मदतीसाठी बोलविलेल्या व्यक्तीकडूनच महिलेवर अत्याचार

अहमदनगर Live24 टीम, 7 नोव्हेंबर 2020 :-  महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये आजकाल जास्तच वाढ झालेली पाहायला मिळत आहे. यातच बहुतांश वेळा महिलांवरील होणारे अत्याचाराच्या घटना त्यांच्या परिचित व्यक्तींकडूनच झालेल्या आढळून आल्या आहेत. असाच काहीसा प्रकार पुन्हा एकदा जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात घडला आहे. भावाला पैसे देण्यासाठी सोबत नेलेल्या इसमानेच परतीच्या प्रवासात आडवाटेला नेवून अत्याचार केल्याची खळबळजनक घटना … Read more

मराठी चित्रपट आणि चित्रपटगृहे पुनर्जीवित करण्याला प्राधान्य – महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

अहमदनगर Live24 टीम, 7 नोव्हेंबर 2020 :-  काही वर्षांपूर्वी मराठीत नवीन काही येत नाही असं म्हटलं जात होते पण आज मराठी चित्रपट पाहायलाच पाहिजे, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे हे मराठी चित्रपटांचे यश आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात मराठी चित्रपट आणि महाराष्ट्रातील चित्रपटगृहे पुनर्जीवित करण्याला राज्य शासन प्राधान्य देईल, असे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले. महाराष्ट्र चित्रपट … Read more

नाशिक – पुणे महामार्गावर एका टेम्पोसह तीन कारचा भीषण अपघात !

अहमदनगर Live24 टीम, 7 नोव्हेंबर 2020 :- संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी शिवारात एका टेम्पोसह तीन कारचा भीषण अपघात झाला असून विशेष म्हणजे ही सर्वच वाहने पुण्याकडून नाशिकच्या दिशेने निघाली होती. शनिवारी ( ७ ऑक्टोंबर) दुपारी दीड वाजेच्या सुमारास हा अपघात झाला आहे. दरम्यान ह्या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर संगमनेर वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी व शहर पोलीस ठाण्यातील … Read more

भीक मागण्यासाठी तो पुढे आला व वाहनाच्या धडकेत ठार झाला

अहमदनगर Live24 टीम, 7 नोव्हेंबर 2020 :- नाशिक-पुणे बाह्यवळण महामार्गावर संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी शिवारात एका टेम्पोसह तीन कारचा भीषण अपघात झाला आहे. ही सर्व वाहने पुण्याकडून नाशिकच्या दिशेने निघाली होती. दरम्यान या विचित्र घडलेल्या अपघातात एका तृतीयपंथीयाला आपला जीव गमवावा लागला, तर या गडबडीत घडलेल्या चार वाहनांच्या विचित्र अपघातात अन्य दोघे जखमी झाले आहेत. या … Read more

चोरटयांनी त्याला भुयारी पुलाखाली गाठले व त्याला लुटले

अहमदनगर Live24 टीम, 7 नोव्हेंबर 2020 :- जिल्ह्यातील गुन्हेगारी वाढत असताना त्याचबरोबरीने शहरातील वाढती गुन्हेगारीला आवर घालण्याचे मोठे आव्हान पोलीस प्रशासनासमोर उभे राहिले आहे. जिल्ह्यात लुटमारी, चोरी, दरोडा, घातपात अशा गुन्हेगारी घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यातच श्रीरामपूर येथील एका बॅक ग्राहक सेवा केंद्र चालकास तीन चोरट्यांनी लुटल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी संजय साखरे (वय … Read more

त्या वादग्रस्त पोलीस निरीक्षकाची बदली मुख्यालयात

अहमदनगर Live24 टीम, 7 नोव्हेंबर 2020 :-  जिल्ह्यातील पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक यांचे जिल्हांतर्गत बदली आदेश पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी शुक्रवारी रात्री उशिरा काढले आहेत. दरम्यान विविध कारणांवरुन सतत चर्चेत असलेले आणि कार्यकाळाच्या अगदी शेवटच्या क्षणातही वादग्रस्त ठरलेले तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुनील पाटील यांची अखेर अपेक्षेप्रमाणे मुख्यालयात रवानगी झाली आहे. त्यांच्याजागी संगमनेर शहर पोलीस … Read more

विजेच्या शॉर्टसर्किटमुळे 25 लाखांचा ऊस जळून खाक

अहमदनगर Live24 टीम, 7 नोव्हेंबर 2020 :-जिल्ह्यात यंदाच्या वर्षी झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. कोरोनामुळे आधीच हतबल झालेल्या शेतकऱ्यांना परतीच्या पावसाने आर्थिक संकटात पाडले आहे. यामुळे बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे. यातच राहाता तालुक्यातील राजुरी येथे शुक्रवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास अचानक शॉर्टसर्किट होऊन पंधरा ते सोळा एकर उसाच्या पिकामध्ये आग … Read more

विवाहपूर्वीच ‘तिला’ अपशकुनी ठरवल्याने तरुणीची आत्महत्या

अहमदनगर Live24 टीम, 7 नोव्हेंबर 2020 :- विवाहपूर्वीच तिला अपशकुनी ठरवत, विवाहास नकार दिल्याने, पैसे व दागिनेही परत घेऊन फसवणूक केल्याने तरुणीने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. दोनही कुटुंबाच्या संमतीने साखरपुडा झाला, दागिन्यांची देवानघेवाण झाली मात्र याप्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी वर पक्षाकडील चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. भारती भास्कर सांगळे वय २६ … Read more

पाकिस्तानपेक्षा भाजपाला शेतकरी हा मोठा शत्रू वाटतो

अहमदनगर Live24 टीम, 7 नोव्हेंबर 2020 :- भाजपाला शेतक-यांची जिरवायची आहे त्यामुळे परदेशातून शेती माल आयात करण्यात येतो आहे. पाकिस्तानपेक्षा भजपाला शेतकरी हा मोठा शत्रू वाटतो अशी घणाघाती टीका महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. केंद्र सरकारने केलेल्या कृषी काय्दायविरोधात पंजाब आणि हरयाणा राज्य पेटून उठलं आहे. तिथे आजही आंदोलनं सुरु आहेत. अद्याप राज्यातील … Read more

भाविकांना ‘साई ब्लेसिंग’द्वारे घरबसल्या मिळेल कृपाप्रसाद

अहमदनगर Live24 टीम, 7 नोव्हेंबर 2020 :-कोरोना महामारीच्या संकटातून सावरण्यासाठी जगभरातील भाविकांना लढण्यासाठी आत्मिक बळ मिळावे, नवऊर्जा प्राप्त व्हावी, मन:शांती मिळावी यासाठी साईबाबांच्या नगरीतून साई ब्लेसिंग बाॅक्सचे दिवाळीनिमित्त गिफ्ट तयार करण्यात आले असून त्यातून भक्तीचा सुगंध जगभरात दरवळणार आहे. शुभारंभापूर्वी या बॉक्सची साई प्रतिमेसह पालखीतून पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव … Read more

धक्कादायक माहिती समोर … शहरात कोरोना बाधितांची संख्या घटली आणि ग्रामीण भागात वाढली

अहमदनगर Live24 टीम, 7 नोव्हेंबर 2020 :-संगमनेर शहरात कोरोना बाधितांची संख्या घटली असली तरी ग्रामीण भागात वाढली आहे. गुरुवारी तालुक्यात ३४ बाधित आढळले असून पैकी फक्त पाच शहरातील आहे. तर १४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. बाधितांची संख्या ४४४० झाली असून ४१६८ रुग्ण यातून बरे झाले आहे. २३१ बाधितांवर उपचार सुरु असून ४१ जणांचा मृत्यू झाला … Read more

जिल्ह्यात कोरोनामुळे आणखी दोन जणांचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 7 नोव्हेंबर 2020 :- नगर शहर व जिल्ह्यात कोरोनामुळे आणखी दोन जणांचा मृत्यू झाला असून, नवीन २६६ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. नगर शहर व जिल्ह्यात गुरुवारी सायंकाळी सहा वाजल्यापासून शुक्रवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये ४८, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ५३ आणि अँटीजेन चाचणीत १६५ रुग्ण बाधित आढळले. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अपहरण झालेल्या अवघ्या पंधरा वर्षांच्या मुलाचा मृतदेह सापडला !

अहमदनगर Live24 टीम, 6 नोव्हेंबर 2020 :-कोपरगाव शहरातील उपनगर असलेल्या बेट येथून अपहरण झालेल्या अल्पवयीन विशाल रमेश भाकरे (वय 15) याचा तीन दिवसानंतर अखेर गोदावरी नदी पत्रातील पाण्यात मृतदेह सापडला आहे. कोपरगाव येथील भाजीपाला विक्रेत्या महिलेचा विशाल हा मुलगा आहे. तीन चार दिवसांपासून त्याच्याशी कुटुंबियांचा काहीही संपर्क होत नव्हता. राहत्या घरातून मंगळवारी दि.3 नोव्हेंबर रोजी … Read more

मोठी बातमी : बहुचर्चित गुटखा प्रकरणी ‘दोन’ मोठ्या लोकांना अटक !

अहमदनगर Live24 टीम, 6 नोव्हेंबर 2020 :- जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून गुटखा तस्करीचे प्रकरण चांगलेच गाजू लागले आहे. वाढत्या घटनांना रोख बसावा यासाठी पोलीस प्रशासन देखील आक्रमक कारवाई करत आहे. यातच नगर जिल्ह्यात घडलेली एक घटना सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधलेल्या एकलहरे येथील गुटखा छापा प्रकरणात शिर्डी विभागाचे पोलीस उपअधीक्षक संजय … Read more

तू आमच्या नादी लागशील तर तुला ठार मारून टाकीन

अहमदनगर Live24 टीम, 6 नोव्हेंबर 2020 :-मोबाईल न दिल्याच्या रागातून दोघा दारुड्यांनी एका व्यक्तीस लोखंडी रॉडने मारहाण करीत जखमी केले आहे. तसेच त्याला जीवे मारण्याची धमकी दिली असल्याची घटना जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात घडली आहे. याप्रकरणी नितीन विनायक चिटणीस वय ३५ याने कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की, फिर्यादी … Read more

दारुड्या कर्मचाऱ्याने रुग्णालयात केला तमाशा; या ठिकाणी घडली घटना

अहमदनगर Live24 टीम, 6 नोव्हेंबर 2020 :- दारूचा घोट घशाखाली गेला कि माणसाला चांगले वाईट यामधील फरक दिसेनासा होतो. दारूच्या नशेत अनेकदा आपल्या हातून चुकीच्या घटना घडतात. असाच काहीसा प्रकार एका दारुड्याच्या बाबतीत झाला आहे. चक्क एका रुग्णालयातील दारुड्याने रात्रीच्या सुमारास हॉस्पिटलमध्ये गोंधळ घालत प्रशासनाची डोकेदुखी वाढवली. हा प्रकार अकोले तालुक्यात घडला आहे. या बाबत … Read more

ब्रेकिंग : 12 सदस्यांची यादी कोश्यारींकडे सुपूर्द, कोणाकोणाचा समावेश? वाचा सविस्तर इथे

अहमदनगर Live24 टीम, 6 नोव्हेंबर 2020 :- महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांच्या नावाची यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना सादर केली. मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब केल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ही यादी राज्यपालांकडे सुपूर्द केली. परिवनह मंत्री अनिल परब, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, अमित देशमुख यांनी राजभवनावर नुकतीच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी तिन्ही … Read more

अहमदनगर जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण वाचा जिल्ह्यातील सविस्तर अपडेट

अहमदनगर Live24 टीम, 6 नोव्हेंबर 2020 :-अहमदनगर जिल्ह्यात आज १७८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५५ हजार २८७ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९५.९३ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (गुरूवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २६६ ने वाढ … Read more