिल्ह्यात दिवसेंदिवस बिबट्यांची संख्या वाढू लागली आहे. यामुळे नागरिकांमध्ये देखील भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नुकतेच अकोले तालुक्यातील लाहित शिवारात दोन बिबट्यांची झुंज झाली व या झुंजीत दोनही बिबट्यांच्या मृत्यू झाला आहे. याबाबत अकोले वनविभागाकडून मिळालेली माहिती अशी की, लाहित शिवारातील एका उसाच्या शेतात रविवारी रात्री एक … Read more

शिर्डीत सव्वा लाखाची सोन्याची चैन चोरीस

अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2021 :- विजयवाडा येथून शिर्डीत साडबाबांच्या दर्शनाला आलेल्या साईभक्तांचे सव्वा लाखाची सोन्याचे चैन चोरीस गेली आहे. याबावत अभिषेक कामनागरा जयकुमार श्रीराम वय २२ रा. वाहू सेंटर, विजयवाडा यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आपण आणि आजी व कोटा अंजली हे साइं अन्रपूर्णछत्र, शिडी येथे झोपण्यासाठी जात असताना आजी व कोटा अंजली … Read more

साईंच्या दरबारी भाविकांची लूट; दर्शनाच्या पासचा काळाबाजार

अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2021 :-कोरोनामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून शिर्डी येथील साई मंदिर बंद ठेवण्यात आले होते. मात्र काही दिवसांपूर्वी हे मंदिर पुन्हा एकदा भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे. दरम्यान साईंच्या दर्शनासाठी भाविकांचा ओघ वाढला आहे. मात्र साई संस्थानने नियोजन करताना अनेक त्रुटी राहिल्याने शिर्डीत सशुल्क पासेसच्या धोरणाचा पुरता बोजवारा उडाला आहे. पासेसचा … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील तब्बल 325 ग्रामपंचायतींवर ‘या’ पक्षाचे निविर्वाद वर्चस्व !

अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीने सर्वाधिक ग्रामपंचायतीवर वर्चस्व मिळवून मुसंडी मारली आहे. जिल्ह्यात ३२५ पेक्षाही जास्त ग्रामपंचायतीवर आपले एकहाती विजय मिळवून ग्रामीण भागातील जनतेने पुन्हा एकदा शरद पवार व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर विश्वास टाकलेला आहे. असे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी एका प्रसिध्दीपत्रकाव्दारे घोषीत केले आहे. महाविकास आघाडी … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : आज वाढले इतके रुग्ण वाचा चोवीस तासांतील अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2021 :- जिल्ह्यात आज ८६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६८ हजार ९४१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.१५ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (रविवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १३१ ने वाढ झाल्याने … Read more

ग्रामपंचायत निवडणूक निकालाबाबत माजीमंत्री राधाकृष्ण विखे म्हणाले…

अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2021 :- शिर्डी मतदार संघात सातत्‍याने सुरु असलेल्‍या विकास प्रक्रीयेला ग्रामपंचायत निवडणूकीत मतदारांनी चांगले पाठबळ दिले. सर्वसामान्‍य माणसाला विकासाचा केंद्रबिंदू मानून अव्‍याहतपणे सुरु असलेल्‍या विकास कामांवर मतदारांनी या निकालातून शिक्‍कामोर्तब केले असल्‍याची प्रतिक्रीया भाजपाचे जेष्‍ठानेते आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी व्‍यक्‍त केली. संगमनेर तालुक्‍यातील समाविष्‍ठ असलेल्‍या गावांपैकी ८ ग्रामपंचायतींसह राहाता तालुक्‍यातील २५ … Read more

दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक मुलाच्या अंगावर घेतली झेप

अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2021 :-  संगमनेर ते कोल्हेवाडी जाणाऱ्या रस्त्यावर उसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक मोटर सायकल स्वरांवर झेप घेऊन ओम फकीरा मंडेला (वय १३ रा. वडाळा, नाशिक) या शाळकरी मुलाच्या पायाला तळपायाला आणि मांडीला चावा घेत गंभीररित्या जखमी केल्याची घटना रविवारी पहाटेच्या सुमारास घडली या बाबत समजलेली अधिक माहिती अशी … Read more

धक्कादायक ! कामासाठी बोलाविलेल्या महिलेला लाख रुपयात विकले

अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2021 :- एका महिलेला स्वयंपाकीच्या कामासाठी बोलावून इंदूरच्या एका व्यक्तीला विकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्या महिलेच्या पतीने श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून याप्रकरणी दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव मधील मोतीनगर भागात राहणार्‍या एका तरुणाने याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिसांत फिर्याद दिली आहे. … Read more

कोणी केला आमदार राधाकृष्ण विखे-पाटील यांचा पराभव ? वाचा सविस्तर

अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2021 :- नगरमध्ये लोणी खुर्द हे भाजप आमदार राधाकृष्ण विखे-पाटील यांचं गाव आहे. या गावातील ग्रामपंचायतीवर गेल्या 20 वर्षांपासून विखे-पाटलांची सत्ता होती. मात्र, या ग्रामपंचायतीच्या 17 पैकी 13 जागा जिंकून परिवर्तन पॅनलने विखे-पाटलांना धोबीपछाड केलं आहे. राधाकृष्ण विखे-पाटील स्वत: भाजपचे आमदार आहेत. त्यांचे चिरंजीव सुजय विखे-पाटील हे खासदार आहेत. असं … Read more

विखे पाटील यांचा स्वताच्या गावात पराभव तर राहता तालुक्यातील सत्ता खेचून आणण्यात यश !

अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2021 :- राधाकृष्ण विखे-पाटील यांनी राहता तालुक्यातील 25 पैकी 24 ग्रामपंचायती वर्चस्व कायम ठेवलं आहे. त्यांचं गाव असलेल्या लोणी खुर्द ग्रामपंचायतीची सत्ता त्यांना गमवावी लागली आहे. आमदार राधाकृष्ण विखे-पाटलांनी राहता तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी चांगला जोर लावला होता. अचूक नियोजनाच्या बळावर त्यांना राहता तालुक्यातील सत्ता खेचून आणण्यात यश आलं. तालुक्यातील 25 … Read more

हलगर्जीपणा पडला महागात; साई संस्थानचे प्रकाशन अधीक्षक निलंबित

अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2021 :-देशभऱ ख्याती असलेले शिर्डी येथील साईमंदिरात जगभरातून भाविक दर्शनासाठी येत असतात. मात्र संस्थांनातील एक हलगर्जीपणाचा कारभार नुकताच उघड्यावर आला आहे. साई संस्थान दरवर्षी भाविकांच्या सुविधेसाठी दिनदर्शिका व डायरी व बाबांचे फोटोचे कॅलेंडर छापून भाविकांना अल्पदरात उपलब्ध करून देत असते. मात्र यावर्षी डायर्‍या व कॅलेंडर मिळाल्या नसल्याने देश विदेशातील अनेक … Read more

राधाकृष्ण विखे पाटलांना मोठा धक्का ! या ठिकाणी गमावली सत्ता !

अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2021 :-ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या निकालात राज्यातील अनेक दिग्गज नेत्यांना आता पर्यंत धक्का लागताना दिसत आहे. अहमदनगर जिल्ह्यात स्वतःच्या गावात वीस वर्षापासून ताब्यात असलेली ग्रामपंचायतीत १७ पैकी १३ जागा परिवर्तन पॅनलने जिंकून भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांना धक्का दिला आहे. तर आता संगमनेर तालुक्यातील कनोली ग्रामपंचायतीमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष … Read more

AhmednagarLive24 Updates : ग्रामपंचायत निकाल 2021

Gram Panchayat Election Results 2021 LIVE Updates : राज्यातील सुमारे 12 हजार 711 ग्रामपंचायतींच्या निवडणुका 15 जानेवारीला पार पडल्या. आज या ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल आहे. अपडेट्ससाठी हे पेज रिफ्रेश करा (LAST UPDATE On 9.23 AM)   नगर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी सुरु झाली आहे जिल्ह्यातील एकूण 767 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक लागली होती. त्यातील 53 ग्रामपंचायतीमध्ये बिनविरोध … Read more

कोणावर गुलाल पडणार ? आज लागणार निकाल !

अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2021 :-नगर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची पंचवार्षिक निवडणुकीची प्रक्रिया जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या दिशानिर्देशात सुरु आहे. ७०५ ग्रामपंचायतींच्या ५ हजार ७८८ सदस्य पदांसाठी १३ हजार १९४ उमेदवारांचे भविष्य मतदानाद्वारे ईव्हीएम मशिनमध्ये बंद झाले आहे. आज सोमवार रोजी १४ तालुक्यात निर्धारीत ठिकाणी तहसीलदारांच्या निगराणीत मतमोजणी होणार असून ‘ कोणावर गुलाल ‘ याचा … Read more

करोडो देशवासियांचे स्वप्न पूर्ण होणार – आमदार राधाकृष्ण विखे

अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2021 :-अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिर हे राष्ट्रीय स्मारक ठरणार आहे. देशातील कोट्यवधी जनतेच्या भावना या मंदिर निर्माण कार्याशी जोडल्या गेलेल्या आहेत. राम मंदिर हा एकात्मतेचा मानबिंदू आहे. प्रत्येक समाजघटकाचे यासाठी योगदान असले पाहिजे. करोडो देशवासीयांचे स्वप्न यानिमित्ताने पूर्ण होत असल्याच्या भावना माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे यांनी व्यक्त केल्या. कोल्हार … Read more

पाण्यात बुडून दोन सख्या भावांसह मामाचाही मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2021 :-केटीवेअरच्या पाण्यात दोन सख्या भावांचे व त्याच्या मामाचाही बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दरम्यान हि घटना संगमनेर तालुक्यातील झोळे येथे गणेशवाडी येथे घडली असल्याचे समजते आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, सुरज संतोष गाढवे (वय १५) व मयूर संतोष गाढवे (वय १३) हे दोघे भाऊ आपले सख्खे … Read more