शेततळ्यात पडून २२ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 20 नोव्हेंबर 2020 :- संगमनेर तालुक्याच्या पठारभागावरील गुंजाळवाडी पठार येथे शेततळ्यात पडून एका बावीस वर्षीय तरूणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे ही घटना गुरूवार दिनांक १९ नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली आहे धनंजय दादाभाऊ आगलावे असे या तरूणाचे नाव आहे. दादाभाऊ गोपीनाथ आगलावे हे शेतकरी गुंजाळवाडी पठार येथे राहात आहे त्यांना … Read more

घरातल्या पंख्याला गळफास घेत एकाची आत्महत्या

अहमदनगर Live24 टीम, 20 नोव्हेंबर 2020 :- सोनई येथील दतात्रय जगन फुलारे ( वय – ३५ रा. अंबिकानगर, सोनई, ता. नेवासा, जि. अ. नगर) या युवकाने आज (दि. २०) घरातल्या पंख्याला गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्येचं कारण समजू शकलं नसल्याचं सोनई पोलिसांनी सांगितलंय. याप्रकरणी पांडूरंग शिंदे यांच्या खबरेवरुन अकस्मात मृृृृत्युच्या घटनेची नोंद करण्यात आली. घटनेची … Read more

राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय : शिवसेनेचे मंत्री भाजप नेते आ.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानी येणार …

अहमदनगर Live24 टीम, 20 नोव्हेंबर 2020 :-  राज्याचे महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार हे रविवार २२ नोव्हेंबर रोजी दुपारी भाजपचे नेते आ.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानी येणार असल्याने राजकिय वर्तुळात खळबळ उडाली आहे. वेगवेगळ्या राजकीय चर्चांना उधाण आले आहे .मंत्री सत्तार हे विखेंच्या घरी येणार असल्याने राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय असून दोघांमध्ये काय राजकीय चर्चा होणार … Read more

घर फोडून सोन्याचे दागिने लंपास

अहमदनगर Live24 टीम, 20 नोव्हेंबर 2020 :- संगमनेर शहरातील मालदाड रोडवरील गणेश विहारमध्ये राहणाऱ्या रमेश पाटीलबा थोरात यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी १३ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम लांबवली. ही घटना सोमवारी मध्यरात्री घडली. थोरात हे कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. बंद घर पाहून चोरट्यांनी कुलूप तोडून मणिमंगळसूत्र व रोख रक्कम लांबवली. थोरात यांनी … Read more

सोळा वर्षांच्या मुलीचा विनयभंग, तिघांना अटक

अहमदनगर Live24 टीम, 20 नोव्हेंबर 2020 :- कोपरगाव शहरातील दत्तनगर भागात राहणाऱ्या १६ वर्षांच्या मुलीचा मोद्या मंजुळ, सोन्या मंजुळ, गटर मंजुळ, विशाल गायकवाड यांनी विनयभंग केला. ही घटना १८ ला रात्री घडली. संबंधित दोन बहिणी सार्वजनिक शौचालयात गेल्या असता चौघा आरोपींनी त्यांच्याशी लगट करून हात धरून ओढले. फिर्यादी व तिची बहीण शौचालयात पळत गेल्यावर आरोपींनी … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील या भागात अवकाळी पाऊस  

अहमदनगर Live24 टीम, 19 नोव्हेंबर 2020 :- अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे यापूर्वीच मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यात आता परत अवकाळी पावसाने हजेरी लावली. आज शिर्डी आणि राहाता परिसरात अवकाळी पावसाची हजेरी, अर्धा तास जोरदार पाऊस झाला. अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची परत एकदा धावपळ उडाली. राज्यातील काही भागात अवकाळी पाऊसाचा हवामान खात्याने इशारा दिला  होता. त्यानुसार आज … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्येने ओलांडला साठ हजारांचा आकडा आज वाढले ‘इतके’ रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 19 नोव्हेंबर 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज १९३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५८ हजार १५७ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.३४ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (बुधवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २९५ ने वाढ … Read more

विखे पाटील म्हणतात राज्यात लवकरच भाजपची सत्ता येईल !

अहमदनगर Live24 टीम, 19 नोव्हेंबर 2020 :-पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखाली सबका साथ सबका विकास मंत्राने संपूर्ण देशाचा विश्वास संपादन केला आहे.बिहार निवडणुकीच्या यशानंतर सर्वाची जबाबदारी वाढली आहे. आगामी निवडणुका लक्षात घेवून आत्मनिर्भर योजना समाजाच्या शेवटच्या घटकापर्यत पोहचवा. राज्यात लवकरच सता येईल. शिर्डी नगरपंचायतीवरही भाजपचाच झेंडा फडकविण्यासाठी कटीबध्द व्हा असा संदेश भाजपाचे जेष्ठ नेते आ.राधाकृष्ण विखे … Read more

श्री घोडेश्वरी देवी मंदिरात धाडसी चोरी ,११ लाख रुपयांचा ऐवज चोरी.

अहमदनगर Live24 टीम, 19 नोव्हेंबर 2020 :- नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथील जागृत देवस्थान श्री घोडेश्वरी देवी मंदिरात गुरुवारी मध्यरात्री धाडसी चोरी झाली असून. मंदिर गाभाऱ्यातील १७ किलो चांदी व त्यावरील हिरे असे एकूण ११ लाख रुपयांची चोरी झाल्याची प्राथमिक माहिती समजली आहे. सोनई पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामचंद्र कर्पे व सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय … Read more

कोरोनाने डोके वर काढले.. ह्या तालुक्यात वाढले ‘इतके’ रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 19 नोव्हेंबर 2020 :- श्रीरामपूर तालुक्यातील कोरोना रुग्णांचा आकडा ११ नोव्हेंबरला शून्य होता. मात्र, दिवाळीतील वाढत्या गर्दी आणि नागरिकांच्या निष्काळजीपणामुळे कोरोनाने पुन्हा डोके वर काढायला सुरुवात केली आहे. बुधवारी एकाच दिवसात श्रीरामपुरात १६ रुग्ण सापडल्याने प्रशासनासह आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. येत्या २३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावीचे वर्ग सुरू होत असल्याने या … Read more

लोकप्रतिनिधींचे काम निधी मिळवून देण्याचे असते, फ्लेक्स लावण्याचे नाही !

अहमदनगर Live24 टीम, 19 नोव्हेंबर 2020 :- मागील वर्षी अतिवृष्टीमुळे फळ उत्पादकांचे नुकसान झाले. यापैकी बहुतांश शेतकऱ्यांनी विमा भरला होता. मात्र, त्यापैकी बऱ्याच शेतकऱ्यांना भरपाई मिळाली नाही. सर्वच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करु. मात्र, पीकविमा मिळवून दिल्याबद्दल कधीही फ्लेक्स बोर्ड लावणार नाही. कारण लोकप्रतिनिधींचे काम निधी मिळवून देण्याचे असते, फ्लेक्स लावण्याचे नाही, अशी … Read more

ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे तिन कामगार भाजले, उपचारादरम्यान एकाचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 19 नोव्हेंबर 2020 :-  नेवासे तालुक्यातील भेंडे येथील लोकनेते मारुतराव घुले ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या आसवनी विभागात काम करत असताना गरम पाणी अंगावर पडून भाजलेल्या अशोक भीमा गायकवाड (४१ वर्षे) या कामगाराचा म‌ंगळवारी सायंकाळी ५.४० वाजता औरंगाबाद येथील खासगी रुग्णालयात उपचारांदरम्यान मृत्यू झाला. त्यांच्यामागे आई-वडील, पत्नी, दोन मुली, मुलगा, भाऊ, भावजय, पुतणे … Read more

डॉक्टरची ४० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी ५ जणांविरोधात गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 19 नोव्हेंबर 2020 :- जमीन खरेदीत डॉक्टरची ४० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी शहरातील पाच जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. या प्रकरणाने संगमनेर शहरात मोठी खळबळ उडाली असून उलटसुलट चर्चा होत आहे. नवीन नगर रोड येथील गंगागिरी सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे संचालक डॉ. योगेश बाळकृष्ण गेठे यांनी फेब्रुवारी २०१६ मध्ये गुंजाळवाडीतील गट नंबर ४५ मधील … Read more

महिलेचा विनयभंग करणाऱ्यास अखेर अटक !

अहमदनगर Live24 टीम, 19 नोव्हेंबर 2020 :-  संगमनेर तालुक्यातील झरेकाठी येथे शेळ्या चरण्यासाठी गेलेल्या आदिवासी महिलेचा गोकूळ राजू ढमक (चणेगाव) याने विनयभंग केला. ही घटना शुक्रवारी घडली. आश्वी पोलिसांनी त्याला ताब्यात घेत विनयभंग व अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला. न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. महिला शेळ्या चारत असताना ढमकने तिला अडवले. पैशांचे अमिष दाखवून … Read more

दररोज फक्त ‘इतक्या’ भाविकांना घेता येणार शनिदर्शन !

अहमदनगर Live24 टीम, 19 नोव्हेंबर 2020 :-  कोरोनामुळे शनिशिंगणापूर येथील शनिदेवाचे शनिदर्शन गेले आठ महिने बंद होते .राज्य सरकारने मंदिर उघडण्याचा निर्णय घेतल्यानंतर सुरक्षेच्या सर्व उपाययोजना राबवत सोमवारपासून शनिमंदिर भाविकांसाठी खुले झाले. विश्वस्त व अधिकारी यांनी सुयोग्य नियोजन केले. दररोज ६००० भाविकांना दर्शन घेता येणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात प्रवेश करण्यापूर्वी भक्तांना हात पाय … Read more

दिवाळी संपताच अहमदनगर जिल्ह्यात वाढले तब्बल ‘ इतके’ रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 18 नोव्हेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज २६६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५७ हजार ९६४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.४९ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (मंगळवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ३२४ ने … Read more

भरदिवसा घर फोडून साडेतीन लाखांचा माल केला लंपास

अहमदनगर Live24 टीम, 17 नोव्हेंबर 2020 :- जिल्ह्यात लुटमारी, चोरी, दरोडा, घातपात अशा गुन्हेगारी घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. दरम्यान दिवसाढवळ्या चोरीच्या घटनांमुळे मात्र नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण होत आहे. नुकतीच कोपरगाव शहरातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून ऐन दिवाळीत घरी कोणी नसल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी श्रद्धानगर भागात राहणारे अक्षय कैलास … Read more

पुजा साहित्याला बंदी असतानाही भाविकांच्या हातात पुजेचे ताट

अहमदनगर Live24 टीम, 17 नोव्हेंबर 2020 :-कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता राज्यभरात गेले अनेक महिने धार्मिक स्थळे बंद ठेवण्यात आली होती. मात्र अखेरीस महाविकास आघाडी सरकारने निर्णय घेत व भाविकांची श्रद्धा लक्षात घेत धार्मिक स्थळे खुली करण्याचे जाहीर केले. त्यानुसार कालपासून सर्व धार्मिक स्थळे उघडण्यात आले आहे. त्यातच जगप्रसिद्ध असलेलं सोनई येथील शनिशिंगणापूर हे देवस्थान अनके दिवसांनी … Read more