कीर्तनकार इंदुरीकरांचे न्यायालयीन प्रकरण दिवाळीनंतर निकाली लागणार

अहमदनगर Live24 टीम,28 ऑक्टोबर 2020 :-  अपत्यप्राप्तीसंदर्भात जाहीर कीर्तनातून केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांच्या विरोधात प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान कायद्यांतर्गत संगमनेरच्या प्रथमवर्ग न्यायालयात खटला दाखल झाला आहे. इंदुरीकरांच्या विरोधातील सुनावणीला त्यांनी वकीलामार्फत जिल्हा सत्र न्यायालयात अपिल दाखल केले होते. त्याबाबत आज होणारी सुनावणी टळली असून, पुढील सुनावणी दिवाळीनंतर 25 नोव्हेंबर 2020 रोजी … Read more

जीवघेण्या ठरलेल्या त्या रस्त्याचे काम आमदार काळेंच्या पाठपुराव्याने झाले सुरु

अहमदनगर Live24 टीम,28 ऑक्टोबर 2020 :-मागील अनेक दिवसांपासुन अहमदनगर-मनमाड राज्य मार्गावर पडलेल्या खड्ड्यामुळे अनेक अपघात होवून हा मार्ग कळीचा मुद्दा बनला होता. याप्रकरणी आमदार आशुतोष काळे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. यामुळे या रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम सुरु करण्यात आले आहे. अहमदनगर-मनमाड राज्य मार्गाची झालेली दुरावस्था व यावर्षी मोठ्याप्रमाणात झालेला पाऊस त्यामुळे रस्त्याची वाताहत होवून … Read more

डांबरी रस्त्यावरील खड्डे बुजविताना बांधकाम विभागाने लावला चुना

अहमदनगर Live24 टीम,28 ऑक्टोबर 2020 :- जिह्यातील बहुतांश तालुका स्तरावर तसेच गावपातळीवर नादुरुस्त रस्ते, रस्त्यावरील खड्डे, यामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो आहे. यातच शेवगाव शहरातील रस्ते दुरुस्ती व खड्डे बुजवितांनी बांधकाम विभागाने नागरिकांनाच चुना लावला असल्याचा काहीसा प्रकार घडला आहे. पाच- सहा महिन्यांपासून रस्त्यावरील खड्ड्यांचा सामना करणाऱ्या शेवगावकरांना बांधकाम विभागाने खड्डे बुजवून तात्पुरता … Read more

कृषी विधेयके शेतकरी हिताचेच

अहमदनगर Live24 टीम,28 ऑक्टोबर 2020 :- गेल्या काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने कृषी विधेयक मंजूर केले आहे. मात्र त्यानंतर देशात संतापाची लाट उसळली. काही शेतकरी संघटनांसह विरोधकांनी या कृषी विधेयकाला जोरदार विरोध दर्शविला. या विधेयकाच्या निषेधार्थ आंदोलने करण्यात आली. एकीकडे विरोध सुरु असला तरी दुसरीकडे मात्र भाजपकडून या विधेयकाचे कौतुक केले जात आहे. भाजप किसान मोर्चा … Read more

बिनबुडाचे आरोप करणार्यांनी कारखान्याला एक टिपरूही दिले नाही ; खा. विखे भडकले

अहमदनगर Live24 टीम,28 ऑक्टोबर 2020 :- डॉ. तनपुरे कारखान्याच्या 60 व्या गळीत हंगामाच्या व बॉयलर अग्निप्रदीपन शुभारंभ नुकताच खा. डॉ. सुजय विखे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी त्यांनी आपल्या नेहमीच्या शैलीमध्ये विरोधकांचा समाचार घेत शेतकरी व कामगार यांना आश्वासित केले. यावेळी बोलताना खा. विखे म्हणाले, आधुनिक मशिनरी बसविल्याने आता या कारखान्याची क्षमता 2800 टनावरून 4500 … Read more

बापरे ! अतिवृष्टीमुळे विहीर खचली, कांदाही गडप; घराबाबतही झालेय ‘असे’ काही

अहमदनगर Live24 टीम,28 ऑक्टोबर 2020 :- राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी ऑक्टोबर महिन्यात जोरदार पाऊस पडला. बंगालच्या उपसागराच्या पश्चिम मध्य भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने तेलंगणा, आंध्रप्रदेश, कर्नाटक व महाराष्ट्रात अतिवृष्टी झाली. याचा परिणाम अहमदनगर जिह्यावरही मोठ्या प्रमाणात झाला. या पावसाने जिल्ह्यातील 11 तालुक्यांतील 2 लाख 30 हजार शेतकर्‍यांचे 156 कोटी … Read more

सरकारी जागा हडप करणाऱ्यांना करणार ‘असे’ काही ; आ. कानडे म्हणतात…

अहमदनगर Live24 टीम,28 ऑक्टोबर 2020 :-केंद्र सरकारचे कृषिविधेयक शेतकरी विरोधात असल्यचाह आरोप करत त्याचा निषेध करण्यासाठी टाकळीभान येथे शेतकर्‍यांच्या सह्यांच्या मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. याचे उदघाटन आ. कानडे यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी अनेक गोष्टींचा समाचार घेतला. ते म्हणाले की, मी प्रथम जनतेचा सेवक आहे. सत्तेच्या माध्यमातून ज्यांनी सरकारी जागा हडप केल्या त्यांना मी … Read more

कोरोनाने आणखी पाच जणांचा बळी घेतला

अहमदनगर Live24 टीम,28 ऑक्टोबर 2020 :-  जिल्ह्यात कोरोना रुग्णवाढीचा दर सात दिवसांत आणखी दोन टक्क्यांनी कमी झाला. मंगळवारी हा दर ९६.०४ होता. सात दिवसांपूर्वी दर ९४ टक्के होता. खासगी हॉस्पिटल्स, तसेच विविध संस्थांची कोविड सेंटर रिकामी झाली आहेत. दरम्यान, कोरोनाने आणखी पाच जणांचा बळी घेतला असून, २२१ नवे रुग्ण आढळून आले. जिल्ह्यात आतापर्यंत ८४८ जणांचा … Read more

या सरकारचा पायगुणच संकटी… त्याचा त्रास जनतेला भोगावा लागत आहे – डाॅ. सुजय विखे

अहमदनगर Live24 टीम,28 ऑक्टोबर 2020 :- महाराष्ट्रातील सरकार लोकनियुक्त नसून षडयंत्रातून तयार झालेले आहे. हे सरकार आल्यापासून वादळ, कोरोना, अतिवृष्टी अशी एकामागून एक संकटे सुरू आहेत. या सरकारचा पायगुणच संकटी आहे. त्याचा त्रास जनतेला भोगावा लागत आहे, अशी टीका खासदार डाॅ. सुजय विखे यांनी केली. वाळकी येथे माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्या वतीने आयोजित जिल्हा … Read more

जगणे झाले मुश्किल… येथील नागरिकांनी माजी आमदारांपुढे मांडली व्यथा

अहमदनगर Live24 टीम,28 ऑक्टोबर 2020 :- आधीच जिल्ह्यात कोरोनामुळे गेले अनेक महिने अर्थव्यवस्थेचे चाक गाळात रुतलेले होते. यामुळे अनेकांचा कामधंदा बंद झाला, बेरोजगारी आली. त्यातच परतीच्या पावसाने शेतीचे नुकसान झाले. यामुळे व्यवस्थित झालेल्या नागरिकांनी आपले गाऱ्हाणे थेट माजी आमदारांसमोर मांडले. कोरोना महामारीने गेल्या आठ महिन्यांपासून तालुक्‍यातील ठिकठिकाणच्या ग्रामस्थांना त्रस्त केले आहे. रोजगार नाही, भातपीक नष्ट … Read more

जिल्ह्यातील या बहुचर्चित पोलीस अधिकाऱ्याची झाली बदली

अहमदनगर Live24 टीम,27 ऑक्टोबर 2020 :-  गुटखा प्रकरणी केलेली कारवाईमुळे चर्चेत आलेले श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीहरि बहिरट यांची नुकतीच बदली करण्यात अली आहे. त्याचबरोबर नेवाशाचे पोलीस निरीक्षक रणजित डेरे यांची काल तडकाफडकी बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी अनुक्रमे प्रशिक्षक आयपीएस अधिकारी आयुष नोपाणी आणि अभिनव त्यागी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. … Read more

राहुल द्विवेदी यांची राज्यातील ‘ह्या’ मोठ्या पदावर झाली बदली !

अहमदनगर Live24 टीम,27 ऑक्टोबर 2020 :-  अहमदनगरचे जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांना नगरमधून बदली झाल्यावर मुंबई येथे बदली झाली आहे. बदलीनंतर नवीन नियुक्ती आदेश प्रतिक्षाधीन होता. राज्य सरकारने आज सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. यात राहुल व्दिवेदी यांना मुंबई येथे समग्र शिक्षा अभियानाच्या राज्य प्रकल्प संचालक पदाची सूत्रे देण्यात आली आहे. अहमदनगर Live24 च्या इतर … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले इतके रुग्ण

अहमदनगर Live24 टीम,27 ऑक्टोबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज २९० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५२ हजार ९४५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९५.६५ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (सोमवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २२१ ने वाढ … Read more

विद्यार्थ्यांविना बंद शाळेत वावरतोय बिबट्या; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

अहमदनगर Live24 टीम,27 ऑक्टोबर 2020 :- राज्यासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असल्याने शाळा, कॉलेज अद्यावही बंद ठेवण्यात आले आहे. विद्यार्थ्यांविना सुनसान असलेल्या शाळांमध्ये आता चक्क बिबट्या फिरू लागला आहे. अकोले तालुक्यात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. अकोले तालुक्यातील नवलेवाडी ग्रामपंचायत हद्दीतील अमृतनगर व कॉलेज परिसरात बिबट्या दिसला आहे. बिबट्याचा वावर आढळून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण … Read more

कापूस खरेदीत शेतकऱ्यांची लूट

अहमदनगर Live24 टीम,27 ऑक्टोबर 2020 :- दरवर्षी कापसाचा श्री गणेशा हा दसऱ्याला व्यापाऱ्यांकडून केला जातो मात्र यावर्षी पाऊस वेळेवर पडल्यामुळे पेरणी लवकर झाली त्यामुळे दसऱ्याच्या अगोदरच शेतकऱ्यांनी कापूस काढून विकायला सुरुवात केली. कापूस खरेदी केंद्र सुरू होण्याची वाट न बघता थेट व्यापाऱ्यांना कापूस हा कवडीमोल भावात विकावा लागत आहे. सीसीआय केंद्र लवकर सुरु न झाल्यास … Read more

पठारभाग बनतोय चोरट्यांचा हॉटस्पॉट; बंद बंगला फोडत मुद्देमाल केला लंपास

अहमदनगर Live24 टीम,27 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून चोरी, लुटमारी, अशा गुन्हेगारी स्वरूपांच्या घटनांमध्ये जास्तच वाढ होऊ लागली आहे. यातच जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात वाढत्या चोरीच्या घटनांमुळे येथील पोलीस प्रशासनाच्या कामाबाबत संशय निर्माण होऊ लागला आहे. संगमनेर तालुक्याचा पठारभाग नेहमीच कोणत्या कोणत्या कारणाने चर्चेत असतो. आता पुण्याला स्थायिक असणार्‍या धुमाळवाडी येथील देशमुख कुटुंबियांचा बंगला … Read more

अज्ञात वाहनाच्या धडकेत दोनवर्षीय नर जातीचे तरस जागीच ठार

अहमदनगर Live24 टीम,27 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यातील उत्तरेकडील भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून तरस नामक प्राण्याचा वावर वाढू लागल्याच्या घटना ऐकण्यात आल्या आहेत. या प्राण्याकडून काही जणांवर हल्ला झाल्याच्या घटना देखील घडल्या होत्या. दरम्यान एका तरसाच्या पिल्लाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला आहे. संगमनेर तालुक्यातून जाणार्‍या पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील माहुली शिवारात अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन वर्षीय … Read more

अहमदनगर इलेक्ट्रॉनिक मीडिया व पारनेरचे नगरसेवक सय्यद यांच्या पुढाकाराने वृत्तवाहिनींच्या प्रतिनिधींनां 1 लाख रुपयाच्या कोरोना पॉलीसीचे वाटप

अहमदनगर Live24 टीम,27 ऑक्टोबर 2020 :-आमचा एक सहकारी पांडुरंग रायकर यांचा कोरोनाने निधन झाले, त्यांना उपचार वेळेवर मिळाले नाही आणी म्हणून मीडियाचे काम करतांना 100% सेवाभाव म्हणजे ज्या गोष्टी कधी समाजापुढे आल्या नाही अश्या गोष्टीनां समाजापुढे आणण्याचा काम वृत्त वाहिनीचे प्रतिनिधी करत असतात आणी म्हणून त्यांना स्वतःला एक कवच पाहिजे त्यामुळे आज करण्यात आलेल्या कोरोना … Read more